एक साधं बदामाचे झाड. रोजच्या पहाण्यातलं, आणि सवयीने दिसुन सुध्दा न दिसलेलं.
पण हाच बदाम जेव्हा दुर्गाबाई आपल्या "निसर्गोत्सव" मधे भेटतो तेव्हा एक नवी दृष्टी देवुन जातो.
"आणि हे पाहा सडसडीत अंगलटीचे पण तितक्याच डौलदार माथ्याचे बदामाचे झाड. पाने पळसासारखी पण मोठी व लांबट आहेत. ती आता पिकून गळताहेत. पण पिकलेल्या अवस्थेतला रंग किती सुंदर लाल ! त्याचा कोवळ्या पानांनीसुध्दा हेवा करावा असा ! सबंध झाड शेंदरी दिसत आहे. एकीकडे ही पिकली पाने टपाटप गळाताहेत. एकीकडे पांढरा मोहोर बारीक हिरव्या काडयांना चिकटलेला तुऱ्यांसारखा अधूनमधून डोकावतो आहे. झाडावर जुन्या बाराचे हिरवे बदाम लटकलेलेच आहेत. फांदया काही ठिकाणी उघडया दिसत आहेत. ठिकठिकाणी गळत्या पानांच्या जागी नव्या पानांचे पोपटी लालसर, निरंजनाच्या ज्योतीप्रमाणे दिसणारे मोठेमोठे कळे जोरात वर येत आहेत. ..... "
पुरती वाट लागुन राहिली आहे. आधीच मनात "सखा नागझिरा " नी वणवा पेटुन राहिला , त्यात " ’निसर्गोत्सव " नी त्यात झाडांची जणु इंधनासाठी नवी भर टाकली.
आदल्या दिवशी रात्रीपर्यंत दाजीपुरला जावुया चा घोष लावलेले राजभाऊ बेतापासुन माघारी (नेहमीप्रमाणॆच ) फिरले आणि जाधवगढीवर पोचले.
एक मात्र बरं झाले. गढीत मोठाली दोनचार कमळं पहायला मिळाली. "सिध्देश्वराच्या तळ्यातील कमळे " हा लेख वाचल्यापासुन कमळ पहावशी वाटत होती. "वडील मंडळीत त्या कमल नयनेला कमलाक्षाने कमळाच्या बीने मारावे असे मला वाटले, पण बी मारायचा अविर्भाव करताच तिने जिभ दातांनी चावुन आणि डोळे फिरवुन मला तसे करु दिले नाही " - हा प्रेमिकांच्या नवथर सलज्ज लिलांचे वर्णन सांगणारा जगन्नाथ पंडीतांचा श्लोक त्यात वाचला .
1 comment:
very nice post..
snaps r very cool..
Post a Comment