Saturday, December 18, 2021

खाद्यभ्रमंती, रामआश्रय

 तर ह्या अश्या खाद्यभ्रमंतीचा दुसरा पडाव आहे माटुंग्याला. राजाभाऊंचा एक पारसी मित्र नेहमी म्हणत असतो "साऱ्या जगात जेवढे पारसी नसतील तेवढे मद्रासी ह्या माटुंग्यात आहेत" 

तर ह्या दाक्षिणात्यांसाठी इथे अनेक उपहारगृह आहेत. "रामा नायक यांचे श्रीकृष्ण बोर्डींग हाऊस " सारखे भोजनगृह आहे.

कॅफे मद्रास, कॅफे म्हैसुर, इडली हाऊस, आनंद भुवन, रामआश्रय, शारदा भवन, आर्य भवन, मणी, अंबा भवन   अशी नानाविध उपहारगृह ह्या माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ एकवटली आहेत. ज्याला जिथली चव रुचेल त्याप्रमाणे तो त्या त्या उपहारगृहात जात असतो. 

राजाभाऊंचे येथली आवडती जागा म्हणजे "रामआश्रय".

येथे त्यांचा मेन्यु ठरलेला असतो. आवडीचा नीर डोसा, सोबतची नारळाची चोय, ती लाल चटणी, सांबार आणि चटणी, त्यापुर्वी भुक प्रज्वलीत करण्यासाठी एक वाटी रसम, लहर आलीच तर एक ऑनियन रवा डोसा, किंवा इतर काही. पण काहीही खा शेवट हा ठरलेला असतो. एक फिल्टर कापी व बिल दिल्यानंतर बाहेर पडतांना काऊंटर ठेवलेले पान.








No comments: