Wednesday, December 15, 2021

पुर्णिमा रेस्टॉंरट

 जुना लेख.

श्री. चंद्रमोहन कुलकर्णीसरांचे चित्रप्रदर्शन पाहुन झाल्यावर मग फोर्ट मधल्या एखाद्या उपहारगृहात उदरभरण करावयासी जावे असा जणु अलिखित नियमच आहे की काय असे राजाभाऊंना गेले काही दिवस त्यांच्या दोन स्नेह्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या उपहारगृह, भोजनगृहावर , जेवणावर लिहिलेल्या पोष्ट वरुन वाटत होतं. 

त्यात परत काल राजाभाऊंना त्यांच्या कार्यालयात दोन सहकाऱ्यांची झालेल्या उपहारगृहासंबंधी झालेल्या चर्चेत आपले ह्या विषयावर किती ज्ञान तोकडे आहे, अजुन कितीतरी ठिकाणी खायला , जेवायला जायचे आहे हे प्रकर्षाने जाणवले होते.  मग त्यांनी मनाशी ठरवलं , आता आपण  ज्या ठिकाणी खाल्ले आहे तेथे मुद्दामुन म्हणुन जायचे नाही, नविन नविन जागा शोधायच्या.

काही उपहारगृह आयुष्यभर आपल्या अगदी डोळ्यासमोर असतात पण का कोण जाणे आत जावुन खाणॆ काही होत नाही.  ह्या भागातली काही ठिकाणं आज हेरुन ठेवली आहेत.  बॉंम्बे हाऊस समोरचे "पुर्णिमा रेस्टॉंरट " हे त्यापैकी एक. त्यात परत दाक्षिणात्य पदार्थ व मिल्स म्हणजे राजाभाऊंचे अतिशय आवडणारे.  मग काय राजाभाऊंनी तिथे जावुन  हल्लाबोल केला.










No comments: