Thursday, November 08, 2007

सूरप्रभात


तीच दिवाळी पहाट, तेच सुगंधी उटणे, तोच म्हैसुर सॅंडलवुड साबण , तेच अभंग्य स्नान , पण त्यातला गोडवा ना जाणे कोठे हरवला आहे ही काहीशी हुरहुर मनी बाळगत, भल्या पहाटे , आज मी रंगस्वर यशवंतराव चव्हाण केंद्र आयोजीत, "सूरप्रभात" या सुरमयी कार्यक्रमास पोहोचलो ते प्रसन्नचित्ती, हसऱ्या, प्रभावी व्यक्तीमत्वाचा डॉ. संगीता शंकर यांचे व्हायोलीन ऐकायला.

मियांकी तोडी ऐकताना, भान हरपताना, ना जाणे ही मनाला आलेली मरगळ केव्हा दुर झाली व दिवाळी प्रभात "सूरप्रभात " केव्हा झाली हे कळलेच नाही. त्या नंतर मन रिझवायला जी काही सुरवात झाली त्यात भर पडली ती पं, संजीव अभ्यंकर यांच्या गायनाने. आज प्रथमच मी जयवंती तोडी ऐकली.

काल रात्री आम्ही पुण्यावरुन मुंबईस परतलो. खर म्हणजे आज पहाटे पुण्यात राहुल देशपांडे यांचा कार्यक्रमाला जायचे होते पण म्हटले नको आज डॉ. संगीता शंकर यांचे व्हायोलीन ऐकुया.

आज मला वाटले की काही क्षण, काळ, वेळ, कलावंत हे स्वतःसाठी म्हणजे आपल्या आंतरीक आवाजासाठी, ओढीने, (मला काय म्हणायचे ते नीट लिहीता येत नाही) गात असावेत व त्या नंतर केवळ श्रोत्यांसाठी. अर्थात मी काही यातला जाणकार नाही तरी पण मला असे जाणवले.

आता वाट पहाणे उद्याच्या आकाशवाणीतील अरुण दाते , पद्मजा फेणाणी यांच्या कार्यक्रमाची. सकाळी सहा वाजण्याची.

3 comments:

Vaidehi Bhave said...

!!!दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

आशा जोगळेकर said...

वा वा वा, तुमच्या वर्णनानीच कार्यक्रम स्वत:च ऐकल्या सारखे वाटले । तुमची दिवाळी सुरमयी, प्रकाशमयी अन् आनंदमयी होवो .

कोहम said...

harekrishnaji.....december madhe mumbaila yet aahe....kahi chaan karyakramancha schedule mahit asel tar jarur kalava.....ekhada tari attend karanyachi icchaa aahe.