बस्स ऐवढेच ? केवळ कानउघडणीवर सुटका ? निर्दोष वाघीणीला तब्बल ३९ गोळ्या झाडून ठार मारल्या बद्द्ल ? काय पण अज्ञानाची किंमत ? ताशेरे आणि खुलासे ? वन्य प्राण्यांना केवळ फोटोत बघण्याची वेळ आल्या नंतर ही ?
धन्य ते वनखाते धन्य ते वनमंत्री.
महाराष्ट्र टाईम्स मधुन -
प्राण्यांना गुंगी आणणाऱ्या बंदुका कमी, * कर्मचाऱ्यांचीही वानवाच - संजय व्हनमाने, मुंबई वन्यप्राण्यांचे संरक्षण करा, अशी हाकाटी करणाऱ्या वन विभागाकडे संरक्षित वनक्षेत्राबाहेर आलेल्या प्राण्यांना बेशुद्ध करून पुन्हा जंगलात सहीसलामत सोडण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी-कर्मचारी तसेच या कारवाईसाठी आवश्यक बंदुका यांची मोठी कमतरता असल्याचे समजते. सुमारे शंभर प्रशिक्षित अधिकारी-कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना जेमतेम दोन ते तीनच अधिकारी असल्यानेच चंदपूर जिल्ह्यातील ब्रह्मापुरीत वाघाचा बळी गेला, असे वनखात्यातच बोलले जात आहे. ब्रह्मापुरीत एका नरभक्षक वाघाने चार जणांचा बळी घेतल्याने गावकऱ्यांमध्ये असंतोष होता. लोकक्षोभ लक्षात घेऊन नरभक्षक वाघाला मारण्याचा निर्णय झाला; पण दिसलेला वाघ नरभक्षकच असल्याचे समजून तब्बल ३९ गोळ्या झाडून त्याला ठार मारण्यात आले. तो वाघ नरभक्षक नव्हताच! वाघ वा अन्य प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठीच्या विशिष्ट बंदुका वन विभागाकडे नसल्याने हा प्रकार झाल्याची माहिती पुढे आली आहे. प्राण्यांना गुंगी आल्यानंतर त्याच्यावर योग्य ते उपचार करुन पुन्हा जंगलात सोडले जाते. मात्र असे तंत्र अवगत असलेले जेमतेम दोन ते तीनच अधिकारी वन विभागाकडे सध्या आहेत. अधिकारी व कर्मचारी यांच्या अज्ञानातून विनाकारण एक वाघ मारला गेला याबद्दल वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी त्यांची कानउघडणी केली आहे. राज्यात संरक्षित वनक्षेत्राबाहेर वन्यप्राण्यांची अवस्था दयनीय असल्याचे ताशेरे त्यांनी या पत्रात मारले आहेत. राज्यातील काही धाब्यांवर वन्यप्राण्यांचे मांस खायला मिळत असल्याच्या तक्रारी आल्या असून त्याबद्दलही त्यांनी अधिकाऱ्यांकडून खुलासे मागवले आहेत.
3 comments:
kaThin aahe naahee.
aaNi van ma.ntri tarii kaay te khajgeet mhatle asateel , ek vaagh melyaane kaay fark padatoy?
maajhi pratikriyaa ajun naahii aalii yethe???
Thanx for the comments. My PC at home is down and Sat /Sun being holiday had no access to internet.
What you have said about the politicians is true. I do not think they are so sensitive.
Post a Comment