Monday, December 10, 2007

मी उतावळा नारद

निवांत पणा म्हणजे तरी किती ? काळ जणु थबकलाय . चहाचा प्याला हळुवार पणे उचलीत आपल्या ओठी लावत एक हल्कासा घोट घेत परत त्याच वेगाने मेजावर प्याला परत, काळ पुन्हा गोठला, एक लंबीसी पॉज. परत तीच क्रिया. वैशालीत एकच गॄहस्थ चार जणांचे टेबल अडवुन बसलेले. सकाळची वेळ. नेहमी प्रमाणॆच बऱ्या पैकी गर्दी, आम्ही ही सर्व भुकेले, नुकतेच मुंबईवरुन केवळ वैशालीत न्याहारीला जायचे म्हणुन न थांबता तडक पोहोचलेलो. त्या व्यक्तीस जगाशी काहीच देणेघेणे नाही , आपल्याच विश्वात गर्क. चला आता, राव साहेब आटपा आता लवकर, येवढे सुख उपभोगायचेच आहे तर पंचतारांकीत हॉटेलात जावे. उडप्या कडे काय काम ? खुप इतर जण खोळंबलेले आहेत, माझा भुकेल्या पोटी चरफराट. येथे उभे रहा , ही जागा रिकामी होत आहे, म्हणुन आम्ही तेथे जागा अडवुन प्रतिक्षेत. भरवश्याच्या म्हशीला टोणगा.

प्रसंग दुसरा. विमानातील गॅंग वे. साहेबांनी आपला सुट काढुन तो प्रवासात जपुन ठेवण्यासाठी हवाईसुंदरीच्या हाती दिला. अर्धा मिनीटाचेच हे काम असावे. पण मग सुचना सुरु, अनुभव कथन चालु. गेल्या खेपेच्या प्रवासात आलेला अनुभव तिला साग्रसंगीत सांगणॆ, तिच्या कडुन प्रत्येक खिसा तपासुन घेणे, शायनींग शायनीग आणि शायनींग, आपल्या प्रभावी व्यक्तीमत्वाचा भक्ष्यावर एक प्रयोग. राव साहेब मागे रांग लागली आहे आम्ही सारेच जण आपापल्या आसनाकडे जाण्यासाठी ताटकळत उभे आहोत. आधीच विमान सुटायला चांगलाच उशीर झालाय. चला आता , आपले स्थान ग्रहण करा. मधेच एक शहाणे आपल्या मोबाईल वरुन घरच्यांची संभाषणात मग्न. पपा, मी विमानात शिरलो, आता जागेवर बसत आहे, साडे आठच्या सुमारास मुंबईस पोचीन, मग घरी येईन, इ.इ.इ. हवाईसुंदरीच्या मोबाईल बंद करा या सांगण्याकडॆ संपुर्ण दुर्लक्ष. भाऊसाहेब आपण किती महत्वाची व्यक्ती आहात. आता तरी सुचना पाळा.

घरी लवकर जाण्याची घाई. समोरच टॅक्सी उभी राहीली. आत एक तरुणी मोबाईल वर बोलण्यत तल्लीन, भाडे किती झाले माहीती करुन घ्यायची गरज नाही , एका हातात मोबाईल, सारे लक्ष बोलण्यात केंद्रीत, दुसरा हात पर्स मधे घालुन पैसे शोधण्याचा विफल प्रयत्न , पैसे काही सापडत नाहीत, बोलणे काही संपत नाही, मागचे गाडीधारकांचे कर्णॆ कोकलताहेत, मग ३०-३५ रुपयाच्या भाडे देणासाठी ५०० ची नोट , त्याच्या कडे स्वाभाविकपणे सुटे पैशे नाहीत, मग एका तोंडाने चालकाशी संभाषण, दुसऱ्या मुखाने मोबाईल वर. कसरत काही संपत नाही, मोबाईल काही सोडवत नाही.

मी उतावळा नारद का यांनाच दुसऱ्यांचे भान नाही ?

2 comments:

Tulip said...

haha.. i can imagin the irritation:)). typical mumbaikar ahat harekrushnaji tumhi. mala pan agadi raag yeto asalya chengat, santh manasancha.

HAREKRISHNAJI said...

हो ना. मुंबईत आयुष्य अगदी धावपळीचे आहे. तरी बरे माझे कार्यालय घराजवळच आहे. ट्रेनचा प्रवास अजुन पर्यंत करायला लागलेला नाही.