Friday, May 30, 2008

३१ मे, जागतीक तंबाखू सेवन विरोधी दिन


आपण ओढलेली प्रत्येक विडी-सिगरेट आपलं आयुष्य ११ मिनीटांनी घटवते.

आपल्याला हे ठावुक असते तरी पण आपल्याला धुम्रपान बंद करवत नाही. कॅन्सर पासुन अनेक रोग आपण आपल्या हाताने ओढवुन घेतो. का ? कशासाठी ?


कोणे एके काळी मी देखील चेन स्मोकर होतो. दिवसाला दोन मालब्रो सिगरेटची पाकीटे (४० सिगरेट ) संपवायचो.


मग एके दिवशी सुप्रसिद्ध लेखक व.पु.काळे माझ्या मदतीला आले, ज्यांच्यामुळे केवळ एका दिवसात धुम्रपान बंद झाले.

त्यांनी मला सांगीतले मी सिगरेट पिणे बंद करा असे सांगत नाही, सिगरेट पिणे वा‌ईट आहे हे ही सांगत नाही. वा‌ईट आहे ती सवय. सवय सोडा.

आणि मी सवय सोडली.

सुरवातीस नक्कीच त्रास होतो, शरीराला निकोटीनची आदत झालेली असते. ते त्याची मागणी करु लागते, मग प्रचंड नैराश्य येते, अगदी आत्महत्तेपर्यंत मनातले विचार घेवुन जातात. हे चारपाच दिवस उलटले, या दिवसात आपण आपल्या भुमीकेशी ठाम राहीलो, खंबीर राहिलो, की मग आपल्या मनाला शरीर साथ देवु लागते. आणि सवय सुटते.


तेव्हा केव्हा सोडताय सवय ??

Thursday, May 29, 2008

बेदरकारपणा



बसथांबा उभारण्यासाठी पदपाथावर भले मोठाले खड्डॆ खणुन आज दोन चार दिवस झाले असतील.

डोळस माणसे सुद्धा यात पडु शकतात, मग अंध व्यक्तींचं काय ?


सुरक्षततेबाबत आपण किती निष्काळजी, बेसावध, बेफीकीर, अज्ञानी असतो.

कुणाची सोय तर कुणाची गैरसोय


दुकानदारांची तक्रार रास्त आहे, या नव्या नवलाईच्या बसथांब्यांमुळे पाठीमागील दुकानदारांचे हवा, उजेड, बंद झाले आहे, जणु काही त्यांचे स्वातंत्र हिरावुन घेतल्यासारखे. त्यांची दुकाने या मागे साफ लपली गेली आहेत, त्यांच्या धंद्यावर याचा विपरीत परीणाम होवु शकतो.


दिवसभर बिचाऱ्यांना डोळ्यासमोर ग्राहकांऐवजी ह्याचा पत्राच नजर येतो.


त्यांची मागणी एकच, निदान हा मधला पडदा तरी हटवा, मोकळा श्वास तरी घेता येईल.

गुज्जर आंदोलन

समाजातील काही मुठभर घटक आपल्या मागण्याकरता सारया देशाला वेठिस धरतात, हिंसाचाराचें मार्ग अबलंबतात, आणि सारा समाज, देश , सरकार त्याकडे हतबल होवुन बघत रहातो ।
अश्या प्रकारचे आंदोलन ही दहशदावादीच्या कृत्या प्रमाणेच भयंकर असतात। सरकारने कोणावरही दयामाया न दाखवता ती आंदोलन त्वरित थांबवली पाहिजेत।

सैय्यां


काली काली रात रे दिल बडा सताये तेरी याद आये, तेरी याद आये
झुटोंसे प्यार किया हाय क्या किया सारे जहॉ क्या दुख ले लिया
अब रो रो प्राण जाये ।
काली काली रात रे दिल बडा सताये तेरी याद आये, तेरी याद आये
भीगी भीगी पलकोंकी लाज तेरे हाथ है

तु तो गया है तेरी याद मेरे साथ है
जो दिल को धीर बंधाये ।
काली काली रात रे दिल बडा सताये तेरी याद आये, तेरी याद आये

सज्जाद हुसेन नावक एक अवलीया होवुन गेला, सर्वश्रेष्ठ मॅंडोलीन वादक, लहरी, फटकळ, आपल्याच तोऱ्यात वापरणारा, "बागीचाये अफताल है दुनीया मेरे आगे" समजणारा, एक मनस्वी संगीतकार. अवघड चाली रचाव्यात तर त्यानीच, व त्या अवघड चाली गाण्याचे आव्हान पेलावे तर केवळ लतानीच.

नीट गा, तु सज्जादचे गाणॆ गात आहेस, नौशादचे नाही समजले का ! असे लताला ठणकवुन सांगण्याचे धाडस जगात फक्त एकाच माणासाकडॆ होते, सज्जद कडॆ. मग या स्वभावातुन होणाऱ्या परिणीतीची ना त्याला पर्वा होती ना जाणीव तो भला माणुस आपल्याच विश्वात रमलेला, सुंदर, मधुर चाली रचणॆ, आपल्याच त्या प्रसिद्ध ठेक्यात.

तो बाहेर फेकला गेला.

दुर्मीळ गाण्यांचा संग्रह करत असतांना त्या काळी केवळ दोन चित्रपटाची गाणी अतिशय दुर्मीळ होती. भारतात ती कोणाकडे आहेत हे फारसे कोणाला ठावुक नव्हते, माझा संग्रहक दोस्त श्री, प्रकाश कद्रेकर यांनी ती मिळवण्यासाठी जंग जंग पछाडले. या क्षेत्रातील दोन दिग्वज श्री नारायण मुलाणी व पुण्याचे उदय द्रविड हे देखील आमचे स्नेही. त्यांच्या कडे ही गाणी असावीत असा आमचा दाट संशय, पण ते देखील ताकास तुर लावुन देत नव्हते.
एकदा पुण्याला उदय द्रविड ला भेटायला गेलो होतो.

"तुम्हाला कळाले की नाही "
काय हो
" सैय्यांची कॅसेट H.M.V नी तीन महिन्यापुर्वी काढलीय.

जीव घेवुन मी दुकानात पळालो, कॅसेट मिळावण्यासाठी, सज्जाद साठी, लता साठी, दर्द भरी गाणी ऐकुन घेण्यासाठी.

ही त्या चित्रपटातील इतर गाणी.
किस्मत मे खुशी क्या नाम नही दो दिन भी हमे आराम नही
वो रात दिन
हवा मे दिल डोले , मचलकर बोले
उस पार एस दिवार के जो रहतो है
खयालो मे तुम हो नजारो मे तुम हो
मेरी जान मुहब्बत करो छुपके छुपके
काली काली रात रे दिल बाड सताये

आबा, हा सुर्य हा जयद्रथ

प्रिय आबा,

आपण सुरक्षततेच्या कारणासाठी सर्व दुचाकीवहान चालकांनी हेल्मेट वापरावे या साठी फेरी काढुन जनजाग्रुती केलीत, त्याला पुरते ४८ तास ही उलटले नाहीत.

सुरक्षततेसाठी प्रत्येक दुचाकी चालवणाऱ्यानी व त्याच्या मागे बसलेल्यांनी हेल्मेट घालायलाच हवे व ते कायद्याने बंधनकारक आहे.

Wednesday, May 28, 2008

भारतात फक्त २५६ सिंह शिल्लक - एक बातमी

म्हणुन कदाचीत आपल्या पराक्रमाच्या आठवणींसाठी शहरातील जंगलात त्यांच्या स्म्रुती जपुन ठेवावी असे महामानवाला वाटत असावे.


Tuesday, May 27, 2008

आबा, जरा आपल्या पोलीसांना हेल्मेट वापरायला शिकवा ना.


दुचाकी वहान चालवताना हेल्मेट न हालणॆ धोकादायक असते का हो ? व ते बेकायदेशीर देखिल आहे म्हणाता ? मग आपले मोटरसायकल स्वार बिट मार्शल पोलीस हेल्मेट बिना दिवसाढवळ्या भर रस्तावरुन कसे काय फिरत असतात ? बर हेल्मेट न घालता मोटरसायकलीवरुन फिरतात ते फिरतात परत वरती वहातुकीचे नियम ही मोडतात ! कुठुन ही कुठे कसे ही जाण्याचा यांना जणु परवानाच दिलाय. आपले ट्रॅफीक पोलीस मात्र हेल्मेट वापरतात हो. पण फक्त चालवणाराच. मागे बसलेल्याची हेल्मेट्च्या नावे बोंब असते हो.

आबा, जरा आपल्या पोलीसांना हेल्मेट वापरायला शिकवा ना.

आपल्या ट्रॅफीक पोलीसांनी आतापर्यंत किती बिट मार्शलांना या बेकायदेशीर कृत्या बद्दल पकडलय व त्यांच्या कडुन दंड वरुल केला आहे याची माहीती आपण मागवाल काय ?

अनेकदा मी स्वःता आपल्या पोलीसांना हेलेम्टविना मोटरसायकल चालवतांना पकडले आहे. माझ्या तोडांकडे बघुन ते निघुन तरी जातात नाही तर काही तरी सबबी तरी सांगतात.

आबा, माझा मुख्य मुद्दा असा आहे की कायद्याच्या रक्षकांनी सर्वप्रथम कायदा पाळला पाहीजे. निदान स्वःताच्या सुरक्षत्तेसाठी तरी.

आपल्या मोटरसायकल फेरी पासुन बोध घेत आता तरी सर्वजण सुरक्षततेसाठी हेल्मेट वापरायला लागतील ही आशा.

म. टा. प्रतिनिधी - एरवी सायरन वाजवत जाणाऱ्या लालदिव्यांच्या मोटारी आणि मागेपुढे पोलिसांच्या जीपमधून दौरा करणारे आर. आर. पाटील आणि छगन भुजबळ यांनी सोमवारी ऐन मुंबईत मोटारसायकल सफारीचा आनंद लुटला. लेडीज बारवरील धाडींवरून आपले राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्याशी झालेला वाद विसरून आबा चक्क त्यांच्या मोटारसायकलवर मागे डबलशीट बसले. मग सरकारी मोटारी बाजूला ठेवून बाइकस्वार बनलेल्या मंत्र्यांना पाहण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली खरी, पण या खाशा सवाऱ्यांमुळे मरिन ड्राइव्हची वाहतूक मात्र कोलमडली.. हेल्मेट सक्तीचा संदेश देण्यासाठी मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी एनसीपीएपासून गिरगावच्या चौपाटीपर्यंत मोटारसायकल रॅली आखली होती. वाहतूक पोलिसांच्या सुमारे शंभर मोटारसायकलींचा ताफा व त्यावर हेल्मेटधारी पोलिस अशी ही रॅली होती.

Sunday, May 25, 2008

कल के कलाकार संगीत महोत्सव - दिवस अखेरचा




आजच्या शेवटच्या दिवशी एकीकडे भोपाळ वरुन आलेल्या सौ.सुलेखा भट, औरंगाबादच्या डॉ.वैशाली देशमुख यांचे सुरेख गाणे, कोलकोताच्या सौरवब्रता चक्रबोरती यांचे ऐकायला दुर्लभ असलेले असे वाद्य, "सुरबहार " वादन हे अप्रतिम कार्यक्रम ऐकल्याचा हर्ष व दुसरीकडे त्याच बरोबर "कल के कलाकार संगीत महोत्सव" संपल्याचे दुःख अशी काहीशी विचीत्र मनस्थिती.



तरुण पिढी किती गुणी आहे.



आयोजकांची नेहमीचीच रड. लोकांपर्यंत हा संगीत महोत्सव पोचवायला ते कायमचे कमी पडतात.



एका ही वर्तमानपत्रात यासंबधी काहीही लिहुन येत नाही. या मुळे हे गुणी कलावंतांना हवी तशी प्रसिद्धी मिळत नाही, त्यांच्या गुणांचे योग्य ते कौतुक केले जात नाही, अनेक रसिक या कार्यक्रमापासुन माहीती नसल्यामुळे वंचीत रहातात ही खंत.

वॉटर कलर्स - पुष्पा बगरोडिया

निसर्गात रमणाऱ्या अवलीयांनी जरुर पहायला जावे. पुष्पा बगरोडिया यांनी वॉटर कलर्स या माध्यमातुन निसर्गाची विषेशःता फुलांची चित्रे काढलेले चित्रपदर्शन सध्या नेहरु सेंटर मधे भरले आहे.

चित्रांची एक झलक.

कर्नाटक विधानसभा - निकाल

कर्नाटक विधानसभाच्या निवडणुकीच्या निकालाने एका घराणेशाहीचा पार निकालच लावला. कर्नाटकी जनतेने यंदाला फारच चांगले काम केले. सोचविचार करुन देवीगौडा पितापुत्रांची नौंटंकी संपवुन त्यांना सध्याच्या राजकारणातरी त्यांना होत्याचे नव्हते केले. हे फार बर झाल.

