Friday, May 15, 2009

"मी शिवाजीराजे भोसले बोलतोय "

महाराज फार पेचात टाकले आहेत आपण.

आपण श्रीयुत भोसल्यांना मार्गदर्शन केलेत, मार्ग दाखवुन दिलात पण त्यामुळे आमच्या जीवनात काहीशी उलटापालट झाली आहे त्याचे काय ?

काल पासुन एक विचार करुन राहिलोय "एका प्रकरणात श्रीयुत भोसल्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन ते जसे वागले तसा वागु काय ? त्या सर्वांना अंगावर घेत ? का पाठीचा कणा नाही हे जाणुन तसाच वागु ?

महाराज, सांगा काय करु ?

उमीया कच्छी दाबेली

मध्यंतरी पुण्यात रिक्शाचा संप होता , बर झाले त्यांनी संप केला नाहीतर " उमीया कच्छी दाबेली " कसे काय सापडले असते ?
राजाभाऊच्या बायकोने हट्ट धरला , मला "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय " बघायचा आहे म्हणजे बघायचा आहे। काहीही करा , चालत चला नाहीतर घोड्यावरून चला , पण आत्ता , आजच्या आज जायचे म्हणजे जायचे ।
जातांना एका रिक्शावाल्याला कोथरुडला जाण्यासाठी डबल पैसे दिले ( महाराज माफी असावी ) । परताना मग काय भारावलेल्या मनास असे पैसे देणे नामंजुर होते । मग काय मजरदरमजर करत निघाली ती महाराष्ट्रीय माणसे।
अचानक कर्वे नगरात राजाभाऊंची नजर गेली एका स्टाल कड़े । "उमीया कच्छी दाबेली " । या आधी कधीच दाबेली घाबरून रस्तावर खाल्ली नव्हती । पण इथे खावीशी वाटली कारण,
एक कच्छी बाई आपल्या घरी सर्व पदार्थ बनवुन येथे चविष्ट दाबेली करुन खवय्यांना खिलवतात, स्वच्छ, रुचकर , मस्त । मजा आली।
(उमीया कच्छी दाबेली , स्पाइस लाइफ गोदरेज, ताथवडे उद्यानाचा रस्ता )

चला सफारीला


Wednesday, May 13, 2009

दिवसा तु रात्री मी

कधीनाही ते राजाभाऊ बायकोला घेवुन नाटकाला गेले. "दिवसा तु रात्री मी"

एक कुटुंब, लग्नाळु मुलगी. तिला दिवसा, सकाळी सात ते रात्री सात पर्यंत दिसत नाही. तिचे महाविसराळु वडिल, ठार बहिरा भाऊ, सलग वाक्य बोलण्याची समस्या असणारा दुसरा भाऊ, समंजस वहिनी आणि त्यांच्या नोकर बाज्या.

तिला बघायला एकजण येतो, आपल्या आईवडिलां बरोबर. त्याचीही एक समस्या आहे, त्याला रात्रीचे, संध्याकाळी सात ते सकाळी सात दिसत नाही.

मग या सर्व गोधंळमुळे होणाऱ्या गंमतीजमती, व्यंगामुळे उडवली गेलेलीए थट्टा, हसुन हसुन पुरेवाट.
पण अचानक कोठेतरी वाचल्याचे आठवले.
परदेशात शारीरीक व्यंग हा नाटकांचा विषय, त्यातील थट्टेचा, खिल्ली उडवण्याचा विषय कधीच नसतो.
आणि मग नाटक नुसतेच पाहिले गेले

कल के कलाकार संमेलन

१६ तारखेपासुन "कल के कलाकार" संमेलन सुरु होत आहे. संपुर्ण भारतातुन गुणी तरुण कलावंत येथे आपली कला सादर करण्यासाठी येतात.

16th May to 21st May - Hindustani Classical - Vocal and Instrumental
22nd May to 27th May - Hindustani Classical Dance
असा भरगच्च कार्यक्रम असतो.

रोज संध्याकाळी ६.३०, मुंबई विद्यापीठ भवन, बी रोड, चर्चगेट.

Wednesday, May 06, 2009

बीस साल बाद, तो आणि ती व मलाका स्पाइस





३० एप्रिल, याच तारखेला हिटलर नावाची हुकुमशाही संपली.
३० एप्रिल , या दिवशी मुंबई मधे मतदातांनी आपले सामर्थ दाखवले, आपल्याला काय हवेनको त्याची निवड करुन.
३० एप्रिल , याच दिवशी तिने एक फार मोठी चुक केली.

हिटलर संपला, पण हिटलरशाही संपली काय ?
सर्वांनाच मत देण्याचे , उमेदवार बदलण्याचे स्वातंत्र असते काय ?

२० वर्षापुर्वी एका चक्रम माणसावर ती चक्क भाळली आणि त्याच्याशी तिने लग्न केले, मागचा पुढचा विचार न करता

मलाका स्पाइस.

खास दिवशी, खास माणसांना, खाशी मेजवानी द्यावी तर येथे. Romantic Candel Light Dinner, Southeast Asia Flavours. मग याची निवड राजाभाऊ न करतील तरच नवल. मलेशियन , इंडोनेशियन, सिंगापुरी पदार्थ येथे आयुष्यात आम्ही पहिल्यांदाच खाल्ले. आधी ते आवडतील का नाही या बद्दल साशंकता होती, पण चक्क खुप आवडले.

(Malaka Spice, 5th Lane, Koregaon Park, Phone 26151088 )

http://www.malakaspice.com/home.html
(इंटरनेट वर टेबल बुक केले तर Mocktails or Draught Beer on House. )

आणि अचानक


आभाळात मदमस्त काळे घन दाटुन आले, सौदामीनी कडकडु लागल्या, वैशाख वणव्याने तापलेल्या , होरपळलेल्या प्राणीमात्रास दिलासा देत घन बरसु लागला. मयुराने हर्षीत होत आपला पिसारा फुलवत नृत्य सुरु केले.


आणि अचानक त्याने लाजुन आपल्या पिसारा मिटुन घेतला.



त्याची नजर अचानक त्या कृष्णाकडे गेली.


पण लज्जीत होणारा तो काही एकटाच नव्हता

Wednesday, April 29, 2009

जेव्हा

जेव्हा फोनचा रिसीव्हर उचलुन कानाला लावता व नंबर डायल न करता, अजुन हा समोरचा माणुस फोन उचलुन बोलत का नाही याचा विचार करु लागतात तेव्हा ...........

जेव्हा

जेव्हा रात्री, एखाद्या Excel File चा प्रिंट आउट घेवुन , तीच File समोर स्क्रीनवर उघडी ठेवुन, त्याच्यावरचे व कागदावरचे आकडे चेक करत त्यावर टिक मारत जातात तेव्हा ............

जेव्हा

जेव्हा रात्री घरी पोचल्यावर दारावरच्या बेल समोर ती वाजवायची सोडुन तुम्ही तुमच्या कार्यालयातील Access Card नाचवायला लागतात आणि अजुन हा दरवाजा उघडत कसा नाही याचा विचार करु लागतात तेव्हा ............

Sunday, April 26, 2009

क्रेझी पुणॆकर्स


दुसऱ्या मजल्यावरुन सुरु झालेली रांग रस्तावर आली आहे. दुर्वांकुर डायनींग हॉलमधे जेवणासाठी काय हा आटापिटा.

( रांगे्च्या सुरवातीला मी असल्यामुळे आता पोट ्भरल्यावर म्हणु शकतो "पुणॆकर्स आर क्रेझी. ’ )

बुलबुल

ब्लॉगल्स, सिझलर्स, बायको आणि आमरस.




उलटतपासणी सुरु झाली.
 
"ही तुझी दुसरी वेळ." 
 
"नाही. पहिलीच." 
 
डोळ्याला डोळा न भिडवता तोंडातल्या तोडात पुटपुटत उत्तर. 
 
"खोटे बोलु नकोस. ही तुझी दुसरीच वेळ आहे, पहिल्यांदा फोर्टमधे आणि आता हिरानंदानी मधे. ("आम्हाला घेवुन न जाता " हे न बोललेले वाक्य सर्वात महत्वाचे )   
  
'गुन्हा कबुल आहे."
 
त्याचे असं झाले.
  
काही महिन्यापुर्वी काही ब्लॉगर्स , आपली ओळख केवळ ब्लॉगपुरती सिमीत राहु नये या विचाराने एकत्र आले होते, अंधेरीच्या एका हॉटॆलात गप्पागोष्टी करत जेवायला गेले. आता पुढच्या महिन्यात परत भेटायचे हा वायदा करत. (पुढचा महिना उजाडायला मधे तीन महिने जावे लागले. ) 
 
काही दिवसापुर्वी सिझलर्सचा एक फोटॊ माझ्या ब्लॉगवर मी टाकला होता. मग त्या वरुन " आपण या वेळी योकोत सिझलर्स खायला जायचे का ? " या चर्चेला जी सुरवात झाली त्याचा शेवट अखेरीस काल झाला. आम्ही पाच जण हिरानंदानी मधे योकोत सिझलर्स खाण्यासाठी जमलो. म्हणजे खाणे हे तसे निमीत्यपात्र. एकत्र जमुन खुप गप्पा मारायच्या हे मुख्य उद्दिष्ट  ( मी आणि गप्पा ? काहीतरीच काय . सांगु द्या तिला आपल्या नवऱ्यानी कधी तिच्याशी मनमोकळेपणे गप्पागोष्टी केल्या आहेत ते आपला विक्षिप्त,चक्रम  नवरा माणुसघाणा आहे ते ठाम मत )   


तर तिला टाकुन आपल्या नवऱ्याने एकट्याने जावुन दोनदा योकोमधे सिझलर्स हाडादले याचा तिला भयंकर सात्वीक संताप आला. 
 
दिवस दुसरा. 
 
"तुला माहिती आहे काय गं,  या दिवसात दुर्वांकुर मधे थाळीत अमर्यादित आमरस असतो, चल जावुया आज "
 
नशिब रे, बायको थोडक्यावर पटली म्हणायचे. 
 
मग काय, दुर्वांकुर आणि तुटुन पडणॆ आमरसाच्या वाटीवर. वाटीमागुन वाटी रित्या होत गेल्या, नाही वाढणारा कंटाळला, नाही त्यानी हात आखडता घेतला, नाही हाणणाऱ्यानी.    
 
तॄप्त मनाने घरी परतलो.
 
पण.
 
शेवटचा, अखेरचा  शब्द तिचा होता. ( आणि नवऱ्यांना वाटते आपणच हुशार )
 
"तुझ्या सदविवेक बुद्धीस स्मरुन  सांग मला. सिझलर्सचे परिमार्जन दुर्वांकुरने होत नाही. लक्षात ठेव, पुढच्या आठवड्यात आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे विसरु नकोस .’  

दार उघड बये दार उघड, दार उघद बये दार उघड

"मी महाराष्ट्र बोलतोय "  हा आजच्या दै. सकाळ मधला लेख. लेखातील काही उतारे  

"राज्यातील जवळपास प्रत्येक विभागात व प्रत्येक जिल्य्हात पाण्याची टंचाई, बंद पडत चाललेले उद्योगधंदे आणि वाडती बेरोजगारी, या समस्यांनी अक्षरशः उग्र रूप धारण केलयं."

"वीजटंचाई आणि पाणीटंछाई यापेक्षाही महाराष्ट्राला आज भेडसावणारी मोठी समस्या म्हणाजे बेरोजगारीची "

"तर अवघ्या पाच-सात रुपयांसाठी साठ साठ किलो माणसांना वाहून नेणारे सायकल रिक्षावाले नागपूरमधे दिसले. सूर्य डोक्यावर आग ओकत असताना या महिला, हे शेतकरी काम करूच कसं शकतात, हा प्रश्न आम्हाला अजूनही सुटलेला नाही. पण सारं काही पोटासाठी "

" मग कोणतीच कर्जमाफी त्याला सावरु शकत नाही आणि आत्महत्येचा आकडा फुगत जातो "   

"नवऱ्यानी आत्महत्या केलेली. पदरी चार मुली. रोजची मजुरी पंचवीस रुपये, या पंचवीस रुपयात पाच जणांचा संसार चालणार कसा ? "

"रात्री दोन वाजताही पाण्यासाठी नदी गाठावी लागते, मग सहावीत शिकणाऱ्या ममतालाही आपल्या वजनाइतका पाण्याचा हंडा उचलावाच लागतो किंवा परीक्षा सुरू असतांनाही बाळूला चार-पाच तास पाणी भरण्यासाठी वेचावे लागतात. या मंडळींच्या आयुष्यात "जय हो ... " कधी होणार आणि कोण करणार ? "

आणि दुसरी बातमी. 


