Wednesday, March 10, 2010

ए रामा नायक यांचे उडिपी श्रीकृष्णा बोर्डींग. पुन्हा एकदा.

रविवारी पायसम खाण्याचे राजाभाऊ विसरुनच गेले होते. किंबहुना पालपायसमचा त्यांना विसर पडला होता. "Ap____M " यांनी आठवण करुन दिली आणि राजाभाऊ आज परत रामा नायक मधे पोचले.


अत्यंत साधे , रुचकर असे  शुध्द शाकाहारी भोजन मिळण्याचे हे पवित्र स्थान, कोठेही भपका नाही, आरडाओरडा, गोंधळ नाही, अत्यंत शिस्तीत सारे काम चाललेले.

ताटात किंवा केळीच्या पानात , जसे जेवण हवे असेल त्या प्रमाणे पैसे देवुन कुपन घ्या, मग एकजण तुमच्या समोर पाण्याचा पेला, ताकाचा पेला, व दही आणुन ठेवणार व कुपन गोळा करणार, हा झाला संकेत, तुमच्या कडुन कुपन गोळा केल्याचा, जो पर्यंत या तीन गोष्टी समोर दिसत नाहीत तो पर्यंत वाढपी काही तुमच्या समोर ताट ठेवणार नाही.

पडवळ व कोबीची भाजी, चवळीची भाजी, तसेच वांग्याच्या भाजीत चक्क शेवग्याची शेंग. हवे तेवढे सांबार, गरमागरम रसम, जे प्याल्यानंतर तुमचे पोट कसे तापले पाहिजे. दोन मुद भाताच्या, पापड व ताजे केलेले लोणचे.

एखादी भाजी आपल्या नावडती, किंवा विशेष आवडीची नसते. घरी बायकोच्या नावे बोटे मोडत ती खातो, पण तीच भाजी येथे मात्र बोटे चाटत पुसत हाणत रहातो , असे का ?

आज सेमीया पायसम मिळाले.  ज्या साठी केला होता अट्टाहास.


माटुंग्याला येथे येण्याचे दुहेरी हेतु असतो. रेल्वेस्थानका जवळ यांचे दुकान आहे, तेथे केळा वेफर्स, बदाम हलवा, आणि मुख्य म्हणजे शुध्द तुपातील म्हैसुर पाक घेणे व खाणे.


आज "रोज जांगीरी " (उडदाच्या डाळीत बनवलेली ) खाण्याची तिव्र इच्छा झाली होती. पण गेले कित्येक दिवसात आपल्यावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राजाभाऊंच्या पोटानी बंड उभारलयं, अनेकदा ते अन्न स्विकारायला नाकारु लागलयं, असहकार पुकारु लागले आहे, त्या कारणे इच्छा अपुरी राहुन गेली.

ता.क. चार एप्रिलला येथे "फिस्ट " आहे.

4 comments:

Ap____M said...

Their potato chips (tikhat waale) are also good. You should also try onion/garlic vodi (mhanje, saandge). Taloon masta laagtaat.

If you are on diet and avoiding fried stuff, you can try their wheat/naachani shevai. Yaachaa upmaa karaat. It is called "shevai-usli".(http://deliciosodishes.blogspot.com/2009/10/shevai-usli.html)

Ap____M said...

Usually feast costs extra than any normal day meal. But in the month of march/april (forgot when) .. due to death anniv of the founder .. they serve feast at their regular meal price. If you are planning to go there on april 4, reach there very early, around noon. It gets very crowded later.

~G said...

This brought back memories. Did you spot one paati that said "The owner of the hotel eats here everyday" ?? :)

HAREKRISHNAJI said...

G,

Yes. I have seen that sign