Sunday, January 04, 2009

कुलकर्णी उपहारगृह, प्रार्थना समाज, मुंबई

तर,  काही धो धो , तुफान चालणारी उपहारगॄहे अचानक कशी काय बंद पडतात व काळाच्या ओघात विस्मॄतीत खोलवर मनाच्या गाभाऱ्यात कुठे नाहीशी होतात हे कोडे न उलगडण्यासारखे आहे.
 
बटाट्याची भजी आणि भाजी. त्याची चव मात्र अजुनही जिभेवर, मनात रेंगाळतेय, त्याचा स्वाद अजुनही आठवणीत दरवळतोय, अजुनही ती खावी खावीशी वाटतात, अजुनही त्या चवीचा शोध घेणे सुरुच आहे पण ती अजुनही कुठेच किंबहुना त्याच्या जवळपास पोचेल इतपत देखील सापडत नाहीय. 
 
अशी कोणती जादु, प्रार्थना समाज ,मुंबई येथील कुलकर्णी उपहारगृहात होती की जेथे लोक रांगा लावुन , ताटकळत आपल्या समोर बटाटा भजी केव्हा येतात व आपण त्याचा फडशा केव्हा पाडतो याची वाट पहात बसत? 
 
एक प्लेट फक्त चार आण्यात. 
 
गेले ते दिन गेले. 

1 comment:

Vivek S Patwardhan said...

Yes indeed, this was a great place to go for eating good delicious food at a reasonable rate. I have fond memories of Kulkarni Upahargruha. One similar was Joglekar Khanaval at Parel naka. I feel a part of myself is lost when such places which carry my fond memories vanish!
Vivek