"जेजुरी साकारणार अद्वितीय शिल्प. जेजुरी येथील श्री मार्तंड देवस्थानातर्फे सुमारे एक कोटी रुपये खर्चून बनविल्या जाणाऱ्या ब्रॉंझ माध्यमातील या शिल्पसमूहात  .... "


या "एक कोटी रुपयात " किती जणांचे जीवन वाचु शकेल ?  किती जणांचे आयुष्य सुसह्य होवु शकेल ? किती गावांचे प्रश्न सुटू शकतील ?  

पण . 

पोटापेक्षा भावना महत्वाच्या.   


Saturday, April 25, 2009

वणवे




अक्कलशुन्य, बिनडोक माणसाने आणखी एक निसर्गचक्र आपल्या ह्व्यासापोटी जाळुन टाकले 

वाहतुक पोली्सच जेव्हा कायदा मोडत असतात तेव्हा




कायद्याचे पालन करण्यासाठी हे वाहतुक पोलिस नो पार्कींग झोन् मधल्या ्गाड्या उचलुन या  व्हॅन मधे घालुन नेतात. 

या उघड्या व्हॅन मधे पाठीमागे अश्या प्रकारे माणसांना बसायला . उभे रहायला कायद्याने परवानगी आहे का ? 
एखाद्या टेंपो मधुन अशी माणसे नेली गेली तर तत्काळ दंड आकारण्यात येतो.

अश्या रीतेने या उघड्या व्हॅन मधे पाठीमागे ्मा्णसांनी उभे रहाणे, बसणॆ अत्यंत धोकादायक आहे.  

ते तोल जावुन् खाली पडण्याची शक्यता आहे.

आणि या व्हॅनची नंबर प्लेट ? कायद्याच्या कोणत्या कलमा खाली ती योग्य आहे ? 

   

वाहतुक पोली्सच जेव्हा कायदा मोडत असतात तेव्हा




कायद्याचे पालन करण्यासाठी हे वाहतुक पोलिस नो पार्कींग झोन् मधल्या ्गाड्या उचलुन 

Thursday, April 23, 2009

छंद , विरंगुळा.







वडील निवृत्त झाले तेव्हा त्यांचा आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. आता पुढे काय.
कधीतरी मी त्यांना , त्यांची कलेची आवड लक्षात घेता रंग आणि ब्रश भेट दिले.

आश्वासन




मी सर्व उमेदवारांना आश्वासन देतो कि आमच्या पुण्यातील पी.एम.टी.मधली आसनव्यवस्था जो कोणी सुधारण्याचे आम्हाला आश्वासन देइल त्यालाच मी मत देइन.


मला ठावुक आहे की हे खासदारांच्या कार्यक्षेत्रात येत नाही, पण आता पर्यंत येवढी आश्वासन मिळाली आहेत त्यात आणखी एकाची भर.

Sunday, April 19, 2009

रस्सी जली मगर बल नही जला

दरवाजा भलाभक्कम आहे . कुलुपही चोरटुयानी फोडलेले दिसत नाही. 
लेकीन. 
खंडहर यह कह रहे है , इमारत कभी बुलंद थी.



वीटभट्टी, आणि अनिल अवचटांचे. "प्रश्न आणि प्रश्न "


आज पहाटे फिरायलो निघालो. वाटॆत वीटभट्टी पाहिली आणि दोन पुस्तके आठवली. मिलींद बोकील यांनी कातकरींवर लिहीलेल्या पुस्तकात कात तयार करण्याची कामे बंद पडल्यावर कातकरी या व्यवसायात वळले हे लिहीले आहे आणि दुसरे पुस्तक अनिल अवचटांचे. "प्रश्न आणि प्रश्न " . या मधल्या पाणी आणि माती " या लेखात त्यानी लिहीलयं - 
 
 
"ही वाहुन जाणारी माती म्हणाजे हजारो वर्षाच्या नैसर्गीक प्रक्रियेतुन बनलेला अतिशय मुल्यवान थर. माती म्हणजे केवळ खडकांची भुकटी नव्हे. त्यातल्या बॅक्टेरिया, जीवजंतु, किडे वनस्पती या सर्वांनी ती जिवंत बनलेली असते. 
 
आपण माणसं ही अशी बेजबाबदार की इतका किमती थर आपण खरवडून काढतो. भट्टीत घालून त्यातले जीवजंतू मारून त्याची वीट , म्हणजे थोडक्यात परत दगड बनवतो. 
 
मागे पुण्यातील वीटभट्टी-कामगारांची मी माहीती घ्यायला फिरत होतो. तेव्हाचे आठवले : वीटभट्टीवाले मुळशी तालुक्यातुन माती आणायचे. विटेला कधी नित्कॄष्ट, मुरमाड माती चालत नाही. ती उत्कॄष्ट पोयट्याची लागते, जिथे माती घायला यांचे ट्रक यायचे तिथे गेलो. शेतकऱ्यांना विचारायचो. त्यांनी काही आर्थीक अडचण म्हणुन जमीन "खणायला" काढलेली असायची. कुणाच्या घरी लग्न निघालेले किंवा कुण्याच्या गळ्याची कर्ज आलेले. जिथे हजारो वर्षे शेतीने भरभरुन उत्पन्न दिले , तिची हजार-दोन हजार रुपयांसाठी कायमची हत्त्या होत होती. गावेच्या गावे मुरमाड झालेली पहायला मिळाली. पुण्याच्या विठ्ठ्लवाडीजवळाच्या वीटभट्टांवर अशा मुलायम, चाळलेल्या मातीचे डोंगर उभे राहीलेले. माती तुडवुन, मळून लोण्यासारखी होत होती. माती नावाच्या निसर्गातील चमत्काराच्या चिता तिथे अहोरात्र फुललेल्या दिसल्या.   

Saturday, April 18, 2009

चामडॆ , प्रश्न आणि प्रश्न

श्री. नरेंद्र प्रभु यांच्या ब्लॉग वर चामडे वापरु नका या वर लेख वाचला. चामड्यासाठी सापांचे काय केले जाते याचे त्यांनी फोटोही टाकले आहेत.
Post: खरोखरच माणूस किती वाईट आहे ! Link: http://prabhunarendra.blogspot.com/2009/04/blog-post_13.html

व्हीगन जीवनशैलीत मधे सुद्धा हेच सांगीतले आहे. भुतदया, प्राण्यांवरील अनुकंपेपोटी , त्यांच्या वर होणारी कॄरता थांबवण्यासाठी चामड्यांपासुन बनवलेल्या वस्तु वापरु नका.
मला वाटते, चामडे का वापरु नये याला आणखी एक ऍंगल आहे. केवळ जनावरांसाठी नव्हे तर मानवासाठी देखील. ते कमवणाऱ्या कारखान्यात कामं करणाऱ्या माणसांसाठी तरी.
अनिल अवचटांच्या "प्रश्न आणि प्रश्न " या पुस्तकात त्यांनी कोल्हापुरातील पंचगंगा या नदीच्या प्रदुषणाबद्दल लिहीले आहे. यात चामड्याच्या कारखान्यातुन बाहेर सोडल्या जाणाऱ्या रसायनाचा. घाणीचा मोठा वाटा आहे. हे दुषीत पाणी नळावाटे पिण्याच्या पाण्यातही मिसळले जाते.
तेवढेच नव्हे तर या कारखान्यात काम करणारे कामगार अत्यंत वाईत परिस्थितीत कामं करत असतात.
" अनेक छोटे हौद. त्यात चुना , रसायन मिश्रीत पाणी होते. त्यात चामडे कमावयाची एक प्रक्रिया असे. लोकांना त्यात उभे राहुन काम करावे लागे. मालकांनी त्यांना पायात गमबुटही दिलेले नसे. ते मोठ्या टायरच्या ट्युबच्या छोट्या तुकड्याला एका बाजुने बांधत त्यात पाय घालुन या घातक हौदात काम करत. सर्वत्र जनावरांची कातडी टांगलेली. त्यात मसाला भरलेला असल्याने फुगलेली व पाणी निथळणारी. काही माणसे कातडे आल्या आल्या हाताने, छोट्या हत्याराने घासुन त्याला चिकटलेले मांस, कातडीवरचे केस सोलत बसलेली असते. तीही उघड्या हातांनीच. त्या सर्व परिसरात या सगळ्याचा कुजका सडका वास भरलेला.
या प्रक्रियेत १५० प्रकारची रसायनं वापरली जातात. त्यातील क्रोमीयम सल्फाईट हे आपल्या शरीरात गेलं तर कॅन्सर निर्माण करु शकतं असं आहे. कामगार उघड्या हाताने क्रोमीयम सल्फाईट्ची हिरवी-निळी पावडर उचलत होते आणि पाण्यात कालवत होते. आपण काय हाताळतोय याची कणभर जाणीव त्यांना नसावी, असा त्यांचा चेहरा होता. किंवा माहीत असते तरी ते काय करणार होते ? "

हा बुट फेकुन मारायची कोणाची शामत आहे ?

म्हातारीचा बुट. 

Friday, April 17, 2009

सामना आणि मर्मभेद

अरुण साधु यांच्या सामना कादंबरीत कामगार नेता डिकास्टाच्या तोंडी (चित्रपटात कै.सतीश दुभाषी) एक वाक्य आहे "तर राज्याच्या मुख्यमंत्राला मंत्रालयासमोर जोड्याने हाणु"

त्या काळात हे असे जोडे फेकुन कोणी मारत नव्हते.

शशी भागवत यांच्या "मर्मभेद" या कादंबरीत एक जबरदस्त प्रसंग दिला आहे. प्रतिकुल परिस्थितीचे हुशार राजकारणी कसा धीरोद्धत्त वागुन आपल्याला हवे त्या संधीत त्याचे रुपांतर कसे करतो.

राजपुत्र कुणाल अचानक गायब झाले आहे, त्यांचा घात झाला असावा, यात काळेबेरे असावे हे जाणुन समस्त खवळलेली, संतापलेली जनता जाब विचारायला कृष्णांतच्या प्रासादासमोर जमते आणि संतापाच्या भरात कृष्णांताच्या वर व इतर सरदार, मंत्रांवर दगडधोंद्याचा वर्षाव करते. सारे जण पळुन आत जातात, फक्त कारस्थानी कृष्णांताशिवाय. तो धीराने सारा मार खात अचल उभा रहातो.

हळुहळु लोकक्षोम ओसरु लागतो, आणि मग कावेबाज कृष्णांत हरलेली बाजी उलटवतो.
तेव्हा ........

Tuesday, April 14, 2009

इसापनिती आणि राजकारणी.

दोन कोल्हे प्रवासास निघाले. एक वॄद्ध आणि एक तरुण. 

वाटेत एक नदी लागली. तेथे होत्या खुप जळवा. नदी पार करतांना दोन्ही कोल्हांचे सारे अंग त्या जळवांनी भरुन गेले, अश्या चिकटल्या त्यांना.
 
तरुण कोल्हाने विचारलो, आपण या अंगाला चिकटलेल्या जळवा काढुन का टाकत नाही आहोत ? 

अनुभवी, वॄद्ध कोल्हाने उत्तर दिले, " हा सारा प्रदेश या अश्या रक्तपिपासु जळवांनी भरलेल्या. , या साऱ्या जळवा आपले रक्त पिवुन शांत झाल्या आहेत, फुगल्या आहेत, आणखी रक्त पिण्याची त्यंची क्षमता संपली आहे. यांना काढुन टाकले तर यांच्या जागी नवीन जळवा चिकटतील व परत त्या आपले रक्त शोषु लागतील.
 
तेव्हा आहे ते ठिक आहे.