पंतप्रधान पद भुषविल्यानंतर ही ज्या गृहस्थांनी गल्ली मधले व ते ही विधीनिषेध शुन्य राजकारण करण्यात धन्यता मानली, त्यांची सरंजमशाही संपवण्यासाठी हे जनतेने योग्यच केले.

Saturday, May 24, 2008

दुर है म़झील राहे मुश्कील

दुर है म़झील राहे मुश्कील आलम है तनहाई का
आज मुझे अहसास हुवा है अपनी शिकस्ता-पा-ई का


जुल्म

एक बार ख़ुदा भी देखे उन्हे तो दर्द से वोभी ची़ख उठे
इंसान के जो ज़ुल्म इंसॉ पे देख के चुप रह जाता हूं ।
- फिराक़


"आरुषीचा खून पित्यानेच केला" , "तीन तास ते निरज ग्रोव्हरच्या प्रेताचे तुकडे करत बसले". "बेगर्स होम मधल्या मृत्यचे काळेबेरे ?"

या साऱ्या बातम्या वाचल्या की फिराक़चा हा शेर आठवतो.

पखावज कचेरी

याच साठी केला होता अट्टाहास. प्रतिक्षा काय फक्त चातकच करतो ? Phd करत असणाऱ्या व बुधवुन, उत्तर प्रदेश येथुन आलेल्या संयोगीता सिंग पटेल यांनी निर्दोष पखावज वाजवुन साऱ्यांची मने काबीज केली.



कल के कलाकार संमेलन - दिवस ८ वा.

आता वाट पहाणे आजच्या तबला कचेरीची.

Friday, May 23, 2008

बेलाबहार - नविन गंधर्व

पण असे का ?

वडापाव व शौचालयाने भरलेली नेत्यांची मनोरंजन करणारी भाषणे ऐकायला फार मोठ्या संख्येने जमाव उपस्थित रहातात, आणि प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी गायब होतात ?
आपले कर्त्यव्य बजवायचे नाही मग नेत्याच्या नावे कोकलत रहायाचे। काल ठाणे मतदारासंघात लोकासभेच्या पोटनिवडणुकीत केवळ २६ % मतदान झाले।

Thursday, May 22, 2008

अनुराधा कुबेर, पुणॆ.

ना जानु बालमा मिले कब हु
पीत लगाके पछता रही ।
सखी मन लागेना ।



आधीच आपल्या माहेरचा कलावंताचे गाणे ऐकायचे या विचाराने राजाभाऊंच्या आनंदाला उधाण आलेल, त्यात परत त्या परमप्रिय बागेश्री राग गाणार म्हणजे काय ! सोन्याहुन पिवळे.

कधीकधी मला प्रश्न पडतो, रंगमंचावर गायलेले गाणे जास्त रंगत देते की कार्यक्रम सुरु होण्याआधी आतमधे कलावंत तयारी करण्यासाठी गातात ते गाणे ऐकणे जास्त बहरीचे असते ?
बढिया है ! दिल खुष हुवा !

कल के कलाकार संगीत संमेलन, दिवस ७ वा.
आता पर्यंत ऐकलेल्या बागेश्री पासुन याचे वेगळॆपण जाणवत होते. (कुणी तज्ञ मला हा फरक समजवुन सांगेल काय ? )

परमसौख्याचे, आनंदाचे, सुखाचे, समाधानाचे, दिवस कसे भरभरा भरभरा सरत रहातात, दुःखासारखे ते रेंगाळत का बरे रहात नाहीत ?

आज अनुराधा कुबेर खुपच छान गायल्या, पण केवळ २५ मिनीटॆच त्यांच्या वाट्याला होती. त्यामुळॆ ..

मन आज अतृप्ततेच समाधान मानतय.

अनुराधा कुबेर, पुणॆ.


ना जानु बालमा मिले कब हु
पीत लगाके पछता रही
सखी मन लागेना ।

आधीच आपल्या माहेरचा कलावंताचे गणे ऐकायचे या विचाराने राजाभाऊंच्या आनंदाला उधाण आलेल त्यात परत त्या परमप्रिय बागेश्री राग गाणार म्हणजे काय ! सोन्याहुन पिवळे. आता पर्यंत
ऐकलेल्या बागेश्री पासुन याचे वेगळॆपण जाणवत होते. कुणी तज्ञ मला हा फरक समजवुन सांगेल काय ?

कधीकधी मला प्रश्न पडतो, रंगमंचावर गायलेले गाणे जास्त रंगत देते की कार्यक्रम सुरु होण्याआधी आतमधे कलावंत तयारी करण्यासाठी गातात ते गाणे

कल के कलाकार संगीत संमेलन, दिवस ७ वा.

परमसौख्याचे, आनंदाचे, सुखाचे, समाधानाचे, दिवस कसे भरभरा भरभरा सरत रहातात, दुःखासारखे ते रेंगाळात का बरे रहात नाहीत ?

आज अनुराधा कुबेर खुपच छान गायल्या, पण केवळ २५ मिनीटॆच त्यांच्या वाट्याला होती.

मन आज अतृप्ततेच समाधान मानतय.

मुक्तांगण

दै. सकाळ च्या मुक्‍तांगणमधे बरेच जण आपला अनुभव लिहीत असतात. त्यापैकी काही वाचनात आले. परोपकार करतांना आपल्याला कसे कटु अनुभव येतात या संबंधी.

दुसऱ्या कोणासाठी असलेली लग्नाची आमंत्रणपत्रिका चुकुन त्यांच्या पत्त्यावर मिळाली, मग त्यांनी नावावरुन त्यांचा बरोबर पत्ता शोधुन काढुन त्यांना ती पत्रिका स्वःत नेवुन देण्याचे कष्ट केले तर त्या बदल्यात त्यांना खडुस वागणुक मिळाली

किंवा

पुढे गेलेल्या मोटरसायकल, स्कुटर वरील जाणाऱ्यांची धोकादायक परिस्थिती, उ.दा. हवेत तरंगणारा दुपट्टा जो चाकात जावुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा मागे बसलेले मुल, जो झोपी गेले असुन , दुलक्या खात खाली पडण्याची शक्यता असु शकते, हे पाहुन, जाणुन त्यांचा पाठलाग करत त्यांना थांबवुन, धोक्यापासुन सावध केल्या नंतर, करणाऱ्यांना मिळालेला वाईट प्रतिसाद इ.

परोपकार करणाऱ्यांना मिळालेल्या या अपमानास्पद वाईट वाटुन घेण्याचे कारण नाही. नाउमेद होण्याची गरज नाही.

एक तर आपण त्यांचा जीव वाचवला असतो किंवा आज आपण ही एक चांगली गोष्ट केली व या मुळे आपल्याला वाटणारे आत्मीक समाधान या उपेक्षापेक्षा किती तरी पटीने अधिक असते.

शेवटी आपण हे सर्व आपल्याकरता करत असतो, आपल्या मनाला या परिस्थितीचा त्रास होत असतो म्हणुन. आपण आपला चांगुलपणा सोडता कामा नये किंबहुना आपण केलेल्या या चांगल्या गोष्टी लगेचच विसरुन जायच्या असतात. ते करायलाच हव असत म्हणुन आपण केलेले असते.

सामान

"आपले सहप्रवास आपले सामान तर मागे विसरुन जात नाही आहेत ना ? लक्ष ठेवा." बस, ट्रेन मधील या सुचनेचा तंतोतंत अंमल माझ्या एका स्नेह्याने करायचे मनावर घेतले.
संध्याकाळी मुंबईहुन पुण्याला जाताना ट्रेन मधे त्याच्या बाजुला सरदारजींचा भला मोठाला ग्रुप बसला होता. लोणावळ्याला ते सर्व उतरले. एक बॅग मागे राहिली होती.
दोस्ताने मोठ्यामोठ्याने सर्वांना विचारले. "ये बॅग किसका है?"
एका सरदारजीला त्याने सांगितले, बहुदा तुमच्यापैकी कोणीतरी ही विसरुन गेलेला असावा. सरदारजीने ही असेल आपल्यापैकी कोणाचीतरी हा विचार केला व बॅग घेवुन तो खाली उतरला.
तळेगाव जवळ आले तसे बाजुच्या डब्यातुन एक प्रवासी आला. विचारु लागला.
"माझी बॅग कुठे आहे, येथे तर ठेवली होती, गेली कुठे ?
तेव्हा परोपकार करतांना जरा जपुनच.

जरासं वरती बघीतलं की

ते तुमच्यावर लक्ष ठेवुन आहेत बरं का ! रोजच्या धावपळीतुन वेळ मिळालाच व वरती पाहिले तर हे कळॆल.