Wednesday, November 21, 2007

१५० वर्षापुर्वीची तोफ व नवा दारुगोळा, बारुद







सुमारे १५० वर्षापुर्वीची ही तोफ अगदी माझ्या घराजवळ सापडली, कोण जाणॆ कोणच्याच नजरेत ती इतकी वर्षे आली नव्हती , अगदी माझ्या सुद्धा. परवा TOI मधे वाचले तेव्हा कळले.


ADI नी हि तोफ आता लवकरच चोरटय़ांची नजर पडण्याआधी येथुन हलवायला हवी. नाहीतर कागदी घोडॆ नाचत राह्तील व तोफ मधल्यामधे गायब होईल.

भटक्या

" भटक्याची भ्रंमति " पोरकी झाली । आता रात्रीची मुबई कशी असते हे जाणून घेण्यासाठी कोणते सदर वाचायाचे ? समाजात जेव्हा जेव्हा गैरव्यवाहार होतात , जेथे जेथे होतात त्याचा प्रदाफाश करायला भटक्या सदैव हजर असायचा, आणि म्हणुनच मुंख्यमत्री अंतुले ना रात्रीची मुबई बघाविशी वाटली तेव्हा त्यांना भटक्याची आठवण झाली , वेश पालटून त्यानी भ्रंमति केली ।

प्रमोद नवलकर गेले। एका पर्वाची समाप्ति झाली । एक सदैव हसरे व्यक्तिमत्व नाहिसे झाले, नानानानी पार्क चा निर्माता , पार्क ला पोरका करून गेला ।

गिरगाव चौपाटी त्यांची नेहमीच आठवण काढेल, त्यांचा मुळेच ती साफ व सुंदर झाली

Tuesday, November 20, 2007

चकाचक मुंबई , स्वच्छता मोहीमा व महानगरपालिका.

आता प्रर्यंत बॄ. म.न.पा ने अनेक स्वच्छता मोहीमा हाती घेतल्या. सर्वच फसल्या. आता चकचक मुंबई ही खाजगी ठेकेदारांच्या मार्फत नवी मोहीम हाती घेतली आहे. अस्वच्घता करणाऱ्यांना मार्शल्स दंड करणार आहेत. तस बघयला गेले तर हा एक फार चांगला उपक्रम आहे म्हणायचा. पण तो किती दिवस टिकतो हे पहाणॆ महत्वाचे.
एक गोष्ट स्पष्ट आहे, ज्यात लोकसहभाग नाही त्या मोहीमा व्यर्थ आहेत. ही सारी तळमळ आपल्या अंतःकरणापासुन आली पाहीजे. अश्या गाजावाजा करत सुरु झालेल्या मोहिमा फक्‍त चार दिवस टिकतात, शहर आहे तसेच बकाल रहाते.
आपण रहात असलेले शहर, हा परीसर माझा आहे या भावनेने जेव्हा तो परिसर दत्तक घेतला जातो , आपल्या अपत्याप्रमाणे त्याची काळजी घेतली जाते ,तेव्हाच आपले शहर रहाण्यालायक होत असते. शेवटी आपण हे सारे आपल्यासाठीच करत असतो. आपल्या पुढील पिढी साठी करत असतो.

केवळ नकारात्मक द्रुष्टीकोन ठेवत, ही कामे माझी नाहीत म्हणात, या नागरी समस्यांची सोडवण्यासाठी आपण अजुन किती दिवस सरकारी यंत्रणेवर अवलंबुन रहाणार आहोत? या यंत्रणेलाही काही मर्यादा आहेत. जर आपल्याला अस्वच्छता, वाहतुककोंडी, प्रदुषण यांचा त्रास होत असेल तर तो त्रास दुर करण्यासाठी, आपल्या मदतीला दुसरे येतील याची वाट न बघता, स्वःताला स्वःताच मदत करुन त्याचे निवारण करायला हवे. बहुतांशी या समस्या आपणच निर्माण केलेल्या असतात, आपले घर स्वच्छ केल्यानंतर तो केरकचरा ईतरांच्या दारात, रस्तावर, नाल्यात आपणच टाकलेला असतो. वेडीवाकडी वाहने चालवुन, शिस्त न पाळत आपणच वाहतुक कोंडी केलेली असते.

प्रत्येकाच्या मनात आपण काही तरी केले पाहीजे ही भावना असतेच असे नाही, ज्याच्या मनात असते त्यांना आपण नक्की काय करायला हवे त्याची माहीती नसते. मुळात अशी जाणीव सर्वांना करुन देणे महत्वाचे असते. आपण रहात असलेला परीसर अस्वच्छ्तेमुळे किती नरकासमान आहे, त्या मुळे रोगराई पसरली आहे, आपल्या मुलांना खेळण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी आपल्या परीसरात जागा नाही याची जेव्हा जाणिव होते तेव्हा लोकसहभागातुन परीसराचे रुपांतर नंदनवनात होण्यास वेळ लागत नाही.
लोकांना ही जाणीव करुन द्यायची कोणी ?
आता गरज आहे ती म.न.पा. चे अधिकारी, नगरसेवक यांनी लोकांपर्यंत पोहोचण्याची. त्यांनी लोकांमधे जावे, परीसरात लोक उपलब्ध असतील तेव्हा, रात्रीच्या वेळी, रजेच्या दिवशी स्थानीक पातळीवर सभा घ्याव्यात, त्यांचे मार्गदर्शन करुन मतपरीवर्तन करावे, त्यांना शपथ घ्यायला लावावी, लागल्यास स्थानीक पोलिस स्थानकाची मदत कायदा मोडणाऱ्यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी घ्यावी.
कचरा रस्त्यावर टाकु नका हे सांगणे सोपे आहे, पण तो कोठे टाकावा या साठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तो घरात रोज दोन वेगळ्या कचऱ्याच्या डब्यात साठवला जावा, हिरवा डबा ओल्या कचऱ्यासाठी व लाल डबा सुक्या कचऱ्यासाठी. रोजच्यारोज ठरावीक वेळेस ओला कचरा गोळा केला जावा, सुका कचरा नेण्यासाठी कचरा वेचणाऱ्या कामगार संघटनेची मदत घेवुन, त्यांच्या माणसांना आपल्या परीसरात नेमुन, तो दिला जावा, जेणे करुन त्यांचे ही पोट भरेल.

एकदाच युद्धपातळीवर सारा परीसर नागरीकांनी मनपाच्या मदतीने, वेळप्रसंगी लोकवर्गणी काढुन साफ करावा, लोकांना शिस्त लागे पर्यंत गस्त घालावी, न ऐकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जावी, सुरवातीचे हे पथ्य सांभाळले की आपोआपच पुढचा मार्ग सोपा होतो, प्राथमीक गरज असते ती आयुष्यभर जोपासलेल्या वाईट सवयी मोडण्याची.
ही जाणिव आम्हाला करुन दिली ती मुबंई महानगरपालीकेचे अधिकारी श्री. सुभाष दळवी यांनी. केवळ एका , फक्‍त एका सभेत, लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात घेतलेल्या सभेत, त्यांनी रहिवाश्यांचे मतपरिवर्तेन केले, आयुष्य भरच्या चुकीच्या सवयी केवळ एका रात्रीत सोडवल्या.
आम्ही रहात असलेल्या मुबंईतील एका परीसरातील, नरकासमान असलेल्या घरगल्ल्यांची (दोन ईमारतीतील मोकळी जागा, रहीवाश्यांची केरकचरा, घरात नको असण्याऱ्या सर्व वस्तु हक्काने खाली भिरकवण्याची जागा, त्यात भर पडते ती सांडपाण्याची, डासांची, घुशींची, ) जटिल समस्या लोकसहभागातुन पाच वर्षापुर्वी सोडवली व गेली पाच वर्षे त्या स्वच्छ अवस्थेत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत.
या स्वच्छ्ता मोहीमेस आम्हाला मोलाचे मार्गदर्शन व मदत लाभली ती श्री. सुभाष दळवी यांची. या समस्येचा त्यांच्या कार्यालयीन कामाशी प्रत्यक्षात संबध नसतांना देखील केवळ आपले शहर स्वच्छ व्हावे या सद्दभावनेनी त्यांनी आम्हाला दिवसरात्र मदत केली. त्यांच्या बरोबर म.न.पा.च्या घनकचरा व ईतर विभागाने जी मोलाची मदत केली, केवळ त्या मुळेच आम्ही आज एका स्वच्छ परिसरात रहात आहोत.

Monday, November 19, 2007

कर्नाटकी नौटंकी.

लोकशाहीत लोकांचे , लोकांसाठी व लोकानी चालवलेले सरकार असायला हवे तर कर्नाटकात - स्वतःचे, स्वःतासाठी, स्वःतानी, चालवलेले सरकार होते.

गेले दोन तीन महिने कर्नाटकामधील राजकारण्यांनी लोकशाहीची जी थट्टामस्करी, गंमतजंमत चालवली आहे त्यास तोड नाही. देशाचे पंतप्रधान पद भुषवलेली व्यक्ती जेव्हा गल्लीत विधीशुन्य, विवेकहिन राजकारणांत रमते तेव्हा फक्त आपण हसायचे असते.

औटघटकेचे सरकार अखेर कोसळलेच. जे कोसळणारच होते ते स्थापन कशाला केले हा प्रश्न सामान्यांना पडावा, राजकारण्यांचे डावपेच , हिशोब सर्व वेगळॆच. कदाचीत पक्षाचा तेरा दिवस सरकार चालवण्याचा विक्रम मोडायचा असावा .

कदाचीत भाजपा व कॉंग्रेस या दोघांनी मिळुन एकत्र ऐवुन सरकार स्थापन कराण्याची वेळ आली असावी.

कर्नाटकी नौटंकी.

Sunday, November 18, 2007

चांद मातला मातला

"चांद मातला मातला " हे ऐकायला लोकांनी प्रत्येकी रु. २२३२ /- मोजले हे आज लोकसत्ता मधे पानभर आलेल्या लेखात वाचुन मला तर झीट यायची बाकी राहीली होती. ते सुद्धा कोजागीरी पोर्णीमेच्या रात्री आशा भोसलेंचा गाण्याच्या कार्यक्रमासाठी ? ( मला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो , हे तरुणाईत रमणारे वयोवुद्ध अजुन निवृत्त का बरे होत नसावेत ? तारुण्यातील आपण गायलेली गाणी या पंच्याहत्तरीत सुद्धा गाण्याचा भारी सोस असतो एकेकाला, त्यांना त्यांचा गळा साथ देतो ? का आपले पुर्वपुण्याईवर रेटत न्यायचे ? या वयात सीतारादेवींना व गोपिकृष्णांना कथ्थक नॄत्य करतांना मी बघितले आहे. (हे माझे वैयक्तीक मत आहे,) पण हा मुळ मुद्दा नाही ) , काय पैसा झालाय हो लोकांकडे ! हौसेला मोल नाही म्हणतात हे जरी खरे असले तरी हे येवढे मोठाले मोल ?

एक टिकीट रुपये. २२३२.०० ? ते पण पनवेलच्या स्वप्ननगरीत कोजागीरीच्या रात्री खुल्या मैदानात ( रात्री दहा नंतर खुल्या जागेत लाऊडस्पिकर लावायला हायकोर्टाने मनाई केली आहे ना ? ) आणि ते पण कार्यक्रम ऐकाण्या साठी ? धन्य ते आयोजक "सचिन ट्रॅवल्स " धन्य ते कलाकार आणि धन्य ते रसिक !. सर्वांना माझा मानाचा मुजरा. या कार्यक्रमाला पार पुणे, नाशीक , कोल्हापुर वरुन रसिक मंडळी आली होती म्हणे.

मग म्हणे हि जागा थातुरमातुर कारणे सांगत बदलली, बंदिस्त जागी कोजागिरी पोर्णिमा साजरी केली ,सर्व नियोजन ठिसाळ होते, महा प्रचंड गर्दी होती, बसीस वेळेवर आल्या नाहीत, बसण्याची योग्य व्यवस्था नाही, पुढच्या रांगेत बसण्यासाठी चोख पैसे मोजल्यांवर सर्वात मागे बसण्याची पाळी आली, ध्वनिक्षेपकांचे आवाज छातीवर डोल पिटल्यासारखे आढळत होते ! मनस्ताप, मनस्ताप आणि मनस्ताप.

अश्या कार्यक्रमाला जायचे किंवा नाही हे ज्याचे त्यानी ठरवायचे असते. मग फसगत, अपेक्षाभंग झाला तर रडायचे नाही. ते गॄहीत धरुनच जायचे,

Raga AhirBhairav-

सौ. सायली सत्यजीत तळवळकर


ज्ञानेश्वरांनी म्हटलय " मोगरा फुलला " ! आज सायली बहरलीय ! (निवेदीका )

सौ. सायली सत्यजीत तळवळकर यांचे फुललेले गाणे कानाने, मनाने ऐकण्याचा आज योग जुळुन आला.
निसर्ग, कलावंत, आणि कर्नाटक संघ आपल्याला भरभरुन देत असतात, आपणच करंटे. आपलेच हात थोटे.
काल माझ्या समोर धर्मसंकट उभे राहीले होते. आज पहाटे ६.३० वाजता "प्रातःस्वर, पु.ल.देशपांडे कला अकाडमीत श्री. कुमार मर्दूर यांचे गाणे होते व त्यानंतर १०.३० वाजता आरती अंकलीकर यांच्या शिष्या सौ. सायली सत्यजीत तळवळकर यांचे.

सौ. सायली सत्यजीत तळवळकर यांचे गाणे मी पुर्वी दोन तीन वेळा ऐकले असल्या मुळे आज माझी प्रथम पसंती फक्त श्री. कुमार मर्दूर यांच्या गाण्याला जाण्याची होती. सुखद गुलाबी थंडीमुळे अंमळ उठायला उशीर झाला. झाले ते बरेच झाले नाहीतर आज मी एका अनुभुतीला मुकलो असतो.

आज त्या अहीर भैरव, व सारंग, मीरा भजन, व अभंग गायल्या. बहार आली. तॄप्त मनाने व भरल्या पोटी ( वाटेत स्वीट बंगाल हे मिठाईचे दुकान लागते ) घरी परतलो.
सर्वच कार्यक्रमाला जायला मिळतेच असे नाही. तेव्हा मी असे ठरवले आहे की जायचे तर तरुण प्रतिभावंत पिढीचेच गाणे ऐकायला जायचे.

चंद्रसखी

"चंद्रसखी",
काही शब्द आपण कधीतरी प्रथमवेळा ऐकतो, ते आपल्याला आवडुन जातात, सदैव स्मरणात रहातात, "चंद्रसखी" हा असाच एक शब्द. गायत्री नातु यांनी त्यांच्या बॉगवरील कलापिनी कोमकली वर लिहीलेल्या एका अप्रतिम लेखात तो वाचनात आला, कुतुहल जागे झाले, काही जणांकडे त्या विषयी चौकशी केली पण कोणाच्याच तो माहितीत नव्हता.

