सौ. लता. वय वर्षे ३०, एका मुलीची आई. या वयात दोन्ही किडन्या निकामी. एका जगविख्यात आयुर्वेदिक डॉक्टरांची मेहरबानी. त्यांच्या औषधोपचाराचा हा परिणाम। मग अनेक वर्षे डायलीसीसवर.
सौ. जयंती. वय वर्षे साठीच्या पुढे. लताच्या माहेरी शेजारी रहाणाऱ्या. लताचे होणारे हाल त्यांच्याने बघवेना. एक दिवस त्यांनी खुप धाडसी निर्णय घेतला. घरच्या सर्वांचा होणरा प्रखर विरोध धुडकावत. आपली एक किडनी लताला द्यायची. कोणतीही अपेक्षा न करता आणि त्या बदल्यात काहीही न घेता. अट फक्त एकच. माझी शस्त्रक्रिया झाल्यावर काही दिवस मी तुझ्या सोबतच राहीन.
आणि त्यांनी हा निर्णय प्रत्यक्षात अमंलात आणला। कायद्याचे सारे सोपस्कार पुर्ण करुन दोन तीन वर्षापुर्वी ह्य दोघीवर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली।
दोघीही आता सुखरुप आयुष्य जगत आहेत. श्री विवेक पटवर्धन यांच्या बॉगवर मरणोत्तर नेत्रदानाविषयी वाचले आणि हे आठवले.
2 comments:
Such persons are unsung heroes! We know so little about them. I feel like touching their feet in reverence.
Thanks for bringing this true story to us.
Vivek
हे करायला केवढे मोठे धैर्य लागते. निरपेक्षवॄत्तीने करणे खुप अवघड असते. जयंतीबाईंनी लताला दुसरे आयुष्य दिले.
Post a Comment