अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Saturday, December 29, 2007
रीसीका मिश्रा - कथ्थक - स्वामी हरीदास संगीत संमेलन
छलांग, हीच ती छलांग, झनक झनक पायल बाजे चित्रपट पाहिलेल्यांच्या सदैव स्मरणात राहिलेली, एका सीन मधे कथ्थक नॄत्य करीत असता गोपीकॄष्णांनी मारलेल्या त्या छलांगची परत एकदा आठवण करुन दिली ती रीसीका मिश्रा यांनी. ही कलावंत गोपीकॄष्ण यांच्या भाचीची मुलगी.
दोनच दिवसा पुर्वी रीसीका चा कार्यक्रम याच रंगमंचावर झाला होता, पण अत्यंत अवमानक परीस्थीतीत तिला तो सादर करायला लागला होता , आणि याला कारणीभुत होती तिचीच आजी, दस्तुरखुद्द द ग्रेट सीतारा देवी. काही जणांना आपण कोठे थांबावे हे कळात नाही, आपला जमाना केव्हाच संपला आहे हे कळत नाही, या मशहुर नर्तकी त्या पैकी एक. त्यांनी आपल्या नातीच्या कार्यक्रमाचा विनाकारण जीवघेणी प्रेमळ लुडुबुड करत सारा विचका करुन टाकला. गायला बसलेली आपली आई , स्टेज वर खुर्चीत ठाण मांडुन बसलेली, सतत सुचना देणारी . बेटा ये करके दिखाव, वो करो, ऐसा करो , वैसा करो, हमारे जमानेमे, सांगत गोंधळात गोंधळ करणारी आपली आजी व तबल्यावर साथसंगत करणाऱ्या पं. कालीनाथजी या तिहेरी कात्रीत सापडलेल्या रिसीकाने कसेबसे आपले नॄत्य संपवले. असा प्रसंग वैऱ्यावर ही न यावा.
या लहान मुलीला सितारादेवींनी अवघड व न येणारे नॄत्यप्रकार करायला लावले , एकीकडे आई व ती, जे काही सादर करायचे ते ठरवुन आलेल्या. सावळा गोंधळामधे सर्वच कठीण होत गेले.
मला वाटते, दोन दिवसांनी तिला परत संधी दिली गेली , पण जित्याची खोड ! या वेळी सुद्धा माफक प्रमाणात जे व्हायचे ते झाले. रस्सी जली मगर बल नही जला. परंतु आपला तोल न जावु देता रिसीका ने अप्रतीम कथ्थक नॄत्य सादर केले. मजा आली.
या मुलीचे भवितव्य खुप उज्ज्वल आहे, कथ्थक त्यांच्या रक्तात आहे, एक दिवस ही सर्वोत्तम नॄंत्यागना बनणार आहे.
तेव्हा माझ्या नातवंडांना सांगण्यासाठी माझ्या कडॆ सांगण्यासाठी काहीतरी असेल.
(ही माझी वैयक्तीक मते आहेत, कोणाचाही अपमान करण्याचा माझा हेतु नाही )
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment