कॅफे बे लीफ.
रमाडा प्लाझा. बालेवाडी जवळ. मुंबई-पुणे महामार्ग. पुणे
आज जुने फोटो बघतांना राजाभाऊंचे मन भुतकाळात गेले. त्या फोटोंमधे "कॅफे बे लीफ" चे फोटो होते. हे राजाभाऊंच्या आवडत्या रेस्टॉरंटमधले एक. चारपाच वेळा ते येथे बुफे खायला गेले होते.
आधीच पुण्याला जाणॆ होत नाही म्हणुन कावलेले राजाभाऊ त्यात त्यांना काळेकाकुंनी "हॉलीडे इन" बंद झाल्याची बातमी दिली. मन खट्टु झाले. ह्यांचे बुफे हे आता इतिहासजमा झाले तर.
मग त्यांनी आजुबाजुला कुणी नाही हे पाहत ( विश्वास ठेवायला नको असे ऐकावे लागु नये म्हणुन गुपचुप कारभार) "कॅफे बे लीफ" ला फोन लावला. पलीकडुन फोन उचलला गेला. एक चांगली बातमी मिळाली. हे हॉटेल आता रमाडा प्लाझानी घेतले असुन "कॅफे बे लीफ " सुरु आहे
No comments:
Post a Comment