Wednesday, December 15, 2021

इस्कॉन मधल्या "गोविंदा" मधे

 रात्रीची अकरा-सव्वाअकराची वेळ. उपहारगृहाच्या समोर तुमची गाडी उभी रहाते, आणि ऐकायला लागते 

"बंद हो गया "

आजच्या रात्री पोराला चांगलसुरकं खायला घालु ह्या विचाराने राजाभाऊंनी इथंतिथं कुठेही जाण्याचा विचार न करता गाडी हाणली होती.  रात्र ही तशी फार होत चालली होती. भुकेनी मनावर आणि शरीरावर ताबा मिळवायला सुरवात झाली होती. आणि अश्यावेळी "बंद झाले " हे ऐकणे नकोसे होऊन गेलेले. 

अरे देवा, काय करु, कसं करु, कुठे जावु, काय खावु ?

पुढे "सोहम" मधे जावुन ते उपहारगृह उघडे आहे का हे पहाण्याची अंगात ताकद नव्हती आणि पुन्हा एकदा सुखसागर मधे जावुन पावभाजी खाण्याची इच्छा नव्हती.

राजाभाऊंनी मनातल्या मनात धावा सुरु केला. एकदा मॉं यांचा तर दुसऱ्यांदा क्रिस्ना, क्रिस्ना, हरे क्रिश्ना जप सुरु केला. भगवान श्रीकृष्णाच्या इस्कॉन मधल्या "गोविंदा" मधे जावुन परमेश्वराचा धावा न करुन कसं चालेल ?

विनंती करण्यासाठी राजाभाऊ गाडीतुन खाली उतरले. रेस्टॉरंटचे शटर बंद करण्याच्या मार्गावर असलेल्या  त्या गृहस्थांचे राजाभाऊंना बघुन मन द्रवले, एकदम फायनल ऑर्डर द्या म्हणाले.

मग काय आपलं नेहमीचेच, दम आलु काश्मीरी आणि डाल फ्राय.

जेवल्यावर त्या गृहस्थाचे आभार मानायला राजाभाऊ त्याला शोधत होते पण ते कुठे गुप्त झाले हे भगवानच जाणे.





No comments: