"चांद मातला मातला " हे ऐकायला लोकांनी प्रत्येकी रु. २२३२ /- मोजले हे आज लोकसत्ता मधे पानभर आलेल्या लेखात वाचुन मला तर झीट यायची बाकी राहीली होती. ते सुद्धा कोजागीरी पोर्णीमेच्या रात्री आशा भोसलेंचा गाण्याच्या कार्यक्रमासाठी ? ( मला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो , हे तरुणाईत रमणारे वयोवुद्ध अजुन निवृत्त का बरे होत नसावेत ? तारुण्यातील आपण गायलेली गाणी या पंच्याहत्तरीत सुद्धा गाण्याचा भारी सोस असतो एकेकाला, त्यांना त्यांचा गळा साथ देतो ? का आपले पुर्वपुण्याईवर रेटत न्यायचे ? या वयात सीतारादेवींना व गोपिकृष्णांना कथ्थक नॄत्य करतांना मी बघितले आहे. (हे माझे वैयक्तीक मत आहे,) पण हा मुळ मुद्दा नाही ) , काय पैसा झालाय हो लोकांकडे ! हौसेला मोल नाही म्हणतात हे जरी खरे असले तरी हे येवढे मोठाले मोल ?
एक टिकीट रुपये. २२३२.०० ? ते पण पनवेलच्या स्वप्ननगरीत कोजागीरीच्या रात्री खुल्या मैदानात ( रात्री दहा नंतर खुल्या जागेत लाऊडस्पिकर लावायला हायकोर्टाने मनाई केली आहे ना ? ) आणि ते पण कार्यक्रम ऐकाण्या साठी ? धन्य ते आयोजक "सचिन ट्रॅवल्स " धन्य ते कलाकार आणि धन्य ते रसिक !. सर्वांना माझा मानाचा मुजरा. या कार्यक्रमाला पार पुणे, नाशीक , कोल्हापुर वरुन रसिक मंडळी आली होती म्हणे.
मग म्हणे हि जागा थातुरमातुर कारणे सांगत बदलली, बंदिस्त जागी कोजागिरी पोर्णिमा साजरी केली ,सर्व नियोजन ठिसाळ होते, महा प्रचंड गर्दी होती, बसीस वेळेवर आल्या नाहीत, बसण्याची योग्य व्यवस्था नाही, पुढच्या रांगेत बसण्यासाठी चोख पैसे मोजल्यांवर सर्वात मागे बसण्याची पाळी आली, ध्वनिक्षेपकांचे आवाज छातीवर डोल पिटल्यासारखे आढळत होते ! मनस्ताप, मनस्ताप आणि मनस्ताप.
अश्या कार्यक्रमाला जायचे किंवा नाही हे ज्याचे त्यानी ठरवायचे असते. मग फसगत, अपेक्षाभंग झाला तर रडायचे नाही. ते गॄहीत धरुनच जायचे,

3 comments:
चांगली आहे प्रतिक्रिया.
या तथाकथित मान्यवरांची चळवणूक बंदच करायला पाहिजे. लताबाईंचा तरी आवाज ऐकवतो का आत? पण गातायत तरीही!
ऐकणारे शुंभ असतील, तर त्यांना तरी कोण अडवणार?
अभिजित,
प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद. लता दिदींना हे सांगावे कोणी ? शिखरावर असतांना निव्रुत्त होण्यातच मजा असते. पण मोह सुटत नाही. ईतरांना संधीच ध्यायची नाही. त्या तरी परबडाल्या पण आशाबाई ? जवानांना लाजवतील अशी त्यांची वेषभुशा व हावभाव, बघवत नाही.
एकदम सहमत, हरेक्रिश्नाजी. मला पण असंच वाटतं. आवाज चिरका, थोडा बेसूर लागला तरी केवळ पूर्व पुण्याई वर रेटत नेणे याला काय म्हणावं?
मनोगत वर यावर फार छान लेख आहे. पुण्यातही अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन कार्यक्रम झाला होता. त्यावर पावसाने पाणी ओतले आणि मग दुसर्या दिवशी तिथेच कसाबसा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
Post a Comment