Friday, November 09, 2007

"मचाण" व "ब्रेडटॉक"



दिवाळ काढते ती दिवाळी. "शॉप टील यु डॉप डेड" या म्हणीचा अक्ष्ररशा शब्दशाः अनुभव घेत आहे. खरेदी पेक्षा बाहेर खाण्याचेच बिल जास्त.

काल रात्री जंगलात जेवायला गेलो होतो, मचाणवर बसुन, हत्ती, बाघ, जिराफ, माकडे, बिबळॆ यांच्या सोबत भोजनाचा आस्वाद घेतला. मालाड ला लिंक रोड वर, क्रोमा या शोरुम वर आठव्या मजल्यावर "मचाण" नामक हॉटेल आल्याचे वाचले होते. क्रोमा मधे आय पॉड आणायला गेलो होतो म्हटले चला आज दिवाळीची ऐश या ठिकाणी जेवण करुन करुया.

थीम वर आधारीत असल्यामुळे ही जागा तशी महागडीच आहे. खऱ्याखुऱ्या जंगलात रमणारा मी , या प्लॅस्टीकच्या जंगलात तसे मन लागणे कठीणच. जेवण चवदार होते, पण मन कॄत्रीम वातावरणात जरासे खट्टु झाले होते. मात्र या ठिकाणी बाहेर उघडयावर , गच्चीत तंदुरी, व बर्बेक्यु चे खास पदार्थांची व्यवस्था केलेली आहे. या सहीत बुफे जेवणाची किंमत आहे जवळाजवळ रु. ४२५.००. थंडीच्या दिवसात एखाद्या चांदण्या रात्री याचा आस्वाद घ्यायला यायला हरकत नाही.
जेवणात आम्ही टॉमेटो शोरभा, शाही तरकारी बिर्यानी, पनीर बटर मसाला, व्हेज. कोफ्ता, दाल सारीस्का, कुलचे आदींचा आस्वाद घेताला. जंगलात असल्यामुळॆ प्रत्येक पदार्थाच्या नावात जंगलांची नावे असणे क्रमप्राप्त होते.
"ब्रेडटॉक" , इन औरबीट मॉल मधे याच संध्याकाळी आम्ही न्याहारी करायला गेलो होते. हे एक पाव, पेस्टीज, केक आदी बेकरी प्रौड्क्ट्स मिळण्याचे आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे अती उत्तम स्थळ आहे. फ्रेशली बेक्ड क्रियेशनस. येथे आम्ही ब्लु बेरी मुस, फ्रेंच गार्लीक पिज्झा, पिज़्ज़ा ब्रेड, चौकलेट क्रांसे, मुर्ग ला चीज, चा आस्वाद घेतला.
दिवसभराचा फिरण्याचा व खादाडीचा खर्च जवळजवळ २५०० रुपये झाले आणि प्रयोजन होते छोकऱ्याला रिबॉकचे शुज घेण्याचे. ते काही हवे तसे मिळालेच नाही.
सर्व काही अक्क्ल खाती जमा.

2 comments:

Mahek said...

i had not heard about "machan" must go and visit it someday..
have you been to "thevillage" at raghuleela mall , i have heard about it but not visited it as yet thats also a theme restaurant with gujarati ambience and food and a entry fee with unlimited access to food.
didnt you get pictures of machan.

HAREKRISHNAJI said...

Mahek,

No I haven't been to "thevillage", but surely visit the same. Thankx for the reference. I was not carring my Camera, but my nephew has taken snaps on his mobile, I will try to post it to the blog.