Monday, December 03, 2007

धोका कोणाला माणसाला की वाघाला ? वाघाने दयेचा अर्ज कोणाकडे करायचा?


चंद्रपूरमधील जंगलात नरभक्षक वाघाला अखेर संपविले
आणि हाच गुन्हा माणसाने केला तर ? आधी तो पकडला गेला पाहिजे. त्यात तो सामान्य माणुस असावा, नेताअभिनेता नसावा. मग त्या वर वर्षोनुवर्षे न्यायालयात खटला चालणार, यानेच तो खुन केला हे पुराव्यानिशी सिद्ध करावे लागणार, शिक्षा झाल्यावर तो वरच्या न्यायालयात अपिल करणार, मग त्या वरच्या, दरम्यानच्या काळात तो जामीनीवर बाहेर मोकळा असणार, कधी तो पुराव्याअभावी सुटणार, तर कधी त्याला संशयाचा फायदा मिळणार, तो पैसे मोजुन नामांकीत वकिलांच्या फौजाच्या फौजा आपल्या सहाय्याला नेमणार, ते कायद्याचा किस पाडत रहाणार, आरोपीला आपले ज्ञान व कौश्यल्य पणाला लावुन सोडवणार.

जर का त्याने केलेला गुन्हा सिद्ध झाला की मग त्याला जास्तीत जास्त जन्मठेपेची , सक्तमजुरीची शिक्षा होणार, तुरुंगात त्याला सर्व सुखसोयी मिळणार, त्याच्या मानसीक स्वास्थासाठी आर्ट ऑफ लिव्हींगचे वर्ग घेतले जाणार.

आणि त्यातुन यदाकदाचीत फाशीची सजा झालीच तर तो राष्टपतींकडे दयेचा अर्ज करणार, एखाद्याचे आयुष्य आपण का काढुन घ्यावे यावर मानवतावादी काथ्याकुट करत बसणार.

वाघाने दयेचा अर्ज कोणाकडे करायचा?

मानवाने त्याच्या जंगलात अतिक्रमण केले, निसर्गाचा तोल बिघडवुन टाकला, त्याचे नैसर्गीक भक्ष्य नष्ट केले, आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या, वाघाने मात्र सर्व नीतीनियम पाळावेत, अन्यथा, चार चार शुटर शिकारी त्याला घेरुन त्यावर बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव करुन त्याला यमसदनी पाडणार, त्याच्या छातडावर पाय रोवुन आपले फोटो घेवुन ते दिवाणखाण्यात टांगणार, आपल्या मर्दुमुखीची, मर्दांनगीची निशाणी मिरवीत.

सकाळ - तळोधी नागभीड (जि. चंद्रपूर) ता. ३० - मागील दोन-तीन महिन्यांपासून नागभीड तालुक्‍यात धुमाकूळ घालणाऱ्या तीन नरभक्षी वाघांपैकी एका वाघाला आज सकाळी साडेआठ वाजता गोविंदपूरच्या जंगलात गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यामुळे तालुक्‍यातील नागरिकांनी सुस्कारा टाकला असला, तरी वन्यजीवप्रेमींमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे......

वन्यजीवप्रेमी अस्वस्थ
वन्यजीवप्रेमींमध्ये मात्र या घटनेने प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. "वाघ' या कादंबरीचे लेखक व वाघ अभ्यासक अतुल धामणकर यांनी या घटनेवर प्रचंड नाराजी व्यक्त करून, लोकांना भयमुक्त करण्याचा हा मार्ग नसल्याचे सांगितले. याच लोकांनी वाघांचे नैसर्गिक भक्ष्य मारून टाकले. प्रचंड शिकारी केल्या. यामुळे वाघांसाठी आता जंगलात खाद्यच उरले नाही. परिणामी वाघ गावात येऊ लागले. मात्र, त्यासाठी वाघाला मारणे हा उपाय होऊच शकत नाही. असे अनेक वाघ आता गावात येतच राहतील. त्यामुळे आणखी किती वाघ मारणार, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

2 comments:

A woman from India said...

नितीमुल्यांचा छोटासा परिघ. मानवकेंद्रिततेची सीमा.

HAREKRISHNAJI said...

I was missing your comments and wondering whether you have stopped visiting my blog.