Sunday, October 05, 2008

मेनलॅड चायना -सेनापती बापट रोड


पुणे खुपच बदललय हो. माझ्या वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर एकाद्या उत्तम ठिकाणी जेवायला कोठे जायचे याचा विचार करतांना मला प्रकर्षाने आठवण झाली श्री. शंतनु घोष यांच्या ब्लॉगची. जंगली महाराज रोड काय किंवा फर्गुसन रस्ता काय याच्या पलीकडेही जग आहे आणि ते ही अत्याधुनीक हे त्यांचे सर्वोत्तम खाण्यावरचे लेख वाचतांना लक्षात आले होते, वाढदिवसाच्या निम्मीत्ते या जगाची हळुहळू खाद्यभटकंती करायला सुरवात करणाचे ठरवले.


खर तर आधी ठरवले होतो सन ऍड सॅन्ड मधे त्यांच्या शिफारीस प्रमाणे सकाळी बुफे जेवायला जायचे. पण मुलानी त्याला विरोध केला व तो बेत बारगळला, त्याला रात्रीचेच जेवयला जायचे होते. मग दोन पर्याय समोर होते "सिगरी" की मेनलॅड चायना ? मग शेवटी त्याला चायनीसच खायचे असल्यामुळे सेनापती बापट मार्गावर असलेल्या मेनलॅड चायना मधे जाण्याचे ठरवले.

रात्री अभिरुची ते माणीक बाग पर्यंत जबरदस्त टॅफीक जॅम होता , त्यात पडणारा कंटाळवाणा पाऊस. पोचायला अंमळ उशीरच झाला. पण त्या नंतर जेवणाची जी अनुभुती मिळली त्यात हा त्रास, आलेला शिण नाहीसा जाला.

अगदी डेलीकसी असणारे , नजाकतीचे, वन ऑफ द फायनेस्ट, मस्त जेवणाचा येथे आस्वाद घेतला. पुण्यामधले हे सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ चायनीस आहार मिळाणारे रेस्टॉरंट आहे. प्रशस्त जागा, उत्तम ऍंबीयंस, बरे झाले आधी टेबल बुक केले होते, नाहीतर गर्दी पाहात थांबावे लागले असते.

जेवणाची सुरवात एका नव्या बार्बेक्यु बटाट्याची डिश नी केली. त्या बरोबर मागवले व्हे. फ्राईड वॉंटॉन व व्हे.क्रिस्पी चिली . वा, प्रथम घासे बहार आली . मुख्य जेवणात एक नव्या प्रकारचा नाजुक फ्राईड राईस मागवला, चक्क कमळाच्या पानात लपेटलेला, बदाम घालुन शिजवलेला. त्याच बरोबर मागवले मिक्स व्हेजीटेबल फ्राईड राईस, व्हे. डंपलिंग इन चिली सोया सॉस, स्वीट ऍड सार क्रिस्पी नुडल्स.
बहार आली. पण जरा व्हे.डिशीस कमी पडल्या, एकादी ग्रेव्ही वाली डिश आणखी मागवायला हवी होती.

जेवणाचा शेवट माझ्या बायकोने तिला परमप्रिय असणाऱ्या डेसर्ट नी, हनी नुडल्स आमंद प्लेक्स विथ वॅनीला आईस्क्रिम नी व मी डेट पॅन केक नी केला.

ही रात्र आता सदैव लक्षात राहील.


4 comments:

वर्षा ऋतु said...

mI college madhye astana Mumbaichya
MAINLAND CHINA madhye geli hoti...

khaayala nahi... Interior pahaayalaa.
:(
restaurantachya case studies karaayachya hotya aamhala..

decor pahun mi tar jaam khush zale hote..
mag samajl, ki kaahi tyanchi purn bhaaratat hotelachi chain aahe..

aani saglyanch Interior ekach manus karato.
bahutek vastusudhha thet tithun aanalelya aahet..

hI post baghun...
bhukelya poti kelelaa Hotelachaa
case studycha divas aathavala :)

HAREKRISHNAJI said...

वर्षा ऋतु ,

आता येथे कधीतरी जेवायला जा ना. जेवणही तेवढेच आवडेल.

माझ्या आत्याचे यजमानही Architect and Interior Decorator आहेत.

वर्षा ऋतु said...

जेवणाच ठीक आहे हो..
पण रसनातृप्तीसाठी माझा बटवा पण तृप्त पाहिजे ना... [ पैशाने ;) ]

hehehe :)

HAREKRISHNAJI said...

कधीतरी केव्हातरी सणावारी एखाद्या आनंदाच्या क्षणी जे्व्हा पैसा हा दुय्यम असतो तेव्हा जमायला हरकत नाही. पुण्यातील मेनलॅड चायना तसे फारसे महाग नाही