ऐ पागल ! बाजुमे लगाव. रात्री मी जीव खावुन बेंबीच्या देठापासुन जोरात ओरडलो. देवानी सर्वकाही दिले पण दोन पैशाची अक्कल द्यायला तो विसरला.
रस्त्याच्या मधे लावलेला फटाक्यातील सुतळी बॉम्ब अगदी टॅक्सी जवळ फुटला. याच वेळी जवळुन
ऐखादा मोटरसायकल स्वार जात असता तर ? तो वेगात जात असता तर ? गॅस सिलेंडर असलेल्या टॅक्सी खाली या फटाका फुटला असता तर ?
भर रस्तात, भर वाहतुकीच्या मधे फटाके लावु नयेत येवढे सुद्धा भान नसावे ?
1 comment:
हम्म्म्म... आजकाल अजून एक घातक प्रथा सुरू झालीय. वाहत्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या वस्तीतली मुले हातात फ़टाका पेटवतात आणि तो फ़ुटण्याच्या बेतात असताना फ़ेकतात. तो कुठेही फ़ुटू शकतो. तुम्ही म्हणालात तेच... एखादा दुचाकीस्वार बावचळला आणि गाडीवरचा कंट्रोल जाऊन काही अपघात घडला तर?
पण याहीबाबतीत सर्वचजण निष्क्रीय आहेत, अशी परिस्थिती आहे.
Post a Comment