Saturday, July 31, 2010

प्रौढपुष्पेः कदम्बै:

रुक रुक के चली और चलके रुकी.
लोकल ट्रेनची अवस्था वाईट होती. पण राजाभाऊंना त्याच काय ? त्यांच मन विहरत होते नॉर्वे मधे, जणु ते नॉर्वेमधल्या "बर्गन रेल"नेच प्रवास करत होते , मेधा आलकरी लिखीत ’सुर्य होता रात्रीला " हे प्रवासवर्णन वाचता वाचता.

अपर्णा मोडक यांनी लोकसत्ता मधे लिहिलेला कदंबा वरील अप्रतिम लेख वाचल्यानंतर केव्हा एकदा हा वृक्ष, ती मोहक फुले पहातो असे झाले होते.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=84563%3A2010-07-09-06-59-22&catid=104%3A2009-08-05-07-53-42&Itemid=117

आणि अचानक राजाभाऊंचे तिच्याकडे लक्ष गेले, अगदी त्यांच्या समोर , ती तिथेच बाहेर होती, लावण्यवती, भुलवणारी , मोहावणारी. जिला त्यांना आधी असंख्य वेळा पाहीले असेल पण नाव ठावुक नसलेली ती अनामिका,
ती कदंबाची वेडावुन सोडणारी फुले. 
सा सुदरा अस्ति ।


आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।


आषाढ आला, मेघदुताचे वेध लागले.

तर मग असा हा कदंब राजाभाऊंना मेघदुतात पण भेटला.

नीचैराख्यं गिरिमधिवसेस्तत्र विश्रामहेतो
स्त्वत्संपर्कात्पुलकितमिव प्रौढपुष्पेः कदम्बै: ॥

रोमांचित होती तव स्पर्शे कदंबाचीहि फुले
नीचगिरी आहे विश्रांतीला तू थांब जरासा रे ॥

हस्ते लीलाकमलमलके बालकुन्दानुविद्ध
नीता लोध्रप्रसवरजसा पाण्डुतामाननेश्रीः ॥

चुडापाशे नवकुरबकं चारु कर्णॆ शिरीषं
सीमन्ते च त्वदुपगमजं यत्र नीपं वधूनाम ॥

आहे जिथे वधूच्या केसात कुन्द माळलेले,
विलसते तेज मुखांवर लोध्रपुष्पे परागे ॥
केशपाशी नव-कुरबक, कदंब-पुष्प भांगी
असे कानीं मोहक शिरीष, क्रीडा-कमळ हाती ॥


नीपं दॄष्टवा हरितकपिशं केसरैरर्धरुढे
राविर्भुतप्रथमुकुलाः कन्दलीश्चनुकम ॥
जग्ध्वारण्येष्वधिकसुरभिं गन्धमाध्रय चोर्व्याः
सारड.गास्ते जललवमुचः सूचयिष्यन्ति मार्गम ॥


अर्धकेशी हिरवी करडी नीवफुले पाहत
पाणातिरी नवमुकुलांछ्या कंदली खात खात ॥
दग्धवनी हुंगत असता मधु मातीचा गंद
नवजल शिंपीतां तुजला दावि मार्ग सारंग ॥

ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या " हे मेघा " मधुन मराठी, आग्लभाषीय काव्यानुभाव साभार.

There you should stay
with the object of taking rest
On the mountain of Nicha
Bristling as it were , at your touch,
With Kadamba trees,Promient with flowers.


Where the young ladies have
A sportive lotus in their hands
Interweave their hair
With fresh Kunda flowers.
Have a beauty of face
Renered yellowish white
With pollen of Lodhra flowers
Wear the fresh Kurabaka flowers,
in their luxuriant hair,
The lovely Sirisa on their ears,
And the neepa that spring up
Into existance at your approach
On the line of parting of their hair

Seeing the neep flowers
Greenish brown
On account of half-grown filaments,
Eqating the leaves of KAndalis
On marshy banks
With the first buds appearing on them,
And shelling the strong odour
Of ground in forests
- the bees , - the deers, the elephats
respectively
Will indicate the path to you,
Showering droups of water.

आज अचानक

रुक रुक के चली और चलके रुकी.
लोकल ट्रेनची अवस्था वाईट होती. पण राजाभाऊंना त्याच काय ? त्यांच मन विहरत होते नॉर्वे मधे, जणु ते नॉर्वेमधल्या "बर्गन रेल"नेच प्रवास करत होते , मेधा आलकरी लिखीत ’सुर्य होता रात्रीला " हे प्रवासवर्णन वाचता वाचता.
अपर्णा मोडक यांनी लोकसत्ता मधे लिहिलेला कदंबा वरील अप्रतिम लेख वाचल्यानंतर केव्हा एकदा हा वृक्ष, ती मोहक फुले पहातो असे झाले होते.
आणि मग अचानक राजाभाऊंचे तिच्याकडे लक्ष गेले, अगदी त्यांच्या समोर , ती तिथेच बाहेर होती, लावण्यवती, भुलवणारी , मोहावणारी. जिला त्यांना आधी असंख्य वेळा पाहीले असेल पण नाव ठावुक नसलेली ती अनामिका, ती कदंबाची वेडावुन सोडणारी फुले.
सा सुदरा अस्ति ।
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।
आषाढ आला, मेघदुताचे वेध लागले.
तर मग असा हा कदंब राजाभाऊंना मेघदुतात पण भेटला.
नीचैराख्यं गिरिमधिवसेस्तत्र विश्रामहेतो
स्त्वत्संपर्कात्पुलकितमिव प्रौढपुष्पेः कदम्बै ॥
रोमांचित होती तव स्पर्शे कदंबाचीहि फुले
नीचगिरी आहे विश्रांतीला तू थांब जरासा रे ॥
हस्ते लीलाकमलमलके बालकुन्दानुविद्ध
नीता लोध्रप्रसवरजसा पाण्डुतामाननेश्रीः ॥
चुडापाशे नवकुरबकं चारु कर्णॆ शिरीषं
सीमन्ते च त्वदुपगमजं यत्र नीपं वधूनाम ॥
आहे जिथे वधूच्या केसात कुन्द माळलेले,
विलसते तेज मुखांवर लोध्रपुष्पे परागे ॥
केशपाशी नव-कुरबक, कदंब-पुष्प भांगी
असे कानीं मोहक शिरीष, क्रीडा-कमळ हाती ॥
२१,२५ २६
नीपं दॄष्टवा हरितकपिषं केसरैरर्धरुढे
राविर्भुतप्रथमुकुलाः कन्दलीश्चनुकम ॥
जग्ध्वारण्येष्वधिकसुरभिं गन्धमाध्रय चोर्व्याः
सारड.गास्ते जललवमुचः सूचयिष्यन्ति मार्गम ॥
अर्धकेशी हिरवी करडी नीवफुले पाहत
पाणातिरी नवमुकुलांछ्या कंदली खात खात ॥
दग्धवनी हुंगत असता मधु मातीचा गंद
नवजल शिंपीतां तुजला दावि मार्ग सारंग ॥
ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या " हे मेघा " मधुन मराठी, आग्लभाषीय काव्यानुभाब साभार.

Monday, July 26, 2010

काय हो हरेकृष्णाजी

महिना दोन महिना पुर्वी राजाभाऊ ब्लॉगर्सच्या स्नेहभोजनाला म्हणुन जे गेले ते कुठे गायब झाले आहेत ?
kaaya

Saturday, July 03, 2010

ब्लॉगर्सचे स्नेहभोजन

आज योग अखेरीस आला, गेले कित्येक महिने एकत्र जमायचे , एकत्र भेटुन मनमुराद गप्पा हाणायच्या (पहिल्या वेळेच्या भेटीत आता दर महिन्यातुन एकदा जमायचे असा ठराव मंजुर झाला होता पण ... ),  याचा बेत ठरत होता.  पण यंदाला मात्र जरासा घोळ झाला,  कुठे जेवायला जायचे ते मात्र ठरता ठरत नव्हते,

लोणावळा, पुणॆ, युसुफ मेहरअली सेंटर , तारा , साऱ्या ठिकाणी घर बसल्याबसल्या सर्वांचे फिरणे झाले.   तारीख तर पक्की झाली होती,  ३ जुलै. पण कुठे जेवायला जायचे ते मात्र ठरता ठरत नव्हते, लोणावळा, पुणॆ, युसुफ मेहरअली सेंटर , तारा , साऱ्या ठिकाणी घर बसल्याबसल्या सर्वांचे फिरणे झाले.   

