Monday, December 10, 2007

भुलभुल्लया

मानसिक रोग्यांवर उपचार करण्याचा एक मार्ग "भुलभुल्लया " या चित्रपटात दाखवला गेला आहे. त्याचा वैद्यकिय अभ्यासक्रमात समावेश केल्यास जगातील सर्व मानसीक रोग असणाऱ्यांना तसेच मानसोपचार तज्ञांना त्याचा चांगलाच लाभ होवु शकतो.

या मोठ्या विषयाला हात झालण्या प्रुर्वी दिर्दशकाने जरातरी विचार करायला हवा होता !

मानसिक रुग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टरने तांत्रिक मांत्रीकाची मदत घ्यावी ? रुग्णाच्या हातात तलवार देवुन जादुचे प्रयोग करावेत ?

नवल वाटते ते वैद्यकिय क्षेत्रातले या बाबत गप्प का आहेत ?

मी हे बोललोच नव्हतो

"मी हे बोललोच नव्हतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला आहे, त्याला चुकिचे संदर्भ लावण्यात आलेले आहेत. "
हे नंतर स्पष्टीकरण दिले की सर्वच आलबेल.
"मी जे काही बोललो तेच मला बोलायचे होते , आणि त्याचा तोच अर्थ आहे " असे कोणीच का बोलताना आढळुन येत नाही ?

उन्माद

एखाद्याला उन्माद चढलेला आपण पहात असतो, पण त्याचे फारसे आश्चर्य वाटत नाही कारण या ठिकाणी पोहोचण्यासाठी, पॉवरफुल होण्यासाठी त्याने बरेच काही केले असते, पचवले असते.
दुःख असते ते आपण विवेक शुन्य झाल्याचे, त्याचा कॄत्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन केल्याचे किंवा त्या प्रवृत्तीला विरोध न केल्याचे, आपल्या मुक संमतीचे, त्याने उभारलेल्या मायावी तत्वज्ञानात गुंगुन जाण्याचे.

Thursday, December 06, 2007

कानउघडणी

बस्स ऐवढेच ? केवळ कानउघडणीवर सुटका ? निर्दोष वाघीणीला तब्बल ३९ गोळ्या झाडून ठार मारल्या बद्द्ल ? काय पण अज्ञानाची किंमत ? ताशेरे आणि खुलासे ? वन्य प्राण्यांना केवळ फोटोत बघण्याची वेळ आल्या नंतर ही ?
धन्य ते वनखाते धन्य ते वनमंत्री.
महाराष्ट्र टाईम्स मधुन -
प्राण्यांना गुंगी आणणाऱ्या बंदुका कमी, * कर्मचाऱ्यांचीही वानवाच - संजय व्हनमाने, मुंबई वन्यप्राण्यांचे संरक्षण करा, अशी हाकाटी करणाऱ्या वन विभागाकडे संरक्षित वनक्षेत्राबाहेर आलेल्या प्राण्यांना बेशुद्ध करून पुन्हा जंगलात सहीसलामत सोडण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी-कर्मचारी तसेच या कारवाईसाठी आवश्यक बंदुका यांची मोठी कमतरता असल्याचे समजते. सुमारे शंभर प्रशिक्षित अधिकारी-कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना जेमतेम दोन ते तीनच अधिकारी असल्यानेच चंदपूर जिल्ह्यातील ब्रह्मापुरीत वाघाचा बळी गेला, असे वनखात्यातच बोलले जात आहे. ब्रह्मापुरीत एका नरभक्षक वाघाने चार जणांचा बळी घेतल्याने गावकऱ्यांमध्ये असंतोष होता. लोकक्षोभ लक्षात घेऊन नरभक्षक वाघाला मारण्याचा निर्णय झाला; पण दिसलेला वाघ नरभक्षकच असल्याचे समजून तब्बल ३९ गोळ्या झाडून त्याला ठार मारण्यात आले. तो वाघ नरभक्षक नव्हताच! वाघ वा अन्य प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठीच्या विशिष्ट बंदुका वन विभागाकडे नसल्याने हा प्रकार झाल्याची माहिती पुढे आली आहे. प्राण्यांना गुंगी आल्यानंतर त्याच्यावर योग्य ते उपचार करुन पुन्हा जंगलात सोडले जाते. मात्र असे तंत्र अवगत असलेले जेमतेम दोन ते तीनच अधिकारी वन विभागाकडे सध्या आहेत. अधिकारी व कर्मचारी यांच्या अज्ञानातून विनाकारण एक वाघ मारला गेला याबद्दल वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी त्यांची कानउघडणी केली आहे. राज्यात संरक्षित वनक्षेत्राबाहेर वन्यप्राण्यांची अवस्था दयनीय असल्याचे ताशेरे त्यांनी या पत्रात मारले आहेत. राज्यातील काही धाब्यांवर वन्यप्राण्यांचे मांस खायला मिळत असल्याच्या तक्रारी आल्या असून त्याबद्दलही त्यांनी अधिकाऱ्यांकडून खुलासे मागवले आहेत.

Wednesday, December 05, 2007

आज रामशास्त्री हवे होते.

शाब्बास, भले बहादुर, शाब्बास , शर्तीने वाघ मारलात, फार मर्दुमुखी केलीत, मोठे शौर्य गाजवलेत, आपला जीव धोक्यात घालुन एका निरपराध वाघीणीला मारलेत. आता माहीती पडले, मारले गेलेले श्वापद भलतेच होते, नरभक्षक नव्हते.

मग बिघडले कोठे ? पुराण काळात पांडवांनी खांडव वन नाही का जाळले ? त्यातल्या सर्व पशुपक्षांना नाही का यमसदनी पाठवले, परीक्षीताने नाही का सर्पयज्ञ आयोजीत करुन समस्त सर्प कुळाचा वंशविच्छेद केला ? मानव जातीची कुरापत काढणाऱ्या वाघ्र कुळास अशी जीवघेणी सजा होणे जरुरीचे होते. आपण समस्त मानवसमाजाचे रक्षण केले आहेत.

लानत आहे, शरम वाटते, या निरपराध वाघीणीस अती उत्साहाच्या भरात, मागचा पुढचा विचार न करता मारणाऱ्या विचारहीन ,संवेदनाशुन्य माणसांचा, त्यांच्या विचारसरणीचा, त्यांच्या कृत्याचा.

या बेजबाबदार कृत्यात जे जे कोणी प्रत्यक्षपणे, अप्रत्यक्षरित्या जबाबदार असतील , या वधास जे जे कारणीभुत असतील, ज्यांनी ज्यांनी दबाब आणला असेल, प्रवॄत केले असेल त्यांच्या, त्यांच्या वर तत्काळ अटक करुन वन्यप्राण्यांच्या हत्येसंबधी असणाऱ्या सर्व कायदे कलामा नुसार खटले चालवुन त्यांना योग्य त्या शिक्षा झाल्याच पाहीजेत.
आज रामशास्त्री हवे होते.
सकाळ चा अग्रलेख - (खालील प्रमाणॆ )
बेपर्वाईचा मूक बळी!जंगलाची शान असलेल्या वाघांना वाचविण्यासाठी जगभरातील प्राणिप्रेमी, निसर्गवादी करीत असलेला आक्रोश महाराष्ट्राच्या वन खात्याच्या बंद कानांवर गेलेला नसावा. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्‍यात एका "नरभक्षक' वाघाला चार "शूटर'मार्फत गोळ्या घालून संपविण्याचे काम वन खात्याने नुकतेच पार पाडले. वन्य प्राण्यांच्या रक्षणासाठी असलेल्या या खात्याला प्राण्यांबद्दल किती प्रेम आणि आस्था आहे, हे यानिमित्ताने अधोरेखित झाले. ठार झालेला वाघ नरभक्षक होता की नाही, याची ठाम खात्रीही वन खाते देऊ शकत नाही. लोकांच्या म्हणण्यानुसार नरभक्षक वाघीण आहे. म्हणजे वन खात्याच्या कर्तबगारीमुळे निसर्गाच्या साखळीतील एक अनमोल जीव फुकाफुकी प्राणाला मुकला.

विनंती अर्ज

माननीय, मायबाप सरकारला माझी एक हात जोडुन नम्र विनंती, अर्ज करण्यास कारण की आमचे लाडके क्रिकेटपटु, तरुणांचे दैवत, भारतीय क्रिकेटसंघाचे प्रमुख आधारस्थंभ, जाहिरातीतील ठळक मॉडेल, श्रीयुत सचिन तेंडुलकर यांना त्यांची देय असलेलेली आयकराची एक कोटी सहासष्ट लाखाची थकबाकी, त्यांनी केलेली देशसेवा लक्षात घेता माफ करण्यात यावी.

कॄपया करुन त्यांना थकबाकी मासीक हप्तात भरायला लावली जावु नये, आमच्या पगारातुन परस्पर कापल्या गेलेल्या आयकरातुन आपण देशाचा खर्च चालवु शकाल याची मला खात्री आहे.

माझ्या या अर्जाचा आपण सहानभुतीने विचार कराल अशी मी आशा बाळगुन आहे.
कळावे,
लोभ असावा,
आपला नम्र,

Tuesday, December 04, 2007

स्मरणशक्ती ही शक्ती आहे का विस्मरण ही ताकद आहे ?

नको असलेल्या दुखःद्द आठवणी, कटु अनुभव लांबवर मनात खाली खोल कुठे तरी रेंगाळात रहातात, फार त्रास देतात .
स्मरणशक्ती ही शक्ती आहे का विस्मरण ही ताकद आहे ?
गोड, सुखद आठवणी लगेच विस्म्रुतीत जातात.
खरच, विस्मरण ही ताकद आहे ?

Monday, December 03, 2007

धोका कोणाला माणसाला की वाघाला ? वाघाने दयेचा अर्ज कोणाकडे करायचा?


चंद्रपूरमधील जंगलात नरभक्षक वाघाला अखेर संपविले
आणि हाच गुन्हा माणसाने केला तर ? आधी तो पकडला गेला पाहिजे. त्यात तो सामान्य माणुस असावा, नेताअभिनेता नसावा. मग त्या वर वर्षोनुवर्षे न्यायालयात खटला चालणार, यानेच तो खुन केला हे पुराव्यानिशी सिद्ध करावे लागणार, शिक्षा झाल्यावर तो वरच्या न्यायालयात अपिल करणार, मग त्या वरच्या, दरम्यानच्या काळात तो जामीनीवर बाहेर मोकळा असणार, कधी तो पुराव्याअभावी सुटणार, तर कधी त्याला संशयाचा फायदा मिळणार, तो पैसे मोजुन नामांकीत वकिलांच्या फौजाच्या फौजा आपल्या सहाय्याला नेमणार, ते कायद्याचा किस पाडत रहाणार, आरोपीला आपले ज्ञान व कौश्यल्य पणाला लावुन सोडवणार.

जर का त्याने केलेला गुन्हा सिद्ध झाला की मग त्याला जास्तीत जास्त जन्मठेपेची , सक्तमजुरीची शिक्षा होणार, तुरुंगात त्याला सर्व सुखसोयी मिळणार, त्याच्या मानसीक स्वास्थासाठी आर्ट ऑफ लिव्हींगचे वर्ग घेतले जाणार.

आणि त्यातुन यदाकदाचीत फाशीची सजा झालीच तर तो राष्टपतींकडे दयेचा अर्ज करणार, एखाद्याचे आयुष्य आपण का काढुन घ्यावे यावर मानवतावादी काथ्याकुट करत बसणार.

वाघाने दयेचा अर्ज कोणाकडे करायचा?

मानवाने त्याच्या जंगलात अतिक्रमण केले, निसर्गाचा तोल बिघडवुन टाकला, त्याचे नैसर्गीक भक्ष्य नष्ट केले, आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या, वाघाने मात्र सर्व नीतीनियम पाळावेत, अन्यथा, चार चार शुटर शिकारी त्याला घेरुन त्यावर बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव करुन त्याला यमसदनी पाडणार, त्याच्या छातडावर पाय रोवुन आपले फोटो घेवुन ते दिवाणखाण्यात टांगणार, आपल्या मर्दुमुखीची, मर्दांनगीची निशाणी मिरवीत.

सकाळ - तळोधी नागभीड (जि. चंद्रपूर) ता. ३० - मागील दोन-तीन महिन्यांपासून नागभीड तालुक्‍यात धुमाकूळ घालणाऱ्या तीन नरभक्षी वाघांपैकी एका वाघाला आज सकाळी साडेआठ वाजता गोविंदपूरच्या जंगलात गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यामुळे तालुक्‍यातील नागरिकांनी सुस्कारा टाकला असला, तरी वन्यजीवप्रेमींमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे......

