Sunday, December 19, 2021

मेतकूट

 पुन्हा एकदा ठाणे, पुन्हा एकदा मराठमोळं खाद्यपदार्थ खाण्याची झालेली इच्छा.

राजाभाऊंना वरणभात आणि मेतकूट मधले मेतकूट ठावुक. 

असंच कधीतरी "मेतकूट" नावाचे उपहारगृह ठाण्यामधे आहे हे कळाले होते. तेव्हा पासुन ते नाव डोक्यात एकदम फिट्ट बसलेले. ठाण्याला पोचले काय आणि त्यांच्या मनाने उसळी घेतली काय.  

मग राजाभाऊ सहकुटुंब सहपरीवार "मेतकूट" मधे पोचले ते कोथींबीर वडी, मटार पॅटीस, भाजणीचे थालीपीठ खाण्यासाठी. 

पदार्थांची चव उत्तम होती हे सांगणे नको. खुप आवडले.

एवढे आवडले की पुन्हा पुढच्याच आठवड्यात ते परत "मेतकुट" मधे परतले.


No comments: