Wednesday, December 26, 2007

सावधान गनिमाचा वेढा गडाला बसलाय


आदेश केवळ एक आदेश पुरेसा आहे , आपले कुलदैवताचे ,आई एकाविरेचे ,निवासस्थान असलेल्या कार्ला गडाला स्वच्छ, सुंदर, हिरवा, करण्यास , प्लास्टिक च्या विळख्यातुन सोडवण्यास, नारळाच्या शेब्यातुन सोडवण्यास, सारा परिसर कचरा मुक्त करण्यासाठी
बघवत नाही हो ही दुर्दशा , हजारो , लाखो भाविक येथे येतात , हार वेण्या, नारळ खरेदी करतात , प्लास्टिक च्या पिशव्या , सारा कचरा डोंगरा वरुन खाली लोटून मोक़ळे होतात, परिसराच्या साफसफायीचे नाव नाही, परत नैसर्गीक विधी करता योग्य त्या सोई नसल्यामुळे सर्व काही खुल्लमखुल्ला ।
कार्लाचे सर्वात मोठे दुर्दैव कोणते असेल तर या देवळाजवळील असलेल्या अद्वितिय बुद्धलेण्यांचे.
3rd to 2nd century B.C या काळात ती बांधली गेली. अश्या प्रकारची ती भारतातील एक्मेव लेणी असावीत. ना आम्हाला त्याची जाणीव ना महत्व.
अपूर्ण



2 comments:

A woman from India said...

भाविकांकडुन स्वच्छतेचे पैसे घेऊन पूर्णवेळ स्वच्छता कामगार नेमायला हवे.

HAREKRISHNAJI said...

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हि कुलदेवता, वरचे वर ठाकरे कुटुंबींयाचे येथे दर्शनसाठी जाणॆयेणे असते , त्यांचेच एक प्रभावी नेते येथले प्रमुख , पण जाणिव , त्याचे काय