Thursday, November 15, 2007

नियम म्हणजे नियम - ३

पंजाबी ड्रेस (घालणॆ यात वाईट किंवा चुकीचे काय आहे ? ) घालुन तुम्हाला आत प्रवेश करता येणार नाही, बाहेर थांबा.

स्थळ - शिवसॄष्टी, देरवण, चिपळुन जवळ.

मुद्दामुन वाकडी वाट करुन आम्ही गेलो ते प्रवेश नाकारुन घेण्यासाठी.

पुरुषांनी, साहेबाच्या देशातुन आलेले शर्ट, पॅण्ट घातलेले त्यांना चालतात. ( त्यांना धोतर, सदरा, बंडी, वगैरे नको का ?)

बायकांनी पाचवारी साड्या नेसलेल्या चालतात ( त्यांनाही पारंपारीक नववारी साडी नेसल्यासच प्रवेश का देण्यात येवु नये ? )

3 comments:

Vaidehi Bhave said...

अगदी सहमत आहे....मी आत्तापर्यंत ३-४ वेळा डेरवण येथे गेले आहे.. अजूनपर्यंत एकदाही आतमध्ये प्रवेश मिळालेला नाही...अगदी शाळेत पाचवी ईयत्तेत असताना शाळेच्या सहलीत गणवेशात असल्याने सर्व मुलींना बाहेरच थांबावे लागले होते. असले नियम का आहेत कळतच नाही ???

A woman from India said...

एखादी सिलेब्रिटी येऊ द्या, सगळे नियम धाब्यावर बसवुन त्यांना प्रवेश देतील.

Asha Joglekar said...

खरंय . लकिली मी साडीत असेन म्हणून पण पहाता आलं डेरवण