अखेर "सुरंगा" ( http://kaimhanta.blogspot.com )यांनी पुढाकार घेत अंधेरीस कोहीनुर कॉंटीनेंटल मधे जाणे पक्के करुन टाकले.

मग काय.

गप्पा, गप्पा आणि गप्पा.  मग त्या पुढे जेवणाचे ते काय, ते आपले निमित्त पात्र.


http://vivek-uvaach.blogspot.com/

http://whynotblogitout.blogspot.com/

http://kavismusings.blogspot.com/

http://kaimhanta.blogspot.com/

अपुर्ण.

बंद बंद आणि बंद

मग काय राजाभाऊ, सोमवारी काय बेत ?

महागाईविरुद्धच्या लढ्यात भागबिग घेणार आहेत की नाही ?

Thursday, July 01, 2010

मेघ मल्हार -दिवस तिसरा - पं.कालीनाथ मिश्राजी

हा पाऊस कुठे गायब झाला आहे ?

तापलेले शरीर थंड तर केलेच  नाही परत वरती या शरीराला "ताप" देवुन ह्या फसव्या पावसांनी राजाभाऊंना दोन दिवस नेहरु सेंटर आयोजीत "मेघ मल्हार " पासुन दुर ठेवले. राहुल देशपांडॆ ऐकायचे राहुन गेले, मंजिरी असनारे केळकर, त्यांचे गाणे परत ऐकण्यासाठी केलेली दिर्घ प्रतिक्षा वाया गेली, या पावसाने, या पावसाने घात केला. 

शेवटच्या दिवशी थोडॆ तरी काहीतरी ऐकावे म्हणुन राजाभाऊ पं.कालीनाथ् मिश्रा यांचे तबलावादन ऐकण्यासाठी कसेबसे पोचले.

आपल्या चवदा शिष्यांसमावेत तबलावादन करण्याऱ्या कालीनाथजींचे हे नवे रुप काल पहायला मिळाले, आता पर्यंत त्यांना पाहिले होते ते केवळ कथ्थकला साथ करतांना.

तबल्यावर अनेक रुपात बरसात बरसत होती, कधी मंद मंद, बुंद बुद तर कधी मुसळधार वर्षा, आणि काले बादल, अनावर झालेले, मस्तवाल टकरा घेणारे, पाण्याने भरलेले बादल, ती कडाडणारी बिजली, धरतीची वेध घेवु पहाणारी ती तेजस्वी सौदामीनी.

तालासुरात, मेघ वर्षावात सर्व जण भिजुन निघत होते, त्यात भर पडली ती काही नर्तकांनी तबलावादनात सादर केलेल्या कथ्थक नृत्याने. 

कैसे जीये कोई बिरहकी मारी

हजारो मैलाचा प्रवास करत संदेशवहानाचे काम करणारं कबुतर.  पण हिला साधा बाहेर जाण्याचा भलामोठा रस्ता सापडुन नये ?   कित्येक तास, भेदारलेल्या अवस्थेत, आहे त्याच जागी, बाहेर पडण्याच्या अनेक प्रयत्नानंतर देखिल.


आणि तिचा जोडीदार, काय करत होतो तो इतके तास ? 

बाहेरच्या बाजुस बसुन तिला धीर देत होता. "मै हुं ना "



मिलनाची घडी अखेरीस आली.

ब्लॉग म्हणजे

ब्लॉग म्हणजे साखळदंड.

Monday, June 21, 2010

समाधान स्नॅक्स

राजाभाऊंची नजर कशी, .खाली मुंडी खाणे धुंडी , त्यात उपहारगृहांपेक्षा घरगुती खाणे मिळण्याचे ठिकाण असेल तर ? वा क्या कहना. त्यांच्याचानी आपल्यावर ताबा ठेवणॆ फार त्रासदायक ठरते.

आज ठाकुरद्वारी , मुगभाटाच्या नाक्यावर एक मस्त  खाद्यठिकाण गवसले.

" समाधान स्नॅक्स."

मिसळ उत्तम होती, राजाभाऊंच्या बायकोला तिथले पॅटीस ( बटाटयाचे सारण असलेले ) भावले , तर पुतणीने मुंगडाळ भजींवर ताव मारला.

त्या दोन महिलांनी गेल्याच आठवड्यात या खाद्यमहोत्सवाची सुरवात केली आहे. सकाळच्या नास्तापासुन ते रात्रीच्या पोटभरणी पर्यंत.    

छोटेखानी दुकान. पण समाधानाची गॅरंटी.

काय गं ताई, काय चाललयं ?

शेवळं, खाण्यासाठी नव्हे तर खेळण्यासाठी


जव्हारला पुन्हा पुन्हा जाण्याचा अंतस्थ हेतु


सनसेट रिसॉर्ट मधली नाचणीची भाकरी व मग त्यासोबत इतर भाज्या

बाप आणि लेक -दोघांची तोंड विरुध्द दिशेला

उध्वस्त राजवाडा


नव्या राजवाड्याचीच एवढी हालत खराब आहे तर मग जुन्या राजवाड्याचे काय झाले असावे ?


ही वाट दुर जाते - जव्हारच्या वाटॆवर

कमाल आहे


एकीकडॆ गाडीच्या मागच्या सीट वर राजाभाऊंसारख्या जाडजुड माणसाला दुसऱ्या दोघांबरोबर बसणे अवघड, कठीण जाते तर दुसरीकडॆ,


Sunday, June 20, 2010

लॉग ड्राईव्ह

"तरी मी सांगत होतो , अजुन पाऊस धडपणे पिकलेला नाही, थांब, थोडॆ दिवस थांब, मग जावुया. पण तुला जरासुध्दा ऐकायला नको "

चवताळलेले राजाभाऊ.

बायकोने कधी आपल्या नवऱ्याचे म्हणणे ऐकले आहे का मग ते आज ऐकले जाईल.

संपुर्ण रस्तात एकही पावसाचा म्हणुन थेंब अंगावर झेलणॆ नाही. सारे धबधबे कोरडॆठाक.
मदमस्त , रौद्रसरुपी वैतरणा नुसती रोडावलेली.

त्यात भरीस भर म्हणुन कसाऱ्यापर्यंत मागुन येत असलेल्या दुसऱ्या गाडीच्या चालकाने कसाऱ्यावरुन डावीकडॆ विहीगावकडॆ गाडी वळवल्यानंतर काही कळण्याच्या आत अचानक जी भरधाव सोडली ती थेट खोडाळ्यापर्यंत. जरा देखिल थांबण्याचे नाव नाही. मग त्याला गाठण्याच्या नादात विहीगावात धबधब्याकडॆ झालेले दुर्लक्ष, वैतरणा पुलावर थांबण्याच्या, पुढे असलेल्या कॅनन्समधे उतरायच्या या सर्व सर्व बेतावर त्या गृहस्थामुळे पडलेले पाणी.

सारे वर्षे आपल्या बायकोला व मुलाला या भागातले सारे निसर्गसौदर्य न्याहाळायला केव्हा एकदा घेऊन जातो करुन आतुरतेल्या राजाभाऊंचा सारा विरस त्याने केला. तरी त्यांना  बजावुन सांगितले होते, माझ्या मागे गाडी ठेव म्हणुन, हा सारा परिसर माझ्या माहितीतला आहे.

खोडाळा ते देवबांध - देवबांध ते मोखाडा , मोखाडा ते जव्हार , जव्हार ते विक्रमगड , सारा परीसर नितांत सुंदर आहे. लॉग ड्राईव्ह साठी सर्वोत्तम.