वन्यजीवप्रेमी अस्वस्थ
वन्यजीवप्रेमींमध्ये मात्र या घटनेने प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. "वाघ' या कादंबरीचे लेखक व वाघ अभ्यासक अतुल धामणकर यांनी या घटनेवर प्रचंड नाराजी व्यक्त करून, लोकांना भयमुक्त करण्याचा हा मार्ग नसल्याचे सांगितले. याच लोकांनी वाघांचे नैसर्गिक भक्ष्य मारून टाकले. प्रचंड शिकारी केल्या. यामुळे वाघांसाठी आता जंगलात खाद्यच उरले नाही. परिणामी वाघ गावात येऊ लागले. मात्र, त्यासाठी वाघाला मारणे हा उपाय होऊच शकत नाही. असे अनेक वाघ आता गावात येतच राहतील. त्यामुळे आणखी किती वाघ मारणार, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.
कोणॆ एके काळी आपल्या महाराष्ट्रात आपण किती पुरोगामी आहोत, सुधारणावादी आहोत, आम्ही जात पात मानत नाहीत याचा फार अभिमान असे, अनेक थोर विभुतींचा आम्ही वारसा सांगत असु,

पण आता आम्ही किती मागासलेले आहोत हे सांगायला लागले आहेत, आमचा O.B.C. मधे समावेश करा, आम्हाला या सर्व सरकारी सुखसोयी पुरवा.

वास्तविक पहाता २१ व्या शतकात सर्व बंधने गळुन पडायला हवी होती, मानव केवळ मानव म्हणुन ओळखला जायला हवा होता.

पण !
कोणॆ एके काळी आपल्या महाराष्ट्रात आपण किती पुरोगामी आहोत, सुधारणावादी आहोत, आम्ही जात पात मानत नाहीत याचा फार अभिमान असे, अनेक थोर विभुतींचा आम्ही वारसा सांगत असु,

पण आता आम्ही किती मा

कुणी तरी माझ्या बायकोला हे सांगा रे

दैवाला तो म्हणाला "हात'तिच्या!


त्याचा हसरा चेहरा पाहीला आणि मला माझा सदैव दुर्मुखलेला, रडका, त्रासीक चेहरा आठवला.

तुसी ग्रेट हो. संजय.

( डॉ. योगिनी रा. कुलकर्णी )
आकाशातील वीज कोसळावी तसा संजयला बावीस हजार व्होल्टचा झटका बसला. त्यात एक हात व दुसऱ्या हाताचा मनगटापासूनचा भाग गमवावा लागला. प्रचंड वेदना, अनेक शस्त्रक्रिया सहन करून संजय पुन्हा उभा राहिला आहे. कधीही हार मानायची नाही असे संजयने ठरवले आहे. आजच्या "जागतिक विकलांगता दिना'निमित्त आपणही दैवाला म्हणू या, हात्तिच्या एवढंच ना...!

सकाळ - ०३/१२/०७.

माउली सारे काही तुझ्या दर्शनासी रे

कधी कधी मला प्रश्न पडतो, या २१ व्या शतकात, दळणवळणाच्या सर्व सुखसोयी उपलब्ध असतांना देखील ही सारी माणसे अशी चालत चालत, मजल दरमजल करत, दिवस दिवस प्रवास का बरे करत रहातात ? केवळ आपले पुर्वज त्या काळी असा प्रवास करायचे म्हणुन ? यांच्या कडे येवढी फुरसत असते कशी ?
परत हे भाविक एक्प्रेस्स वे वर काय करत आहेत ? या रस्तावर माणसांना येण्यास बंदी आहे ना. त्यांच्या साठी व वहानचालकांसाठी हे धोकादायक आहे.


Friday, November 30, 2007

सौ. नेने काकुंची जादु चालेल काय ?


जाब मधले "१, २.३,४ ,तेरा करु गिन गिन के इंतजार, आजा पिया आयी बहार", आणि सैलाब मधील "हमको आपका है इंतजार कोई लेके आये प्यार " ची मजा या "आजा नचले " मधे नसावी बुवा.

बंगळुर हवाई अड्डा.

