Saturday, December 18, 2021

राम आश्रय



 प्रचंड, महाप्रचंड भुक आज पहाटे राजाभाऊंना लागली. (तशी ती नेहमीच ते घराबाहेर पडले नी पडले की लागतेच लागते )

मग काय स्वारी वळली माटुंग्याकडे आपल्या नेहमीच्याच "राम आश्रय" मधे. कोकोनट शेवया आणि नीर डोसा खायला, आणि कापी पिण्यासाठी.

पहाटे पहाटे लोक मॉर्निंग वॉकला जायला निघतात की खायला कळेनासे झाले. तरी बरं थांबावे लागले नाही. पटदिशी जागा मिळाली.

पहाटे पाच वाजता हे उपहारगृह उघडते म्हणे.

No comments: