#खाद्यभ्रमंती
खोपोलीवरुन पाली येथे जाताना वाटेत जांभुळपाडा नावाचे गाव लागते. जांभुळवाडा फाट्यापासुन दोन मिनिटाच्या अंतरावर "रेस्ट इन फॉरेस्ट" नावाचे उपहारगृह आहे.
या ठिकाणी कांदाभजी, बटाटावडा,भाजणीचे थालीपिठ, मिसळ उकडीचे मोदक आदी मिळणारे खाद्यपदार्थ चविष्ट असतात. येथे जेवणही मिळते.
गावात गेलं की लागते दिक्षित भोजनालय. जांभुळपाड्यातील प्रसिद्ध गणेश मंदिराच्या जरासं पुढे. त्यांच्याकडे उत्तम शुध्द शाकाहारी घरगुती जेवण मिळते.
राजभाऊ दोन्ही ठिकाणी जेवलेले आहेत. दिक्षित भोजनालय जास्त आवडले.
येथे जांभुळपाड्यात खायचे, जेवायचे, गणेशाचे दर्शन घ्यायचे व पुढे पालीला बल्लाळेश्वराचे दर्शन घ्यायला जायचे.
No comments:
Post a Comment