गच्चुन भरलेल्या, फार गर्दी असलेल्या बस मधे, ट्रेन मधे तुम्ही शिरता. मग बसण्यासाठी जागा पटकवण्याचे डावपेच आखु लागता.
चुळबुळ करणारा माणुस हेरुन त्याच्या बाजुला जावुन तुम्ही उभे रहाता, आता पुढच्या स्टॉप वर हा उतरेल व आपण बसु करुन.
नेमका तो सोडुन आजुबाजुचे सर्व जण उतरुन जातात, रिकाम्या झालेल्या जागा इतर जण अगदी बऱ्याच नंतर देखील चढलेले पटकवुन जातात.
राजाभाऊ शेवट पर्यंत उभे ते उभेच




