सारा रस्ता उत्तम दर्ज्याचा आहे.

तरी बरे थोडाफार पाऊस पडुन गेल्याने सारी धरती हिरवीगार झालेली.

आता परत एकदा या विभागात ऑगष्ट मधे.  

राजाभाऊ निघाले जव्हारला

हट्ट म्हणजे हट्ट म्हणजे हट्ट असतो.
नवऱ्याचे काहीएक न ऐकण्याचा निश्चय असतो

आधीच हट्टी म्हणजे हट्टी म्हणजे हट्टी स्वभाव असतो
त्यात नवऱ्याने डोक्यावर चढवुन ठेवलेले असते
भरीस भर म्हणजे काकीच्या चमचीची, पुतणीची मिळालेली साथ

आपल्या लग्नात आपला सासऱ्याने सुटकेचा सोडलेला निश्वास
आपला सासरा एवढा खुष का याचे त्यावेळी न उलगडलेले कोडे
आज अचानक झालेला साक्षात्कार.

वादविवादात जिंकण्याचा एक निष्फळ प्रयत्न.
तिने आपल्या प्रत्येक युक्‍तीवादाचे केलेले खंडन.

वानप्रस्थापनात कितव्या वर्षी जायचे असे शास्त्रात लिहिलेले आहे ?
त्याआधी राजाभाऊ जव्हारला जायला निघाले आहेत.

Saturday, June 19, 2010

आल्या आल्या आल्या पावसाच्या धारा

या पावसाच्या धारा घेवुन आल्या त्या रानभाज्या, शेवळ, फोडशी आणि इतर. मग वसईचे भाजीवाले त्या विकायला आणतात.

या दिवसात त्या मुद्दामुन खाव्यात.

 

धाडकन

"चॉकलेट " सारखा भावनाप्रधान चित्रपट पहाताना आपण गुंतुन , गुंगुन गेलेलो असतो. क्लायमेक्स येतो.

आपला मुलगा धाडकन येवुन चॅनेल बदलतो व क्रिकेट लावतो, 

आपला संताप अनावर   होतो.

तो ढिम्म, त्याच्यावर काहीही त्या रागाचा असर होत नाही.

या पावसाने

वर्षभर चांगलीच वाट पहायला लावल्यानंतर आलेल्या पावसाने काल संध्याकाळी घरी परततांना चांगलीच दमछाक केली तर तक्रार कशाला करावी ?

संध्याकाळ ते रात्र, तीन तास घरी पोचायला.

वहातुक कोंडीमधे गाडी चालवुन चालवुन पुरते झालेले भजे, त्यात पर्यंत रस्तावरचे दिवे बंद पडलेले,  काळोखाचे साम्राज्य.  

तुझ्या

तु तर अजुनही आठवणीत रेंगाळते आहेस , पण तुझ्या घराकडॆ घेवुन जाणारी वाट, ती वाट तर केव्हाच विस्म्रुतीत गेलेली आहे.

कुणीतरी

कुणीतरी ग्रेस च्या कविता समझावुन सांगता काय ? काहीच कळत नाहीयं, एवढच नव्ह्रे तर ही कविता आपण आधी वाचली होती का नव्हती याचे भानही रहात नाहीयं.

रावण

"रावण" चित्रपटाच्या म.टा. मधे आलेल्या परीक्षणात, समिक्षेत तो चित्रपट किता अगम्य आहे, गुढ आहे, विचित्र आहे, विक्षितपणाने भरलेला, कशाचा कशाशी संबध नसलेला प्रचंड गुंतागुंताचा असलेला, न समजणारा . सहन करण्याची ताकद पणाला लावणारा, किती  वाईट आहे या बद्द्ल भरभरुन  लिहिले आहे.  चित्रपटला एकीकडॆ चांगलच झोडापुन काढलेले आहे.

आता पर्यंत तसे चित्रपटापासुन लांब राहिलेले राजाभाऊ म्हणातात

" तर मग हा चित्रपट आवर्जुन पाहिला पाहिजे "