Sunday, February 06, 2011

काळाघोडा कला महोत्सव - मुंबई - २०११ दिवस दुसरा


लंकाधीपती रावण कालाघोडा कला महोत्सवात

एकला चालो रे

शेखूखूखू ,,,,,,, सलीम

सलीम. अनारकली कहॉ है ?
.


अनारकली तुम्हे मुबारक हो ! शेखु .



दोस्ताना

किळस ? बिभीत्स ?

ही मुले जिवंत आहेत का केवळ ही त्यांची कलेवरं ? सांगणॆ कठिण.

 झोपले आहेत का त्यांना मादक द्रव्य देवुन  निपचीत केले आहे ? 
 दरवेळी नविन नविन मुले हिच्या बरोबर दिसतात. 


Saturday, February 05, 2011

आधी वाटलं होतं, हे देखील काय मॉडन आर्ट वगैरे आहे की काय ?



 .
म्हणाजे या सारखे. नंतर लक्षात आले की तसे नसावे




काळाघोडा कला महोत्सव - मुंबई - २०११

काळाघोडा


केवळ या विलक्षण देखण्या, अप्रतिम शिल्पामुळे परिसराचे नाव काळाघोडा पडले.

ब्रिटीशांच्या खाणाखुणा हटवण्याच्या नादात तो राणीच्या बागेत हलवला गेला.
 त्याच्याकडे कोणाचेही फारसे लक्ष नसते. पिंजऱ्यातले प्राणी पहायला आलेली माणसे त्यांना कलाकृतीचे काय महत्व,
कधी कधी वाटते याचे स्थान मुळ जागीच असायला हवे होते.
 या परिसरातील   ब्रिटीशांच्या काळात बांधल्या गेलेल्या देखण्या वास्तुंच्या सानिध्यात.

काय सुंदर देहबोली आहे या जनावराची.  नजर यावरुन हटता हटत नाही

कोणत्याही क्षणी


परीघाबाहेरील जग

त्यांना आत प्रवेश नाही. 
अंधर आनेका नयी, बाहर खडा रव.
मधेच बिचाऱ्यांचा व्यवसायही बंद केला जातो. 
आत पाच रुपयाची वस्तु पाचशे रुपयाला मिळाली तरी चालेल.
पण.




यांना पण महोत्सवात् सामील करुन घ्या की. त्यांच्या साठी एखादा कोपरा वगैरे. ह्यांना पैसे लागतात ते जगण्याकरता.

सलाम आलेकुन मियां

अफ्रीका


ओडीसी नृत्यप्रकार

कालाघोडा

भोजनभाऊ राजाभाऊ

राजाभाऊंचा चांगलाच गैरसमज झाला, त्यांना वाटले सर्व समस्त अतिथींसाठी जेवणाचे भलेमोठाले डायनींग टेबल मांडले आहे.

झाली खरी निराशा, मग जेवणावर आडवा हात मारण्याऐवजी त्यांनी हा असा हात चालवला.




हे केवळ आज लांबुन पहाण्यापुरते, राजाभाऊंनी जगण्याचे ठरवले आहे.

राजाभाऊंचे

राजाभाऊंचे संसारातुन मन उडले आहे, संन्यास घ्यावासा वाटतो, म्हणजे तरी  कदाचीत असा कॅमेरा घेता येइल. बिच्चारे, फार तडफडताहेत. 


क्यु नारदमुनीजी ?

क्यो नारदजी पार्टी बदल दी क्या ? भगवान विष्णु का साथ छोडके शंकर भगवान को सामील हो गये क्या ?

जय भोलेनाथ, बम बम भोले

भोले बाबा की जय हो. भगवान ध्यान रखीयो इस भक्त पर. किस्मत का मारा हूं.

नही , नाही सहन होत हा कोलाहाल. बंद करा हे भोंगे बंद करा.

Friday, February 04, 2011

पोलीसांना काय बंदोबस्ताचं एकच काम असते ?


मस्त संध्याकाळ असावी आणि सोबत ती.  बॅंडस्टॅण्डवर.

बॅंडस्टॅंड वर पोलीसलाचा बॅंड, नेव्हीचा बॅंड, म.न..पा. चा किंवा  अग्नीशामक दलाचा बॅंड सुंदरशी धुन वाजवत असावा.

और क्या चाहिये जीने के लिये.

काही वर्षापुर्वी फ्रांसच्या नावीक दलानी  कुपरेज बॅंड्स्टॅंड वर केलेला कार्यक्रम आठवला.

पन्नास वर्षापुर्वी

बरोब्बर पन्नास वर्षापुर्वी एका फार श्रीमंत बाप असणाऱ्या मुलीचे एका  आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या  गरीब  असणाऱ्या मुलाबरोबर लग्न झाले.  

मुलगा जरी गरीब होता तरी त्याच्या एकत्र रहात असणारे कुटुंबात असणाऱ्या सदस्यांची संख्या ध्यानी घेता त्याला त्या बाबतीत फार श्रीमंत म्हटले पाहिजे. दोन भाऊ, पाच बहिणी, आईवडील, दोन काका.

 मग त्यांना झालेली  तीन मुले. 

पण मुलगा मात्र फार कष्टाळु, होतकरु, मेहनती. गरीब परिस्थितीतुन सारे कुटुंब वर काढण्यासाठी धडपडणारा. मुलगी ही त्याला तशीच साथ देणारी भेटली. गरीबीतही संसार आनंदाने करणारी, त्याचे सारे नातेवाईक आपलेच मानुन सर्वांबरोबर सुखासमाधानाने मिळुन मिसळुन रहाणारी.



आज राजाभाऊंच्या आईवडिलांचा लग्नाचा पन्नासावा वाढ्दिवस. 




Tuesday, February 01, 2011

मग अचानक मुलाचा चेहरा उजाळतो.

एका औषध कंपनीची जाहिरात

बाप परिक्षेचा निकाल घेवुन आलेल्या आपल्या लहान मुलाची त्यच्या वर्गातील दुसऱ्या हुशार मुलाबरोबर तुलना करतोयं.

या विषयात तुला किती गुण मिळाले ? त्याला किती गुण मिळाले ?
त्या  विषयात तुला किती गुण मिळाले ? त्याला किती गुण मिळाले ?
विषयात तुला किती गुण मिळाले ? त्याला किती गुण मिळाले ?

प्रत्येक वेळी मुलगा खाली मान घालुन उत्तर देतो.

 कमी गुण , कमी गुण कमी गुण, 

का ? का ? का ?

मग अचानक मुलाचा चेहरा उजाळतो.

मला एका विषयात जास्त मार्क मिळाले आहेत. 
कारण.

कारण तो परिक्षेला बसलाच नाही. त्याला कांजण्या आल्या होत्या.
मी लस घेतलीय ना, मग मला कांजण्या कश्या होतील ?

निदान लहान मुलांच्या भावविश्वाचा अश्या रितीने तरी गैरवापर  केला जावु नये.



कधी कधी



बँडवाले म्हणतात.
प्रत्येक वेळी आम्हीच का वाजवायचे, कधी तरी आम्हाला पण ऐकावेसे वाटते.

बारी बरसी खटन गयासी खटके ले आंदे

तीन दिवस राजाभाऊंनी मस्त धमाल केली . गाना, बजाना आणि खाना, खाना और खाना