Monday, November 16, 2009

प्लॅस्टीकच्या कॅरी बॅगचा मोह टाळा. कापडाची थैली घेतल्याशिवाय खरेदीला निघु नका.

जमावाला, झुंडीला संमोहीत करुन त्यांना आपल्याला जे हवे ते त्याना करायला लावण्याची कला फार मोजक्या लोकांना अवगत असते. हा भारलेला जमाव काय करत असतो याची अनेक उदाहरणे आपण डोळ्यासमोर बघत असतो , या घटनांचे आपण साक्षीदार असतो.

पण हे असे जादुगार त्या समाजातील घटकांना एक व्यक्‍त्ती म्हणुन त्यांचे अस्तित्व कायम ठेवुन जेव्हाका  भुरळ पाडत असतात तेव्हा त्यांच्या हाती काहीतरी विधायक कार्य होत असते , काही तरी  असे नवनिर्माण होत असते, जे अनेक कायदे करुन ही किंवा असलेल्या कायद्यांची अगदी काटॆकोरपणे अंमलबजावणी करुन देखील होण्यासारखे नसते.

बहुतेक सर्वच वेळा काय केले जावु नये हेच सांगितले जाते. पण जेव्हा त्याच बरोबर तुम्ही या प्लास्टीकच्या कॅरी बॅग वापरु नकात , त्या ऐवजी  आम्ही तुम्हाला सहज माफक किमतीत उपलब्ध करुन दिलेल्या या कापडाच्या पिशव्या वापरा असे समजवुन सांगितले जाते , तेव्हा माणसे ते आनंदाने ऐकतात.  मतपरिवर्तन होवुन  भाजी विक्रेते, दुकानदार   प्लास्टीकच्या कॅरी बॅग ठेवणॆ बंद करतात, आणि त्यामागे वर्षाकाठी खर्च होणारा पैसा बचत करतात.

विलेपार्ल्यात जर का तुम्हाला भाजीवाल्यांनी, उपहारगृहवाल्यांनी प्लॅस्टीकच्या कॅरी बॅग दिल्या नाहीत तर त्यांच्याशी भांडु नकात, उलट ते व आपण पर्यावरण रक्षणासाठी कुठेतरी हातभार लावत आहोत या जाणीवेने खुश व्हा.  तसेच आपल्यामुळे अनेकांना या कापडी पिशव्या तयार करण्याचा रोजगार मिळाला आहे या भावनेने फिल गुड करा .

वापरल्यानंतर जेव्हा या कॅरी बॅग्स रस्तात, गटारात, घरगल्यांमधे बेदरकारपणे फेकल्या जातात तेव्हा काय होते याचा अनुभव मुंबईनी एकदा चांगलाच घेतला आहे.  त्याच बरोबर यांचा वापर मनात आणले तर बंद होवु शकतो अश्या प्रकारची  अनेक उदाहरणे आहेत.

हि सारी किमया आहे , श्री. सुभाष दळवी नामक अवलियाची. मुंबई शहर हे स्वच्छ, सुंदर करण्याचा ध्यास  घेतलेल्या एका महानगरपालिकेत काम करत असुन आपल्या चाकोरी बाहेर जावुन   हे असे अनेक प्रकल्प राबवणाऱ्याची.  काही वर्षापुर्वी ग्रॅंटारोड ला भाजीगल्लीत सुरु झालेली हि मोहिम आता  विलेपार्ल्यात पोचली आहे. हा प्रकल्प येथे गेले सहा महिने राबवला जात आहे.

आता ते मुंबईत अनेक विभागात या प्रकल्प घेवुन जाणार आहेत.

अपुर्ण.

3 comments:

Anonymous said...

India has covered lot of ground in preventing the use of plastic bags. It is heartening to see that India is far ahead of US in this respect. In US, only very conscious outlets like Trader Joe's and REI have stopped using plastic bags. Indeed I have not seen their use at these two places over last several years. But the grocery stores in US still use plastic bags as if there is no tomorrow.

अपर्णा said...

या विषयावर जितक्यांदा लिहायचं तितकं कमीच आहे..लेकाच्या वाढदिवसाच्या रिटर्न गिफ़्टस मी एका इथे मिळणार्या कापडी ग्रोसरी बॅगेत दिल्या...आशा करते ज्यांना दिल्यात त्यांनी आता बाजारात प्लास्टिक घ्यायचं बंद केलं असेल....

HAREKRISHNAJI said...

कदाचीत प्लॅस्टीक वाईट नसेलही. कागदी पिशव्यांपेक्षा त्या बऱ्या कारण कागदासाठी झाडॆ कापावी लागतात असा मी एक लेख वाचला होता.

पण एकतर त्या पिशव्या नष्ट होत नाहीत व ज्याप्रकारे त्या फेकल्या जातात ते पर्यावरणाला फार घातक असतात.

ग्रॅटरोड रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या मोठ्या भाजीगल्लीत कॅरीबॅग बंद करण्याच्या प्रकल्पामधे मी श्री.दळवींबरोबर होतो. गंमत म्हणजे याच काय पण इतर काही मोहिमेचा त्यांच्या कार्यालयीन कामाशी संबध अजिबात नव्हता, उलटपक्षी त्यांना त्याच्या मुळे फारच त्रास झाला.

महिला बचत गटाकडुंन कापडी पिशव्या शिवल्या गेल्या. नाममात्र १० रुपयात त्या ग्राहकाला विकल्या गेल्या. काम संपल्यावर त्या कोणात्याही विक्रेत्याला परत करा, तुमचे १० रु. परत दिले जातील. प्लॅस्टीकच्या कॅरी बॅगमागे खर्च होणारे ३०-४० रु. रोजच्यारोज बजत खात्यात जमा केले जावु लागले.

आणि अपर्णा, आपण एक चांगल्या कामाला सुरवात केली आहे.

माझा एक आणखीन ब्लॉग आहे. जरुर वाचणॆ.
http://www.maazimumbai.blogspot.com/