दैव देते आणि कर्म नेते , सध्या राजाभाऊंची अशी अवस्था झाली.
चांगल्या तीन दिवसाच्या सुट्ट्या, त्याला जोडुन घेतलेली रजा. पुण्यामधली हॉटेलं विशेष आवडतात म्हणुन आजचा दिवस साजरा करण्यासाठी मुद्दामुन पुण्याला येवुन केलेला मुक्काम.
सकाळपासुन दुपारपर्यंतच्या खाद्ययात्रेचा काळेकाकूंनी ठरवलेला जंगी बेत आणि रात्रीचा सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या JW Marriott मधल्या "पाशा" ह्या रेस्टॉरंट मधला खासा बेत.
पण. हाय रे देवा.
सफरचंद खात राजाभाऊ आज बसले. पोट बिघडायला नेमका आजचाच दिवस सापडावा ?
राजाभाऊ जखमी झाले असतील पण त्यांनी उमेद सोडली नाही. मग पुढच्या भेटीत ते "पाशा" मधे जेवायला गेले.
चोवीसाव्या मजल्यावर रुफटॉप वर असलेले हे रेस्टॉंरंट. रात्रीच्या वेळी वरुन पुणे काय छान दिसत होते. मजा आली. नेमके खिडकीजवळच टेबल मिळाले होते. आतले वातावरण, सजावट मस्तच. स्टार्टर्स काय मागवले ते आता लक्षात नाही. जेवणात पनीर लबाबदार आणि बटर कुलचा.
"पाशा" मधील जेवण, वातावरण येवढे भावले की मग परत ते आपल्या आईवडलांना घेवुन तेथे
No comments:
Post a Comment