जुनी पोस्ट
मराठी की गुजराती थाळी ? गुजराती की मराठी ? नक्की काय ? नक्की कोण ? ह्या वादात नेहमीच गुजराती जिंकत आलीय का ?
आज पुन्हा राजाभाऊंना लोणावळ्याच्या होमली फुड उर्फ फासेबाईंची खानावळीने हुलकावणी दिली. गेल्यावेळी ते एकाच्या पोष्टवर लिहिलेला चुकीचा पत्ता वाचुन भलतीकडेच पोचले होते. आज ते निदान बरोबर जागी पोचले , खानावळीत आत पोचले, जागेवरही बसले पण न जेवता तेथुन परत माघारी फिरले.
काय करणार अजुन वटाण्याची उसळ किंवा वांग्याची भाजी किंवा फ्लॉवरच्या भाजीस एका फुल प्लेटसाठी दोनशे रुपये मोजण्याची अजुन मानसिकता निर्माण झालेली नाही नं. ही जागा भलतीच महागडी वाटली. त्यात परत काही काही शाकाहारी माणसाला मांसाहारी खाद्यगृहात येणारा एक प्रकारचा वास कधी कधी नाही सहन होत.
पण एकंदरीत येथे जेवणे नशिबात नव्हते हे मात्र बरीक खरे. खरं म्हणजे जेव्हा फेसबुकवर ह्याबद्दल वाचल्यानंतर राजाभाऊंची बैचेनी वाढली होती. आयुष्यभर आपण लोणावळ्यात हजारदिडहजार वर्षे गेलेलो पण ही जागा आपल्याला ठावुक नसावी म्हणजे काय. एक मात्र खरे की जागा चांगली आहे, ह्यांचे स्वयपाकघर अगदी दृष्ट लागण्यासारखे आहे, जेवण चविष्ट मिळत असावे, पण आता महाग वाटले त्याला कोण काय करणार.
मुंबईमधुन निघतांनाच खरं म्हणजे फर्मान सुटले होते. आजचे सकाळचे जेवण आपण नांगरगावाला "मानेकलाल सेनेटोरीयम " मधे करायचे.
पण आपल्या बायकोचे कधीच ऐकायचे नाही अस राजाभाऊंनी ठरवलेले.
मग काय शेवटी त्यांच्याच इच्छेचा विजय झाला.
गुजराती थाळी. मस्तपैकी भेंडी, कोबी आणि तुरीमुठियाची भाजी, डाळ, आणि वाटाणाच्या चविष्ट कचोऱ्या. वरती झक्कास शिरा.
No comments:
Post a Comment