Saturday, December 18, 2021

Coriander Kitchen - Conrad

एकलव्याने द्रोणाचार्यांना आपले गुरु मानले अगदी तसंच राजाभाऊंनी श्री. शंतनु घोष यांना.

http://www.shantanughosh.com/

असाच काहीतरी विशेष दिवस साजरा करायचा होता.  राजाभाऊंनी त्यांचा कुठे जेवायला जायचे याबाबत त्यांचा सल्ला मागितला.

गुरु वाक्य प्रमाण. राजाभाऊ पोचले Coriander Kitchen - Conrad  मधे बुफे जेवायला.

पुण्यामधे कोणी जर का विचारले की उत्तम, सर्वोत्कृष्ट बुफे कुठे मिळतो तर राजाभाऊ विचार न करता याचेच नाव घेतील. केवढा मोठा स्प्रेड आहे त्यांचा. 

बरं झाले त्या रात्री पोट जरासे रिकामेच होते. किती खावु किती नाही असे झाले होते.  अनेकदा फोटो काढण्याचा नादात मग जेवणाची मजा लुटणे राहुन जाते. त्या रात्री एकही  फोटो काढला नाही. 

प्रत्येक खाद्यपदार्थ उत्कृष्ट होता. बढीया. मजा आली.

No comments: