Saturday, November 10, 2007

गिरगाव रंगावली ग्रुप व रंगावली प्रदर्शन




for details please log in to
http://www.girgaonrangavaligroup.com/

आज रंगावली प्रदर्शन पाहाताना," अप्रतीम, सुरेख, मस्तच, टॉप, व्हाव, उत्तम, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ, सुंदर, छानच, लव्हली, झकास, सही, वा, सुपर्ब, मार्व्हलस, मान लिया " आदी, एकादी अद्वितीय कलाकृती पाहिल्यानंतरच्या बघणाऱ्यांच्या जेवढ्या जेवढ्या जगात उत्स्फुर्त प्रतिक्रीया होत असतील त्या सर्व ऐकु येत होत्या. कशी काय काढली असेल ? कित्ती मेहनत आहे ही रांगोळी काढतांना ! या साऱ्या रांगोळ्या बघतांना भानच हरपायला होते ! हे कलावंत किती उत्कॄष्ट निर्मीती करत असतात! यांच्या कडुन हे सारे कोण करवुन घेत असेल ? दिल खुश हुवा !

केवळ आपला हा छंद , कला लोकांपर्यंत पोहचवायला, त्यांना नितळ आनंद द्यायला, निव्वळ आपल्या आंतरीक समाधानासाठी हे अवलीया कलावंत या दिवाळीच्या दिवसात देहभान हरपुन सतत दोन दोन दिवस या रांगोळ्या काढत असतात. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. परत या मधुन व्यावसाईक लाभ काहीच नाही. केवळ सारे कले साठी. या अजरामर कलाकृतीचे आयुष्य ही क्षणभंगुर, केवळ दहा बारा दिवस. पण हे दहा बारा दिवस साऱ्या वर्षासाठी पुरतात.

दर वर्षी दिवाळी आली की सर्व प्रथम आठवण होते, ओढ लागते ती या रंगावली प्रदर्शनाची. गेली अठरा वर्षे "गिरगाव रंगावली ग्रुप " , भीमाबाई राणॆ म्युनिसिपल शाळा, सेंट्रल प्लाझा समोर, गिरगाव येथे रंगावली प्रदर्शन भरवत आहेत. यंदा १४ नोव्हेंबर पर्यंत हे प्रदर्शन खुले आहे. हे जर का पाहीले नाही तर जीवनातील एका अमुल्य अनुभुतीस आपण मुकु.

वास्तविक पहाता येथे फोटो काढण्यास मनाई आहे. लोक फोटो काढुन त्याचा गैरफायदा घेतात. संयोजकांनी मला एक दोन फोटो घेण्यास परवानगी दिली त्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे. स्पष्ट सुचना लिहीलेल्या असतांना सुद्धा कॅमेरा बाहेर काढण्याचा प्रमाद माझ्या हातुन घडला, खर म्हणजे मी आधीच संयोजकांची परवानगी घ्यायला हवी होती. मी चुकलो.

"गिरगाव रंगावली ग्रुप " याच्या शब्दात सांगायचे झालेच तर
गिरगांवातील रंगवल्लीचा असणारा हा "गिरगाव रंगावली ग्रुप " म्हणजे विविध क्षेत्रातील नामवंताचा रांगोळीतुन घडवलेला साक्षात्कार. कर्तुत्वातुन सौदर्य अविष्कार दाखवून सामान्यांना सॄष्टीतील दॄष्ट्री दाखविणारा व दिपावलीची नेत्रसुखद भेट देणारा.

विविध नवोदित कलावंताना कलाशैली तंत्राचा वापर करुन मानसीक आनंद प्राप्ती , ज्ञान व वास्त्वता, एकाग्रता, कौशल्यासाठी प्रयत्नशील असा हा गॄप, व्यक्तीचित्रासाठी व वास्तववादी चित्रासाठी आग्रहशील. यंदाच्या १९ वर्षी ह्या ग्रुपने रंगावली प्रदर्शनात वर्षभरातील महत्वपूर्ण घटना - शैक्षणीक , कलात्मक, सामाजीक इ. क्षेत्रातील विषयांची रांगोळीतुन मांडणी केली आहे. प्रदर्शन पहाताना प्रदर्शनाची आखणी, रांगोळीसाठी हवाबंद हॉलमधील व्यवस्था रंगावली चित्रावरील कल्पक शीर्षके यामुळे सर्व कलारसिकांना ही रंगावली चित्रे पाहायला मिळतात.



यंदाच्या प्रदर्शनात रंगरेखाटनाद्वारे ३ कलाकॄती निर्माण झाल्या आहेत. "

5 comments:

A woman from India said...

सुंदर रांगोळ्या.

Mahek said...

WOW!!!
Thanks for showing us some of the Rangolis i have never visited any exhibition before , no time during Diwali time. But because of you we could see those thanks again...

HAREKRISHNAJI said...

Mahek,

It's open till Nov 14. You can still visit the same.

Vaidehi Bhave said...

फार सुंदर रांगोळ्या आहेत,
धन्यवाद त्यांची लिंक टाकल्याबद्दल.

कोहम said...

tumhi mala ekdam gharachich athavan karun dilit ki. bheemabai rane shalechya samorachya gallit me rahato....dar varshi jayacho jevha shakya hota...ata shakya hot nahi....pan tumachya blog var rangolya pahun khup chaan vatala.....amache chitrakaleche sir C.P. Joshi purvi tithe asayche...ata asatat ka mahit nahi