Wednesday, December 15, 2021

आस्वाद

 प्रतिक्षा. प्रतिक्षा आणि प्रतिक्षा.

जर का राजाभाऊंना कोणी विचारलेच की मुंबईमधले सर्वोत्कृष्ट मराठमोळं उपहारगृह कोणते तर क्षणाचाही विलंब न लावता उत्तर मिळेल "आस्वाद". सेनाभवन समोर, शिवाजी पार्क.

पण येथे खाण्यास जाण्यात एकच अडचण असते, ती म्हणजे खुप गर्दी. बराच वेळ लागतो आपला नंबर यायला. कारण. उत्कृष्ट चवीचे अन्न.

जवळजवळ अर्धातास बाहेर प्रतिक्षा करत उभे राहिलेल्या राजाभाऊंची काल हालत खराब झाली होती, पण त्यांनी नेटाने खिंड लढवली. कारण ही तसेच. "आस्वाद" नी महाराष्टीय भोजन थाळी सुरु केल्याचे त्यांना कळले होते व ती जेवायची फार तिव्र इच्छा होती.

बटाटा सुकी भाजी, पातळ भाजी, उसळ. मसालेभात किंवा वरणभात, पोळ्या, कोशिंबीर, कढी, कोथींबीर वडी आणि दुधी हलवा. 

जेवुन झाल्यावर परत एकदा दुधी हलवा. परमप्रिय उकडीचे मोदक न खाता परत एकदा दुधी हलवा.

और क्या चाहिये खाने के लिये ?





No comments: