लोकशाहीत लोकांचे , लोकांसाठी व लोकानी चालवलेले सरकार असायला हवे तर कर्नाटकात - स्वतःचे, स्वःतासाठी, स्वःतानी, चालवलेले सरकार होते.
गेले दोन तीन महिने कर्नाटकामधील राजकारण्यांनी लोकशाहीची जी थट्टामस्करी, गंमतजंमत चालवली आहे त्यास तोड नाही. देशाचे पंतप्रधान पद भुषवलेली व्यक्ती जेव्हा गल्लीत विधीशुन्य, विवेकहिन राजकारणांत रमते तेव्हा फक्त आपण हसायचे असते.
औटघटकेचे सरकार अखेर कोसळलेच. जे कोसळणारच होते ते स्थापन कशाला केले हा प्रश्न सामान्यांना पडावा, राजकारण्यांचे डावपेच , हिशोब सर्व वेगळॆच. कदाचीत पक्षाचा तेरा दिवस सरकार चालवण्याचा विक्रम मोडायचा असावा .
कदाचीत भाजपा व कॉंग्रेस या दोघांनी मिळुन एकत्र ऐवुन सरकार स्थापन कराण्याची वेळ आली असावी.
3 comments:
भाजपाचे चिंतनाचे दिवस पुन्हा सुरु झाल्यासारखे वाटते. देवेगोडा सरकारापासुन सावध रहावे हे उत्तम.
सुभाष इनामदार , पुणे.
हो ना.
हरेकृष्णजी,
आपल्या विनंतीप्रमाणे काही कविता पोस्ट केल्या आहेत. पुस्तक माझ्याजवळ नसल्याने थोडा उशीर झाला. शिवाय ’हो पोस्ट करते’ हे सांगायचा आळस केला.:)
Post a Comment