Friday, November 30, 2007

बंगळुर हवाई अड्डा.

आमच्या कड पुण्यात सहा आसनी रिक्षात बसल र बसल की प्रवासी लगेचच चालकाच्या माग तगादा लावायला सुरवात करतात, अगदी रिक्षा पुर्ण भरायची असली तरी, बोंबाबोंब सुरु, "चला की राव , किती उशीर होतोय , किती कमवाल ? अजुन किती भरायचे आहेत ? किती भराल ? चला, चला, सुटा आता. देणार पाच रुपय , वर रुबाब काय ? वर परत चारच रुपये घेतात तुम्ही काय पाच मागता ?
हीच माणस, विमानात बसल्याबसल्या पायलटबाबाला सांगतात काय ? "बाबारे ६.२० ची वेळ, सात वाजायला आले निघतोयस ना ! घरी बायकामुले वाट बघत असतील . चल ना रे . उशीर होतोय ! "
आपला प्रवाशी बस वाला उगीचच इंजीन चालु करुन ठेवतो, वाटते आता निघेल , आता निघेल , मग तो जरा पुढे बस नेतो, चला, सुटला एकदांचा, परत थांबतो, मग इकडुन तिकडुन प्रवासी गोळा करत निघतो, आतले कावतात, विमानही तसेच, आपले या इथुन त्या तिथुन हवाईअड्डावर फिरव फिरव फिरवतात, वाटत, आली आता आपली धावपट्टी आली, आता उडेल, मग उडेल," देरी की लिये माफी चाहते है कंट्रोल टॉवर की अनुमती न मिलनेके कारण"
उडल रे एकदांचे. हुश्श. बस, ट्रक मागे घेताना कंडक्टर, क्लीनर, हे मागे उभे राहुन "आन देन आन देव करत, गाडी वर थपडा मारत, ड्रायव्हर ला इशारा देतात, तो ड्रायव्हर पण मुंडक काचेतुन बाहेर काढत गाडी मागे घेतो. विमान मागे घेतांना हवाईसुंदरी खाली उतरते काय ?
मग आपल खाण पिण, ऐवढ्याशा जागेत केवढी कसरत करायला लागते!
मुंबईला विमान टच झाल, लगेचच तुंबलेल्या गडयांनी आपापले मोबाईल बाहेर काडुन स्विच ऑन करायला सुरवात केले. आत्ताच प्लेन लॅड झाल ,तासाभरात पोचतो.
एवढा वेळ "स्टे कनेक्टेड " नाही म्हणाजे काय ? हाउ हॉरीबल !

No comments: