Friday, November 16, 2007

210 c Coffee & Cakes



राजाभाऊ, जग केव्हाच कितीतरी पुढे निघुन गेलय की हो ! तुम्ही अजुन कधी पर्यंत आपल्या याझदानी बेकरी, कयानी, मेरवान, रैल्वे बेकरी नां कवटाळुन बसणार आहात ? पहा जरा आपल्या आजुबाजुला. जुने ते सोने मान्य पण नविन तर पॅटेनीयम आहे हो.


आज परत म्हटले छोकऱ्यासाठी काहीतरी हटके घेवुन जावु. बिच्चारा लई अभ्यास करतोय, मग २१० सी. कॉफी व केक (सम्राट, चर्चगेट) मधुन ब्लुबेरी चीज केक घेतला. किती दिवस तेच चॉकलेट केक खायचे ?
मग स्वारी ब्रेड ( पाव) कडे वळली. (इराण्याचे ब्रुनमस्का, बनमस्का खावुन खावुन दिवस गेले. या वयात नसती थेरं ). बनाना, बनाना वॉलनट, चीज, चीज गार्लीक मसाला, पानीनी, कॅरेट, टोमेटो, मींट, ग्रीन टी , पेटीट होलव्हीट, होलव्हीट चोकोचीपस वॉलनट्स, होलव्हीट हनी , होलव्हीट ऍपल सीनेमॉन , सोया, नाचणी, हे सारे प्रकार पावचे ? खर की काय ? की आपली उगाचच मस्करी ?


आरारार, देवा रे हे पेस्ट्रीचे, पायचे, मुस, मफीन, ब्राउनी, पफ चे प्रकार पाहुन टक्कुरच फिरले की ! काय खावु न काय नाही ?


ता.क. मेन्यु वाचत हे लिहीता लिहीता माझा बापाला मी लिहीणे बंद करायला लावले. नाहीतर रात्री त्याला झोप लागायची नाही.

2 comments:

सर्किट said...

तुम्ही हे असे छानछान फोटो आम्हाला दाखवून जळवता, म्हणून तुमचे दुष्मन बहोत वाढतात, बरं कां! ;-)
दिवे घ्या!

HAREKRISHNAJI said...

सर्किट,
काय पण मस्त आणि भन्नाट कॉमेंट्स टाकली आहेत. वाचुन खुप बर वाटल.
आपल्याचा जळवायला अजुन खुप आवडॆल.