परवा अचानक पं. कुमार गंधर्वांचे शिष्य व गाढे अभ्यासक पं.सत्यशिल देशपांडे एका दुकानात बसलेले दिसले. त्यांचे गाणे मी चारपाच वेळा ऐकले आहे. धाडस करुन त्यांना विचारले.

त्यांनी केवळ या शब्दाचा खुलासाच न करता , एक रचना ही मला गावुन दाखवली. हे त्यांचे मोठेपण.
"चंद्रसखी" ही देखील संत मीरा प्रमाणेच भजन रचीत असे, "चंद्रसखी" रचीत भजने पं, कुमारजी गात असत.

Saturday, November 17, 2007

The Taste of Luxury




Italian Furniture Exhibition by " Master Pieces " at Museum, Mumbai.

Moshe’s Café at FabIndia.




Salom.

It’s time to discover great Café called, “Moshe’s Café” for cuisine from Italy, Spain, Morocco, Turkey, France, and the entire Middle East belt, after the tiring but pleasant shopping at FabIndia at Kalaghoda. Mumbai.

Since FabIndia was opened in Mumbai, we have been regular shoppers over there, both of us like to wear cottons, and FabIndia is an excellent or rather the only store to buy cotton cloths.

Today we had another reason to visit FabIndia; besides exchanging two shirts I had received as presents during Diwali, to have delicious gastronomical rich experience at newly opened “Moshe’s Café”.

Situated at the mezzanine floor, “Moshe’s Café” with chic atmosphere provides good opportunity to just sit and relax and enjoy the lovely Salads, Soups. Crostini, Open Pies, Toasties, Sandwiches, Dips and Spreads, Breads, Beverages, Healthily Refreshers, Coffees, and Desserts.

At the first glance it looked like expensive one but on second thought when I am paying Rs.60.00 for just one Cheese Mysore Dosa at Vaishali, I have no reason to crib over pricing.


They have branches at Cuffe Parade, Kemps Corner, Nepeansea Road.

मेळावा

एका राजकीय पक्षाने मुंबई शहरात २५ नोव्हेंबर रोजी एक इतिहासातला न भुतो न भविष्यति असा एक भव्य दिव्य मिळावा आयोजीत केला असल्याचे व त्यासाठी महा विराट गर्दी जमवण्याचा त्यांचा बेत असल्याचे आजच वर्तमानपत्रातुन वाचनात आले. राज्यातुन किमान ५० लाख लोक त्या दिवशी मुंबईत येतील असा कार्यकर्त्यांचा विश्वास असल्याचे वाचुन आनंद झाला.

या, मुंबई आपलीच आहे. आपले स्वागत आहे. हे शहर कितीही माणसांचा ताण पेलु शकते असा मला विश्वास आहे.

सर्वांची सोय ल्क्षात घेता साठी, नेत्यांचे भाषण त्यांना ऐकण्यासाठी, त्यांचे विचार जनतेच्या कानी पडावे या साठी प्रभादेवी पासुन माहीम पर्यंत रस्तावर जागोजागी स्पिकर लावणार असल्याचे व आपल्या लाडल्या नेत्यांना पहाण्यासाठी रस्तावर स्क्रीन लावण्याची ही उत्तम सोय व चोख व्यवस्था ही कार्यकर्ते करणार असल्याचे वाचुन बरे वाटले. या साऱ्या परिसरात लोकांनी रस्तावर बसुन आपले भाषण ऐकावे असे नियोजन असणार आहे.

माझी कार्यकर्त्यांना एकच विनंती आहे, केवळ याच परीसरात नव्हे तर साऱ्या मुंबई नगरीत जागोजागी लाऊडस्पिकर लावण्याची व स्क्रीन उभारण्याची व्यवस्था करण्यात यावी, कदाचीत खोळंबलेल्या वाहतुकीमुळे आम्ही लांबवर रहाणारी लोक वेळेवर या परीसरात पोचु शकणार नाही. आम्हाला या मेळाव्यापासुन केवळ या कारणे वंचीत रहावयास लागु नये.

या दिवशी रविवार जरी असला तरी, राज्य सरकारने राज्यात सार्वजनीक सुट्टी जाहीर करावी.
लोकांना ही एक नम्र विनंती आहे की त्यांनी ही कामा निम्मिते देखील घरा बाहेर पडणे टाळावे जेणे करुन त्यांच्या मुळे मेळ्याव्यात कोठेही अडथळा निर्माण होवु नये.

शक्तीप्रदर्शन

एका राजकीय पक्षाने मुंबई शहरात २५ नोव्हेंबर रोजी एक इतिहासातला न भुतो न भविष्यति असा एक भव्य दिव्य मिळावा आयोजीत केला असल्याचे व त्यासाठी महा विराट गर्दी जमवण्याचा त्यांचा बेत असल्याचे आजच वर्तमानपत्रातुन वाचनात आले. राज्यातुन किमान ५० लाख लोक त्या दिवशी मुंबईत येतील असा आपल्या कार्यकर्त्यांचा विश्वास असल्याचे वाचुन आनंद झाला.


या, मुंबई आपलीच आहे. आपले स्वागत आहे. हे शहर कितीही माणसांचा ताण पेलु शकते असा मला विश्वास आहे.


नेत्यांचे भाषण ऐकण्यासाठी, त्यांचे विचार कानी पडावे या साठी प्रभादेवी पासुन माहीम पर्यंत रस्तावर जागोजागी स्पिकर लावणार असल्याचे व आपल्या लाडल्या नेत्यांना पहाण्यासाठी रस्तावर स्क्रीन लावण्याची ही उत्तम सोय व चोख व्यवस्था ही कार्यकर्ते करणार असल्याचे वाचुन बरे वाटले. या साऱ्या परिसरात लोकांनी रस्तावर बसुन आपले भाषण ऐकावे असे नियोजन असणार आहे.


माझी कार्यकर्त्यांना एकच विनंती आहे, केवळ याच परीसरात नव्हे तर साऱ्या मुंबई नगरीत जागोजागी लाऊडस्पिकर लावण्याची व स्क्रीन उभारण्याची व्यवस्था करण्यात यावी, कदाचीत खोळंबलेल्या वाहतुकीमुळे आम्ही लांबवर रहाणारी लोक वेळेवर या परीसरात पोचु शकणार नाही. तेव्हा आम्हाला या मेळाव्यापासुन वंचीत रहावयास लागु नये.


या दिवशी रविवार जरी असला तरी, राज्य सरकारने राज्यात सार्वजनीक सुट्टी जाहीर करावी, ही व लोकांना ही नम्र विनंती आहे त्यांनी ही कामा निम्मिते देखी घरा बाहेर पडणे टाळावे जेणे करुन त्यांच्या मुळे मेळ्याव्यात कोठेही अडथळा निर्माण होवु नये.

Why Not "

एका वर्कशॉप मधे मी फार चांगली गोष्ट शिकलो. स्वतःला विचारायचे .

"Why Not " ?

मग एका नव्या द्रुष्टीकोनातुन आपण विचार करायला शिकतो.


पेला अर्धा रिकामा कि अर्धा भरलेला ? ( बस्स दोनच पर्याय ? )

जो पेला सतत अर्धा भरलेला किंवा अर्धा रिकामाच रहाणार आहे , तो त्या मापाचा हे कारखानदार बनवतच कशाला ? अर्धाच मापचा बनवायचा की .

Friday, November 16, 2007

210 c Coffee & Cakes



राजाभाऊ, जग केव्हाच कितीतरी पुढे निघुन गेलय की हो ! तुम्ही अजुन कधी पर्यंत आपल्या याझदानी बेकरी, कयानी, मेरवान, रैल्वे बेकरी नां कवटाळुन बसणार आहात ? पहा जरा आपल्या आजुबाजुला. जुने ते सोने मान्य पण नविन तर पॅटेनीयम आहे हो.


आज परत म्हटले छोकऱ्यासाठी काहीतरी हटके घेवुन जावु. बिच्चारा लई अभ्यास करतोय, मग २१० सी. कॉफी व केक (सम्राट, चर्चगेट) मधुन ब्लुबेरी चीज केक घेतला. किती दिवस तेच चॉकलेट केक खायचे ?
मग स्वारी ब्रेड ( पाव) कडे वळली. (इराण्याचे ब्रुनमस्का, बनमस्का खावुन खावुन दिवस गेले. या वयात नसती थेरं ). बनाना, बनाना वॉलनट, चीज, चीज गार्लीक मसाला, पानीनी, कॅरेट, टोमेटो, मींट, ग्रीन टी , पेटीट होलव्हीट, होलव्हीट चोकोचीपस वॉलनट्स, होलव्हीट हनी , होलव्हीट ऍपल सीनेमॉन , सोया, नाचणी, हे सारे प्रकार पावचे ? खर की काय ? की आपली उगाचच मस्करी ?


आरारार, देवा रे हे पेस्ट्रीचे, पायचे, मुस, मफीन, ब्राउनी, पफ चे प्रकार पाहुन टक्कुरच फिरले की ! काय खावु न काय नाही ?


ता.क. मेन्यु वाचत हे लिहीता लिहीता माझा बापाला मी लिहीणे बंद करायला लावले. नाहीतर रात्री त्याला झोप लागायची नाही.

नियम म्हणजे नियम - ४

आज वाचकांची पत्रे - म.टा. मधे १६ नोव्हेंबर २००७ श्री. मंदार मोडक यांनी फार चांगला मुद्दा मांडला आहे,

ते म्हणतात - अनेकदा देवादिकांच्या चित्रात त्यांना व्याघ्राजीन वा मृगाजीनावर बसलेले दाखवले जाते. चित्रात असले तरी ते चामडेच ना? ते देवाला बरे चालते! शंकराचे डमरू चामड्याशिवाय बनेल? मग ज्या चामड्याच्या बुटांशिवाय उभेही राहता येणार नाही असे बूट काढण्याची अट घालणे माणुसकीला धरून आहे का?

