Wednesday, November 07, 2007

ऐका हो ऐका

डुम डुम डुम,ढांग ढींग ढांग ! ऐका हो ऐका ! समस्त पुणेकरांनो ऐका ! डुम डुम डुम ! आमचे , बेडेकरांचे मिसळीचे दुकान, डुम डुम डुम, आज उघडे आहे हो .. ऐका हो ऐका , समस्त खादाडांनो ऐका, आज आम्ही मिसळ भरपुर केलेली आहे हो ! संपलेली नाही हो ! डुम डुम डुम ! आज दुकान सुरु आहे. तेव्हा ज्या कोणाला मिसळ खाण्याची इच्छा आहे, त्यांनी, डुम डुम डुम, आज जरुर आमच्या दुकानात विनासंकोच, बेशलक. कोणतीही शंका मनात न बाळगता दिवसात केव्हाही मिसळ खाण्यासाठी जरुर येणे, सर्वांसाठी भरपुर मिसळ उपलब्ध आहे हो.

दवंडी पिटवणार- काल चौथ्यांदा बेडेकरांकडे मिसळ खाण्यास खास गेलेला एक पागल माणुस. जावुन ऐवुन दिड तासाचा प्रवास व एका वेळी जवळ जवळ रिक्शाला १५०-२०० रुपये लागत असुन सुद्धा, व तेथे गेल्या नंतर एकतर "संपली" हा शब्द ऐकावा लागणार किंवा दुकान बंद असणार हे ठावुक असतांना देखील केवळ बेडेकरांची मिसळीची चव कशी असते हे जाणुन घेण्यासाठी जाणाऱ्या माणसास व त्याच्या बायकोला पागल नाही म्हणायचे तर दुसरे काय बोलायचे ?
काल दिनांक ०६.११.२००७ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता उपहारगॄह बंद होते. मग आम्ही "श्री" मधे मीसळ खायला गेलो.

3 comments:

Anonymous said...

तुम्ही घरुन निघायच्या आधी फोन का नाही करत, दुकान उघडे आहे की नाही पहायला? म्हणजे बराच त्रास वाचेल.

A woman from India said...

शुभ दिपावली.
येणारे वर्ष सुखाचे आणि परिपूर्णतेचे जावो.

HAREKRISHNAJI said...

खरच की. माझ्या हे लक्षातच नाही आले.