Friday, November 23, 2007

लुडबुड

आयुष्य सुरळीत सुरु असते, त्रासदायक काळ सरलेला असतो, अश्यावेळी मग त्रास होतो तो तुमच्या आयुष्यात अनाहुतपणे लुडबुड करणाऱ्यांचा,ढवळाढवळ करणाअऱ्यांचा, फुकटचे सल्ले देणाऱ्यांचा, संबध नसतांना सुद्धा नको तेथे नको त्या वेळी अनावश्यक शेरेबाजी करणाऱ्यांचा.
पर त्यात त्यांचा स्वःताचा परमस्वार्थ साधत असेल तर एक वेळ त्यांची भुमिका आपण समजुन घेवु शकतो . पण उगाचच ? केवळ गंमत म्हणुन ?
किंवा ....................
चुकी आपलीच असते, आपणच योग्य ते अंतर राखलेले नसते.
चिमुटभर मिठाची गरज असता भलत्याच प्रेमापोटी बचकाभर मीठ आपल्या तोडात कोंबले जाते. भीडभाड आपणच बाळगायची असते. का ?

1 comment:

प्रशांत said...

तुमच्यासारखे अनुभव अनेकदा येतात. कितीही वैताग आला तरी शेवटी दुर्लक्ष्य करण्यापलिकडे उपाय नसतो. कारण कधी लहान म्हणून तर कधी मोठे म्हणून "सांभाळून घेणे" हे आपलं कर्तव्य असतं.