ज्या बापाकडुन हे ज्ञान मुलाला प्राप्त होते ते दोघे ही धन्य होय.
खर म्हणजे त्यानी सांगायला पाहिजे होते, ( मिलींद बोकिल यांच्या "कातकरी विकास की विस्थापना" या पुस्तकातुन )
सम्राट अशोकाच्या काळापासुन कोकण किनाऱ्यावरुन मध्य-पुर्व आशिया आणि त्या पलीकडच्या प्रदेशाशी व्यापार चालत होता. सोपारा, कान्हेरी आणि कल्याण ही त्या वेळची व्यापाराची मोठी ठिकाणे होती, ती एकामेकांच्या जवळ तर होतीच , पण खाडीमुळे सागरी दळणवळणही सुलभ होत होते. भूमध्यसागरी प्रदेशातून भारतीय वस्तुंना जसजशी मागणी वाढत गेली तसतसे कोकण किनाऱ्यांच्या बंदरांना महत्व येत गेले. नंतर सातवहनांच्या काळात, हा व्यापार चांगलच भरभराटीस आला. त्या काळात कर्हाड, नाशिक, भोहरदर, ते पैठण अशी जी महत्वाची ठिकाणे होती ती जुन्नरमार्गे ह्या व्यापाराशी जोडली गेली होती. या व्यापारासाठी देशावरून कोकणात उतरणारे थळघाट, नाणे घाट, बोरघाट, आंबाघाट इत्यादी रस्ते आजमितीसही उपयोगात आहेत.
या रस्तावर ज्या गुहा किंवा लेणी कोरलेली आहेत तिथे बुद्ध भिक्षुंचे वास्तव्य होते, जेथे दळणवळणाचे मार्ग होते आणि ज्यावरुन माणासांची ये-जा चाले , तिथे जावुन धर्माचा उपदेश केला जात होता.
कोकण आणि दख्खन पठाराचा हा भरभराटीचा काळ असावा. देशावर धान्याची विपुलता असावी आणि व्यापाराने बंदरांना बरकत येत असावी. सातवहानाच्या काळात ज्या आठेकशे गुहा पश्चिम घाटात कोरल्या गेल्या त्या मागे ही सुब्बता कारणीभुत होती. या व्यापारी मार्गावर जे विहार आणि मठ स्थापले गेले त्यांनी या व्यापाराला एक धार्मीक अधिष्टान पुरवले तर व्यापाराचा समॄद्धीने मठ व विहाराची तसेच लेणी-स्तुपाची वाढ झाली.