Wednesday, December 15, 2021

"द्वारका" मधे बेसीबेली भात

 "द्वारका" मधे जावु की "पूर्णिमा " ? देशी सोडु आणि युरोपीयांना गळ्यात उतरवु? 

उडप्याच्या उपहारगृहात जावुन न्याहारी करु की फॉरेन मेक माल मिळणाऱ्या "कॅफे" मधे जावुन विदेशी खाद्यसंस्कृती अपनावु ?

क्या करु ? कुठे नास्ता करायला जावु ?  काही म्हणजे काही सुचेना, अचानक एवढे पर्याय समोर येवुन उभे ठाकल्यावर राजाभाऊंना नाही म्हटले तरी गोंधळायला झाले.

ह्या साऱ्या गोंधळात मग कुठेच जाणॆ झाले नाही आणि मग राजाभाऊ उपाशीच पोटी (देवा शप्पथ खरं सांगतो, वाचतेय ना गं हे  ) काळाघोडा आर्ट फेस्टीवलमधे फोटो काढत फिरत राहिले. भल्या सकाळी नऊ वाजता फोटो काढायला राजाभाऊ गेले खरे पण दहा वाजल्याशिवाय त्यांची दारे उघडत नाहीत म्हटल्यावर मग ते बदलत्या खाद्यसंस्कृती आढावा घेण्यासाठी भटकत राहिले होते. 

 दुपार झाली. जेवणाची वेळ झाली. राजाभाऊंचा संभ्रम दुर झाला आणि मग ते "द्वारका" मधे बेसीबेली भात खायला गेले.



No comments: