Suranga Daté
यांनी एक झक्कास कविता रचली आहे.
वित्तमंत्र्यांनी उठून
संसदेत सांगितले कि
"मंडळी, आता तुम्ही ज्यास्त सोने
आणू शकता…."
आणि राजाभाऊ धावले !
आत सोनेरी गोडव्यानी काठोकाठ भरलेली
केशव विनायक , गिरगाव ,
यांच्याकडे माहेर असणारी
मउसूत पुरणपोळी ,
सोनेरी डाळीत एकजीव होउ पाहणारी
पण आपले भविष्यातले सोनेरी आयुष्य
विसरून,
स्वतःला समर्पित करणारी कैरी
आणि लोणचे मसाला योग साधून
तिखट लोकांशी गप्पा करणारी तिची दुसरी मैत्रीण ….
सोनेरी तुपाची नाजूक धार
पुरण पोळीवर पडली,
आणि राजाभाऊ संतुष्ट होउन
म्हणाले,
"वाह! वाह! …!
बजेट असावा तर असं
No comments:
Post a Comment