वाघाला जशी एकदा का रक्त चाखल्यानंतर चटक लागते अगदी तशीच चटक राजाभाऊंना काही वर्षापुर्वी खाल्लेल्या पातोळ्यांची लागली होती. पण काही केल्या त्यांना त्या खायला मिळत नव्हत्या व त्यांची तडफड काही संपतासंपत नव्हती. आणि गंमत म्हणजे ज्या उपहारगृहात ते कैक वेळा गेलेले आहेत त्याच ठिकाणी "पातोळ्या" मिळतात हे त्यांना ठावुकच नव्हते.
कालच्या म.टा. मधे श्री. मुकुंद कुळे यांनी लिहिलेल्या "हळदीच्या वासाच्या पातोळ्या " हा लेखामुळे त्यांना त्या जागेचा ठावठिकाणा लागला. खरं म्हणजे कालच दुपारी त्यांची माटुंग्याच्या "आनंद भवन " मधे "पाटोळ्या " खाण्यास जायचे होते. पण रात्रीच्या उकडीच्या मोदकाच्या मोहापायी ते गप्प बसले.
मग काय , आजचा सकाळाचा बेत. पातोळ्यांचा.
त्या पातोळ्या सोबत राजाभाऊंना आणखी काही तरी खिलवले गेले.
No comments:
Post a Comment