स्टेटस . नरीमन पॉईंट.
राजाभाऊंच्या आवडत्या रेस्टॉरंट पैकी एक. "नरीमन पॉईंट येथे असणारे "स्टेटस".
पुर्वी कार्यालय चर्चगेटला असतांना येथे वारंवार जाणॆ व्हायचे. कधी गुजराती थाळी जेवायला, पंजाबी पध्दतीचे जेवण करायला तर कधी दाक्षिणात्य पदार्थ खायला.
दाक्षिणात्य पदार्थ खाण्यामागचे मुख्य आकर्षण म्हणजे त्यासोबत मिळणारे अमर्यादीत सांबार व चटणी. एक ऑनीयन रवाडोसा मागवायचे, यथेच्छ सांबार, चटणी थाळीत ओतत रहायचे व नुसते ओरपत रहायचे.
येथे वेळॆनुसार काय खायचे याचा क्रम ठरलेला. कधीतरी रविवारी "स्टेटस" मधे सकाळी गेल्यास गुजराती थाळीचा आस्वाद घ्यायचा, रात्री गेल्यास पंजाबी जेवणाचा.
No comments:
Post a Comment