आमच्या कड पुण्यात सहा आसनी रिक्षात बसल र बसल की प्रवासी लगेचच चालकाच्या माग तगादा लावायला सुरवात करतात, अगदी रिक्षा पुर्ण भरायची असली तरी, बोंबाबोंब सुरु, "चला की राव , किती उशीर होतोय , किती कमवाल ? अजुन किती भरायचे आहेत ? किती भराल ? चला, चला, सुटा आता. देणार पाच रुपय , वर रुबाब काय ? वर परत चारच रुपये घेतात तुम्ही काय पाच मागता ?
हीच माणस, विमानात बसल्याबसल्या पायलटबाबाला सांगतात काय ? "बाबारे ६.२० ची वेळ, सात वाजायला आले निघतोयस ना ! घरी बायकामुले वाट बघत असतील . चल ना रे . उशीर होतोय ! "
आपला प्रवाशी बस वाला उगीचच इंजीन चालु करुन ठेवतो, वाटते आता निघेल , आता निघेल , मग तो जरा पुढे बस नेतो, चला, सुटला एकदांचा, परत थांबतो, मग इकडुन तिकडुन प्रवासी गोळा करत निघतो, आतले कावतात, विमानही तसेच, आपले या इथुन त्या तिथुन हवाईअड्डावर फिरव फिरव फिरवतात, वाटत, आली आता आपली धावपट्टी आली, आता उडेल, मग उडेल," देरी की लिये माफी चाहते है कंट्रोल टॉवर की अनुमती न मिलनेके कारण"
उडल रे एकदांचे. हुश्श. बस, ट्रक मागे घेताना कंडक्टर, क्लीनर, हे मागे उभे राहुन "आन देन आन देव करत, गाडी वर थपडा मारत, ड्रायव्हर ला इशारा देतात, तो ड्रायव्हर पण मुंडक काचेतुन बाहेर काढत गाडी मागे घेतो. विमान मागे घेतांना हवाईसुंदरी खाली उतरते काय ?
मग आपल खाण पिण, ऐवढ्याशा जागेत केवढी कसरत करायला लागते!
मुंबईला विमान टच झाल, लगेचच तुंबलेल्या गडयांनी आपापले मोबाईल बाहेर काडुन स्विच ऑन करायला सुरवात केले. आत्ताच प्लेन लॅड झाल ,तासाभरात पोचतो.
एवढा वेळ "स्टे कनेक्टेड " नाही म्हणाजे काय ? हाउ हॉरीबल !

Thursday, November 29, 2007

एक्प्रेस वे वर पुण्याला जाताना थांबण्यासाठी बहाणा - १


एक्प्रेस वे वर पुण्याला जाताना थांबण्यासाठी बहाणा - १ भगत ताराचंद आणि डाल फ्राय , मके की रोटी, मुंगडाल हलवा, आल्हाददायक रात्र, सुखद गारवा, ती आणि मी.

या या या गंमत जंमत

आमचा विश्वासघात झालाय ! चिंतन आणि मननवाले अध्यक्ष गरजले. तुम्ही दिलेला शब्द मोडलात.

मग हळुच म्हणाले वा ! मज्जा आली असा खेळ खेळायला. परत करतायना विश्वासघात ? अस काय करता, कराना, प्लीज, एकदाच. मग आपण निवडणुक, निवडणुक खेळु.
मग त्यांनी सरकार स्थापन केले. परत विश्वासघात करुन घेण्यासाठी.
पण त्यांना कुठे ठावुक होते कोणती ही गोष्ट एकटी, एकटी मिळत नाही. मग त्यात बॅक मॅजीक आले, जारण मारण आले. ( हे माझे मत नव्हे. सिंहासनावरुन पाय उतार झालेल्यांचे हे थोर विचार )
अंधश्रद्दावाल्यांनो ऐकता आहात ना ? आपली भारताची घटना याबाबत कात म्हणते ?

Wednesday, November 28, 2007

मनोहर मंगल कार्यालयात - खाण्यासाठी . लग्नासाठी नव्हे.


डामडौल नसलेले, फुकटचा भपका नसलेले, पोटाला सोसेल असे, तरी पण रुचकर, चविष्ट , स्वादिष्ट, अश्या उपहारगॄहाच्या शोधात असतांना अचानक नजर गेली बाहेर झळकणाऱ्या पाटॊ वर, "अंबाडयाची भाजी व भाकरी ". आत डोकावुन बघितले ते पुढच्यावेळी नक्की येण्याचा पोटाला वायदा करुनच. ( खर म्हणजे अंबाडयाची भाजी हा प्रकार माझ्यासाठी परकिय )
कार्यक्रम संपल्यानंतर तॄप्त मनाला तॄप्त पोटाची साथ हवी या योग्य विचारांती आम्ही पोहोचलो, मनोहर मंगल कार्यालयाच्या आवारात असलेल्या साध्या, सोप्या, सरळ, उपहारगृहात, सफेद वाटाणा उसळ -भाकरी व ओल्या कांद्याच्या पातीची भाजी-भाकर खाण्यासाठी व ब्रांम्हणी पद्धतिची आमटी ओरपण्यासाठी. येथे ठराविक वारी पिठलेभाकरी ही मिळते.
सोबत थालीपिठ , इ. पण मिळते. स्मॄतीने धोका दिला. इतर पदार्थ आठवत नाहीत.


पुर्ण चंद्रमा गगन बिराजे



त्रिपुरी पोर्णिमेचा चांद.
तु चंदा शितल कहलाता फिर क्यु मेरे अंग जलाता !
फुलसा कोमल बाण मदनका शुल बनके तनमे क्यु चुभ जाता !

वाहे गुरु वाहे गुरु सतनाम वाहे गुरु




Sunday, November 25, 2007

मस्त सुरमई शाम व रात्र



"आमच्या घरात अजूनही पुरुषप्रधान संस्कृति आहे,

ती राणी आहे आणि मी प्रधान "


प्रसाद शिरगावकर आपला कविता वाचनाचा कार्यक्रम करत होते, खुले घरकुल लौंन, नभीत पूर्ण बहरालेला त्रिपुरी पौर्णीमेचा चंन्द्र, हवेत सुखद हवाहवासा गारवा, मदहोशी धुंदफुंद वातावरण, सोबतीला "ती " (राणी ) , वर परत सुरांची नशा ,


और क्या चाहिये जीने के लिए ?


डी.एस.के नी काल त्यांच्या परिवारातील लोकांसाठी सुरेख मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। खास मुंबई वरुन पुण्याला आलो ते या कार्यक्रमाचे निमित्त घेवुन, डी.एस.के वरील प्रेमापोटी ।

त्यात परत वहिनींचे ( डी.एस.के. यांच्या पत्नी ) एक नवे रूप पाहायला मिळाले। त्यांनी दोन सुरेल भावगीते गायली ।


बहार आली।

Friday, November 23, 2007

लुडबुड

आयुष्य सुरळीत सुरु असते, त्रासदायक काळ सरलेला असतो, अश्यावेळी मग त्रास होतो तो तुमच्या आयुष्यात अनाहुतपणे लुडबुड करणाऱ्यांचा,ढवळाढवळ करणाअऱ्यांचा, फुकटचे सल्ले देणाऱ्यांचा, संबध नसतांना सुद्धा नको तेथे नको त्या वेळी अनावश्यक शेरेबाजी करणाऱ्यांचा.
पर त्यात त्यांचा स्वःताचा परमस्वार्थ साधत असेल तर एक वेळ त्यांची भुमिका आपण समजुन घेवु शकतो . पण उगाचच ? केवळ गंमत म्हणुन ?
किंवा ....................
चुकी आपलीच असते, आपणच योग्य ते अंतर राखलेले नसते.
चिमुटभर मिठाची गरज असता भलत्याच प्रेमापोटी बचकाभर मीठ आपल्या तोडात कोंबले जाते. भीडभाड आपणच बाळगायची असते. का ?

Wednesday, November 21, 2007

अदनान सामी ,आपके लिये खास खुशखबर

प्राणायाम करायला सुरवात केल्या वर दोन दिवसात चक्क पाच किलो वजन कमी होवु शकते ?

या आधी म्हणे, डायटींग केले, फळांचा रस पिवुन राहीले , पण बाबा, कश्शाचा , कश्शाचा म्हणुन उपयोग झाला नाही, तुमच्या शिबिरात आले , दोन दिवसा पुर्वी ६४ किलो वजन होते , बाबा आज मी वजनाच्या काट्यावर उभी राहीले , विश्वास बसेना, पाच पाच वेळा चेक केले, बाबा, पाच किलो वजन प्राणायाम करुन कमी झाले.
असे वा ! काय म्हणाता ? ते पण दोन दिवसात ! वा वा, अजुन पाच दिवस शिबीर आहे। बघुया आणखी किती प्रगती होते ती !

धन्य हो, धन्य हो। नशीब माझे, शिबिर महिनाभर नाही , नाहीतर या वेगाने महिनाभरात वजन शुन्यावर पोचेल.

तेव्हा एक दिर्घ श्वास घ्या , १,२,३,४,५,६,७, आता सोडा.
दुनिया झुकती है रे , झुकती है !!

तुलशीबाईंच्या लग्नाला यायच बर का !