Saturday, November 17, 2007

मेळावा

एका राजकीय पक्षाने मुंबई शहरात २५ नोव्हेंबर रोजी एक इतिहासातला न भुतो न भविष्यति असा एक भव्य दिव्य मिळावा आयोजीत केला असल्याचे व त्यासाठी महा विराट गर्दी जमवण्याचा त्यांचा बेत असल्याचे आजच वर्तमानपत्रातुन वाचनात आले. राज्यातुन किमान ५० लाख लोक त्या दिवशी मुंबईत येतील असा कार्यकर्त्यांचा विश्वास असल्याचे वाचुन आनंद झाला.

या, मुंबई आपलीच आहे. आपले स्वागत आहे. हे शहर कितीही माणसांचा ताण पेलु शकते असा मला विश्वास आहे.

सर्वांची सोय ल्क्षात घेता साठी, नेत्यांचे भाषण त्यांना ऐकण्यासाठी, त्यांचे विचार जनतेच्या कानी पडावे या साठी प्रभादेवी पासुन माहीम पर्यंत रस्तावर जागोजागी स्पिकर लावणार असल्याचे व आपल्या लाडल्या नेत्यांना पहाण्यासाठी रस्तावर स्क्रीन लावण्याची ही उत्तम सोय व चोख व्यवस्था ही कार्यकर्ते करणार असल्याचे वाचुन बरे वाटले. या साऱ्या परिसरात लोकांनी रस्तावर बसुन आपले भाषण ऐकावे असे नियोजन असणार आहे.

माझी कार्यकर्त्यांना एकच विनंती आहे, केवळ याच परीसरात नव्हे तर साऱ्या मुंबई नगरीत जागोजागी लाऊडस्पिकर लावण्याची व स्क्रीन उभारण्याची व्यवस्था करण्यात यावी, कदाचीत खोळंबलेल्या वाहतुकीमुळे आम्ही लांबवर रहाणारी लोक वेळेवर या परीसरात पोचु शकणार नाही. आम्हाला या मेळाव्यापासुन केवळ या कारणे वंचीत रहावयास लागु नये.

या दिवशी रविवार जरी असला तरी, राज्य सरकारने राज्यात सार्वजनीक सुट्टी जाहीर करावी.
लोकांना ही एक नम्र विनंती आहे की त्यांनी ही कामा निम्मिते देखील घरा बाहेर पडणे टाळावे जेणे करुन त्यांच्या मुळे मेळ्याव्यात कोठेही अडथळा निर्माण होवु नये.

No comments: