Sunday, November 18, 2007

सौ. सायली सत्यजीत तळवळकर


ज्ञानेश्वरांनी म्हटलय " मोगरा फुलला " ! आज सायली बहरलीय ! (निवेदीका )

सौ. सायली सत्यजीत तळवळकर यांचे फुललेले गाणे कानाने, मनाने ऐकण्याचा आज योग जुळुन आला.
निसर्ग, कलावंत, आणि कर्नाटक संघ आपल्याला भरभरुन देत असतात, आपणच करंटे. आपलेच हात थोटे.
काल माझ्या समोर धर्मसंकट उभे राहीले होते. आज पहाटे ६.३० वाजता "प्रातःस्वर, पु.ल.देशपांडे कला अकाडमीत श्री. कुमार मर्दूर यांचे गाणे होते व त्यानंतर १०.३० वाजता आरती अंकलीकर यांच्या शिष्या सौ. सायली सत्यजीत तळवळकर यांचे.

सौ. सायली सत्यजीत तळवळकर यांचे गाणे मी पुर्वी दोन तीन वेळा ऐकले असल्या मुळे आज माझी प्रथम पसंती फक्त श्री. कुमार मर्दूर यांच्या गाण्याला जाण्याची होती. सुखद गुलाबी थंडीमुळे अंमळ उठायला उशीर झाला. झाले ते बरेच झाले नाहीतर आज मी एका अनुभुतीला मुकलो असतो.

आज त्या अहीर भैरव, व सारंग, मीरा भजन, व अभंग गायल्या. बहार आली. तॄप्त मनाने व भरल्या पोटी ( वाटेत स्वीट बंगाल हे मिठाईचे दुकान लागते ) घरी परतलो.
सर्वच कार्यक्रमाला जायला मिळतेच असे नाही. तेव्हा मी असे ठरवले आहे की जायचे तर तरुण प्रतिभावंत पिढीचेच गाणे ऐकायला जायचे.

No comments: