Friday, November 09, 2007

स्टेटस - नरीमन पॉइंट

दिपावलीत घरात चुल म्हणुन पेटवायची नाही, असे आमच्या हिटलरनी ठरवले असावे. (तरी बर घरी जेवण करावयास "कुक" आहे ). कालच्या "मचाण" च्या धक्कातुन माझा खिसा सावरतोय न सावरतोय, जड पेशावरी जेवणानंतर पोट परत लेव्हलला येतय तोच नवा फतवा निघाला " आज आम्ही ठरवलय की सकाळी आपण "स्टेटस " मधे जेवायला जायचे आहे. नो अपिल.

पोटात लिंबुरस, "आले" मारकेचा उतारा घेवुन स्वारी निघाली नरीमन पॉइंट वरील या शुद्ध शाकाहरी हॉटेलात. लक्ष्मी पुजनाच्या निमित्ते आज सकाळी महाप्रचंड गर्दी येथे उसळली होती. अश्या वेळी उपहारगृहे टाळायला हवीत , पण हे सांगण्यासाठी मुळातच अंगात धाडस असायला लागते ना. मग जे काही पदरी पडते ते चवदार , रुचकर मानुन खायला लागते. तस बघायल गेल तर हे आमच्या आवडीचे ठिकाण. येथे डोसा ईडली , उत्तप्पे आधी दाक्षिण्यात्य पदार्थ ही चांगले मिळातात. परत वरती सांबार,चटणी हवी तेवढी.
परत आज काजु मलई मटार.पनीर तिक्का मसाला, चना मसाला , कुलचे या जड पंजाबी भाज्यांचे , पोटावर अत्याचार झाले. भाज्या आज खुपच तेलकट व मसालेदार होत्या. परत वर केशर पिस्ता कुल्फी.
गेल्या आठवडया पासुन मी रजेवर आहे. या रजेच्या काळात जे काही श्रम झाले आहेत त्या श्रमपरिहारा साठी परत रजा घ्यावीशी वाटणार आहे वाटते.

No comments: