Tuesday, November 06, 2007

या २१ व्या शतकात देखील ?

अजुन पर्यत ? या २१ व्या शतकात देखील आम्ही अद्यापि याच बाह्य कर्मकांडांत गुतुंन पडलो आहोत ?

"गुरुवायुर येथील मंदिरात महिलांना "सलवार-कमीज ' घालून येण्यास परवानगी दिल्यामुळे भगवान श्रीकृष्ण नाराज झाले आहेत! त्यामुळे मंदिरात आता पुन्हा पारंपरिक वस्त्रे परिधान करून येण्याचा नियम लागू होण्याची शक्‍यता आहे। "

भक्तिचा, पवित्राचा आणि उत्तरे कडल्या या योग्य त्या वेशभुषेचा संबध काय ? सलवार-कमीज' परिधान केल्याने पावित्र कसे काय भंग पावते हे केवळ मनमानी नियम करणारे देव व भाविक याच्या मधले मध्यस्थच जाणोत।

भाविकांना मंदिराच्या परंपरांमध्ये बदल करण्याचा कोणताही अधिकार नाही असे या मंदिराच्या रखावालादाराचे म्हणणे आहे। परतु कालाबाह्या झालेल्या रुढी, परंपरां मधे बदलत्या कालानुसार सुधरणा व्हायलाच हवे। भाविकांची सोय गैरसोय हिच प्राथमिकता हवी । किती काळ हे मध्यस्थ आपला मनमानी कारभार चालवणार ? या शुल्लक गोष्टीत कालव्यपय करण्या पेक्षा या श्रीमंत देवस्थानांनी समाज उपयोगी कार्यात आपल्या अफाट संपत्तीचा योग्य तो विनीयोग करावा.
जग देश, विश्व याच्या सीमारेषा ओलांडून आंतराळात पोहोचले तरी आम्ही अजुन पर्यंत पुराण काळात वावरत आहोत। नशीब तरी नववारी साड्यांचा आग्रह हे लोक धरत नाहीत.

1 comment:

Vaishali Hinge said...

Kthain aahe naahii?? कधी बदलणार आपण? कळत नाही आणि ते जे करतात ते पाहुन हताश वाटु लागते कधी कधी.
काल बीबी सी वर असेच काहीतरी पुजा दाखव्त होते कुमारी देवता वैगैरे बघयला इतके विच्त्र वाटत होते आणि जिम मध्ये माज्य्यासोबत यंत्र चलवता चलवता बाकिे जनता पण बघत होती सगळ्यांची नजर एकदा का होइना माझ्याकडे गेली.

असो तुमची कोमेंट फ़ार छाने माझ्या लेखावर्ची .