जराशी गंमत -
काही देवळात तर पैश्याचे पाकिट, घड्याळ, व अगदी कमरेचा पट्टा सुद्धा काढायला लावतात. हे जरा अतीच झाले.

माझ्या सारख्या जाडजुड , पोटाची ढेरी असलेल्या माणसाची किती तारांबळ उडत असेल यांची या विश्वस्थांना कल्पना आहे काय? आधीच सैलसर कपडे घालावे लागतात, त्यात पोटावर पॅंट धरुन ठेवणारा पट्टा लावायचाच नाही म्हणजे ?

देवा तुझ्या दर्शनासाठी काय काय दिव्य करावी लागतात रे !

Thursday, November 15, 2007

The Black Beauty



Heritage Railway Engine at Heritage Building of Western Railway H.Q. at Churchgate.
The Beauty to admire and to praise for.

210 C Coffee & Cakes




It’s time to change loyalty, from Gaylord Cake shop to 210 C Coffee & Cakes at Samrat , Churchgate.

I was quite disappointed with my all time favorite Gaylord on the last two occasions. I ordered Birthday Cakes and they were not up to the mark.

210 C Coffee & Cakes is a quite decent shop at outskirts of Samrat Restaurant at Churchgate.

Very famous among the young crowd of college students as well the office goers and it’s so closed to my office.

No wonder day by day my weight is going up and up.

नियम म्हणजे नियम - ३

पंजाबी ड्रेस (घालणॆ यात वाईट किंवा चुकीचे काय आहे ? ) घालुन तुम्हाला आत प्रवेश करता येणार नाही, बाहेर थांबा.

स्थळ - शिवसॄष्टी, देरवण, चिपळुन जवळ.

मुद्दामुन वाकडी वाट करुन आम्ही गेलो ते प्रवेश नाकारुन घेण्यासाठी.

पुरुषांनी, साहेबाच्या देशातुन आलेले शर्ट, पॅण्ट घातलेले त्यांना चालतात. ( त्यांना धोतर, सदरा, बंडी, वगैरे नको का ?)

बायकांनी पाचवारी साड्या नेसलेल्या चालतात ( त्यांनाही पारंपारीक नववारी साडी नेसल्यासच प्रवेश का देण्यात येवु नये ? )

नियम म्हणजे नियम - २

जिद्दीने आपल्या पायावर उभ्या असणाऱ्या अपंगांना वास्तविक पहाता आपण माणुसकीच्या द्रुष्टीकोनातुन मानाची वागणुक देणे अपेक्षीत आहे, त्यांच्या भावनेची कदर करत, ते जगत असलेले कष्ट्मय जीवन त्यांच्यासाठी सुसह्य करणॆ हे आपले प्राथमीक कर्तव्य आहे. त्यांच्या यातनांची जाणिव सर्वांनी ठेवायला हवी.
सात, सात किलो वजनाचे जडशिल बुट घालुन, ते सांभाळत, त्यामुळे होणाऱ्या वेदना हसऱ्या मुद्रेने सहन करत, वावरतांना, आयुष्य जगतांना , त्यातल आनंद मिळवण्याचा प्रयत्न करीत असतांना, त्यांना नसत्या भ्रामक कल्पना उराशी बाळगत आडकाठी करुन आपण स्वतःलाच परमेश्वरापासुन दुर करत आहोत.
या पुढे या सर्व श्रीमंत, मोठाल्या देवस्थानांने त्यांच्या सोईसाठी व्हील चेयर्स ची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, जेणे करुन लांबलांबुन आलेल्यांना देवदर्शनापासुन वंचीत रहावयास लागणार नाही.

Wednesday, November 14, 2007

नियम म्हणजे नियम

गोव्याच्या एका मंदिरात अपंगांना प्रवेश नाकारला. चामडयाच्या कॅलिपर बुटांना विश्व्स्तांचा आक्षेप.
हे बुट काढले तरच मंदिरात प्रवेश दिला जाईल. हे बुट म्हणजे जणु आमच्या शरीराचा एक भाग आहे, ते काढल्यास आम्हाला उभेही रहाता येणार नाही असे सांगुनही विश्वस्थांनी ते मान्यच केले नाही. परत काही देवळात आम्हाला यावर कपडा गुंडाळुन प्रवेश देतात त्या प्रमाणे येथेही देण्यात यावा हि विनंती ही अमान्य करण्यात आली. - म.टा. दि. १४.११.०७.

नो कॉमेंटस.

नियम म्हणजे नियम. आम्ही करु ते नियम. ते तुम्ही पाळलेच पाहिजेत. मग त्यात काहीच सुट नाही. कोणत्याही परिस्थितीत त्यात बदल होणे शक्य नाही. नियम हे माणसा साठी असावे, माणसे नियमासाठी नाहीत या वर आमचा काडीमात्र विश्वास नाही. मग आमच्या धर्मातील अनीष्ट प्रथा आम्हाला सोयीस्कर रित्या चालतात, पण नियम म्हणजे नियम ते पाळलेच पाहिजेत. अपवादात्मक स्थिती असु शकते हे देखील आम्हाला मान्य नाही. सरसकट सर्वांना एकच न्याय.

वास्तविक पहात पादत्राणचा संबंध हा स्वच्छतेशी असतो. ( पण हि चर्च मधे चालतात,ही चर्चेस किती भव्यदिव्य व स्वच्छ असतात, त्यातले वातावरण ही किती शिस्तबद्ध असते.)

चामडे नको, पण चामडया आतला पशुचा देह आम्हाला चालतो. तो आम्ही ताव मारत खाणार. या पशुंचे आम्ही देवतांपुढे बळी देणार, त्याचा नेवेद्य देवाला देणार.

Tuesday, November 13, 2007

महामानवाचा एक नवा पराक्रम


जगात अवघे ३६०० वाघ शिल्लक - लोकसत्ता - दि. १२.११.२००७.- .


तस बघायला गेल, तर हे पराक्रम प्राचीन काळा पासुनच महामानव करत आला आहे. वन्य श्वापदांची केवळ शौक साठी शिकार करण्यात त्याला फार मोठा पुरुषार्थ वाटतो. त्याचीच हि परिणीती. प्रचंड प्रमाणात जंगले तोडायची, प्राण्यांच्या जागेत आपण अतीक्रमण करायचे, अती प्रमाणात अंधश्रद्दा उराशी बाळगत वाघांच्या अवयवासाठी प्रचंड किंमत देत त्यांची शिकार करवुन घ्यायची.


अनेक जाती, प्रजाती त्याने बिनडोक पणे नष्ट केल्या उरलेल्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याला ना खेद न खंत.



हि पृथ्वी केवळ आपल्याला रहाण्यासाठी आहे या गैरसमजुतीनेच त्याने , स्वतःच्या स्वार्थासाठी , सुष्टीच्या जिवनचक्राचा विचार न करता केवळ संहार आरंभला आहे.


त्यात परत हे जग समस्त मानवालासाठीच रहाण्यासाठी आहे असाही त्याचा उद्देश नाही , तर हे केवळ आपल्याच संकुचीत विश्वात असणाऱ्यांसाठीच असावे असे त्याला वाटते, जसे की निव्व्ळ आपला समाज, आपला धर्म, आपला देश, मग त्यातुन फोफावतो तो दहशदवाद, आपापसातील युद्धे, आणि संहार.


या निसर्गसाखळीतील आपण ही एक कडी आहे हे तो शक्तीच्या कैफात विसरला आहे, पण निसर्ग हे विसलया आहे काय ?


शेवटी न्याय करणारा व करतो तो निसर्गच.



Sunday, November 11, 2007

कळतनकळत

आयुष्य जगत असतांना आपल्या हाती बऱ्याच वेळा कळतनकळत अनेक व्यक्ती दुखावल्या जात असतात. आपल्या मस्तीमुळे, रुबाबामुळे, जाणीव नसल्यामुळे, स्वतःला शहाणा समजत असल्यामुळे, इतरांना तुच्छ लेखल्यामुळे, कधी जाणुनबुजुन, तर कधी अजाणातेपणे, दुर्लक्ष केल्यामुळे,लक्षात न आल्या मुळे, गॄहीत धरल्यामुळे, एक ना अनेक कारणामुळे आपल्या हाती दुसऱ्यांवर अन्याय होत असतो.

कधी तरी , केव्हातरी मग ही दुखवलेली माणसे , प्रसंग आठवतात, वाईट वाटते, वाईट वाटुन घ्यायला तसा खुप उशीर झालेला असतो. आणि नसतो ही. अजुनही मी त्यांच्या पाशी दिलगिरी व्यक्त करु शकतो.

धन्यवाद, मुंबई पोलीस.

मुंबई पोलीस करत काय आहेत ? झोपले आहेत काय ? का जाणुनबुजुन दुर्लक्ष करतात ? हा प्रश्न मला नेहमीच सणासुदीच्या काळात पडतो. कोर्टाने रात्री दहा वाजतची दिलेली कालमर्यादा पाळण्याचे भान फारच थोडया अतिउत्साही कार्यकर्त्यांना व अजाण नागरीकांना असतो. रात्री दहा नंतर मिरवणुका काढायला, फटाके फोडायला यांना ऊत येतो, चेव येतो. समाजातील काही मुठभर घटक नेहमीच शांतताप्रिय लोकांना वेठीस धरत आलेले आहेत. यांना पोलीस आवरत का नाहीत ?
( आमच्या सिंहगड रस्तावर अभिरुची बाहेर भर रस्तावर नवरात्री निमित्ते बांधलेला मंडप. अर्धा रस्ता अडवुन बसलेला मंडप दिवाळीत , टप्पा टप्पाने, सावकाशीने सोडवायला घेतला गेला)

काल रात्री सव्वा दहा वाजता आमच्या विभागात पोलीस अधिकाऱ्यांनी गस्त घालत या सणप्रेमीच्या बेलगाम अतिउत्साहाला वेसण घातली. फटाके फोडायला मनाई केली.

धन्यवाद, मुंबई पोलीस, आपल्या वर नेहमीच या सणाच्या दिवसात कामाचा अतिरिक्त ताण पडत असतो. आपल्या घरातील सणवार बाजुला ठेवुन आपण आपले कर्तव्य बजावत असतात.

Saturday, November 10, 2007

गिरगाव रंगावली ग्रुप व रंगावली प्रदर्शन




for details please log in to
http://www.girgaonrangavaligroup.com/

आज रंगावली प्रदर्शन पाहाताना," अप्रतीम, सुरेख, मस्तच, टॉप, व्हाव, उत्तम, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ, सुंदर, छानच, लव्हली, झकास, सही, वा, सुपर्ब, मार्व्हलस, मान लिया " आदी, एकादी अद्वितीय कलाकृती पाहिल्यानंतरच्या बघणाऱ्यांच्या जेवढ्या जेवढ्या जगात उत्स्फुर्त प्रतिक्रीया होत असतील त्या सर्व ऐकु येत होत्या. कशी काय काढली असेल ? कित्ती मेहनत आहे ही रांगोळी काढतांना ! या साऱ्या रांगोळ्या बघतांना भानच हरपायला होते ! हे कलावंत किती उत्कॄष्ट निर्मीती करत असतात! यांच्या कडुन हे सारे कोण करवुन घेत असेल ? दिल खुश हुवा !

केवळ आपला हा छंद , कला लोकांपर्यंत पोहचवायला, त्यांना नितळ आनंद द्यायला, निव्वळ आपल्या आंतरीक समाधानासाठी हे अवलीया कलावंत या दिवाळीच्या दिवसात देहभान हरपुन सतत दोन दोन दिवस या रांगोळ्या काढत असतात. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. परत या मधुन व्यावसाईक लाभ काहीच नाही. केवळ सारे कले साठी. या अजरामर कलाकृतीचे आयुष्य ही क्षणभंगुर, केवळ दहा बारा दिवस. पण हे दहा बारा दिवस साऱ्या वर्षासाठी पुरतात.

दर वर्षी दिवाळी आली की सर्व प्रथम आठवण होते, ओढ लागते ती या रंगावली प्रदर्शनाची. गेली अठरा वर्षे "गिरगाव रंगावली ग्रुप " , भीमाबाई राणॆ म्युनिसिपल शाळा, सेंट्रल प्लाझा समोर, गिरगाव येथे रंगावली प्रदर्शन भरवत आहेत. यंदा १४ नोव्हेंबर पर्यंत हे प्रदर्शन खुले आहे. हे जर का पाहीले नाही तर जीवनातील एका अमुल्य अनुभुतीस आपण मुकु.

वास्तविक पहाता येथे फोटो काढण्यास मनाई आहे. लोक फोटो काढुन त्याचा गैरफायदा घेतात. संयोजकांनी मला एक दोन फोटो घेण्यास परवानगी दिली त्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे. स्पष्ट सुचना लिहीलेल्या असतांना सुद्धा कॅमेरा बाहेर काढण्याचा प्रमाद माझ्या हातुन घडला, खर म्हणजे मी आधीच संयोजकांची परवानगी घ्यायला हवी होती. मी चुकलो.

"गिरगाव रंगावली ग्रुप " याच्या शब्दात सांगायचे झालेच तर
गिरगांवातील रंगवल्लीचा असणारा हा "गिरगाव रंगावली ग्रुप " म्हणजे विविध क्षेत्रातील नामवंताचा रांगोळीतुन घडवलेला साक्षात्कार. कर्तुत्वातुन सौदर्य अविष्कार दाखवून सामान्यांना सॄष्टीतील दॄष्ट्री दाखविणारा व दिपावलीची नेत्रसुखद भेट देणारा.

विविध नवोदित कलावंताना कलाशैली तंत्राचा वापर करुन मानसीक आनंद प्राप्ती , ज्ञान व वास्त्वता, एकाग्रता, कौशल्यासाठी प्रयत्नशील असा हा गॄप, व्यक्तीचित्रासाठी व वास्तववादी चित्रासाठी आग्रहशील. यंदाच्या १९ वर्षी ह्या ग्रुपने रंगावली प्रदर्शनात वर्षभरातील महत्वपूर्ण घटना - शैक्षणीक , कलात्मक, सामाजीक इ. क्षेत्रातील विषयांची रांगोळीतुन मांडणी केली आहे. प्रदर्शन पहाताना प्रदर्शनाची आखणी, रांगोळीसाठी हवाबंद हॉलमधील व्यवस्था रंगावली चित्रावरील कल्पक शीर्षके यामुळे सर्व कलारसिकांना ही रंगावली चित्रे पाहायला मिळतात.



यंदाच्या प्रदर्शनात रंगरेखाटनाद्वारे ३ कलाकॄती निर्माण झाल्या आहेत. "