Monday, November 30, 2009

द बे व्ह्यु. हॉटॆल मरिन प्लाझा


आज परत " द बे व्हु " मधे बफे जेवायला जायचा राजाभाऊनां योग आला. किंबहुना त्यांच्या शिफारशीवरुन येथे वारंवार जेवायला जाणे होत असते.

पण आज भरवश्याच्या म्हैशीला टोणगा अश्यातली गत झाली. 

येवढे मोठाले पैसे मोजायचे आणि जेवायला काय तर चवळीची भाजी, भेंड्यांची भाजी,  आणि फ्लॉवरची भाजी.

कदाचीत अतिपरिचये अवज्ञा झाली असावी.

पण म्हणुन काय येथे जेवणात चवळी व भेंडी ?

Saturday, November 28, 2009

कार्ल्याची लेणी

सौदर्य आणि उपेक्षा




















एकंदरीत आपल्याकडॆ सौदर्यदृष्टीचा अभाव आढळतो. प्राचीन, पुरातन वास्तु, वारसा, कला, संस्कॄती यांचे जतन , त्याच्या विषयीची माहिती, लेण्यांची महती, त्यांचे सौंदर्य, वास्तुकला या विषयी अनादर व अनावस्ता जास्त दिसुन येते.

लोणावळ्याजवळ असलेली काल्याची लेणी. जवळ्जवळ दोन हजार वर्षे हि लेणी बांधल्याला झाली असतील. यातले चैत्यगृह हे एकमेवाद्वितीय आहे.  

वास्तवीक पहाता त्याच्या बाहेर असलेले एकविरादेवीच्या मंदिराचे स्वरुप या साऱ्या प्राचीन लेण्यांना मिळतेजुळते, साजेसे, त्याच्याशी समरस होणारे असे करायला हवे होते.  पण.  सुशोभिकरण म्हणजे देवालयाच्या दगडी भितींना कोणताही सारासार विचार न करता भडक रंग मारणे येवढेच आपल्याला समजते. अनेक ठिकाणी अश्याप्रकारचे रंग मारुन  भिंतींच्या बाह्यरुपाची वाट लावलेली आढळुन येते.

त्यात देवळाबाहेर उभारल्या गेलेल्या लोखंडी पिंजऱ्यांमुळे विद्रुपतेत आणखी भर टाकली गेली आहे.

या साऱ्या परिसराकडॆ एकंदरीत साऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. 

नेहमी प्रमाणॆच येथे येणाऱ्या भाविकांनी या संपुर्ण परिसराचे रुपांतर डंपींग ग्राउंड मधे करुन टाकलेले आहे.



Friday, November 27, 2009

कधी तरी

कधी तरी दोन अश्रु ढाळले जावेत , नक्षलवाद्यांच्या हल्लात बळी पडलेल्या पोलीसांसाठी, नागरिकांसाठी.

का त्यांचा उपद्रव मुंबईपासुन खुप दुर असल्यामुळे त्याचे आम्हास सोयरसुतक नाही ?

कधी तरी

कधी तरी दोन अश्रु ढाळले जावेत , नक्षलवाद्यांच्या हल्लात बळी पडलेल्या पोलीसांसाठी, नागरिकांसाठी.

का त्यांचा उपद्रव मुंबईपासुन खुप दुर असल्यामुळे त्याचे आम्हास सोयरसुतक नाही ?

Thursday, November 26, 2009

कधी कधी

कधी कधी एखादा मस्त ब्लॉग अवचीत गवसतो

http://musicandnoise.blogspot.com

यांना त्यात काय मिळते ?


एका चॅनलवर गेल्यावर्षी मुंबईत झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्लात मृत्यु पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. 

त्यांच्या जखमेवरच्या खपल्या सर्वांसमोर काढुन,त्यांना रडायला लावुन या चॅनल्सवाल्यांना काय मिळते ?

कधी कधी

कधी कधी एखादा ब्लॉगर त्यांच्या ब्लॉगवर लिहिणे अचानक थांबवतो, कारण नेहमीच गुलदस्तात रहाते.
एवढे छान अभ्यासपुर्ण लेख, कथा, रहस्यकथा, गुढ कथा , ती व्यक्‍ती लिहित असते. पण का कोण जाणे त्यांचे पुनरागमन केव्हाच होत नाही.

ता.क.  : तिचे पुनरागमन झाले आहे.


Wednesday, November 25, 2009

कधी कधी


कधी कधी B.E.S.T बसमधे बसचालकाच्या जवळ उभे राहुन ते गृहस्थ या मुंबईच्या , गर्दीने तुडुंब , गच्च भरलेल्या रस्तावर किती कौशल्याने आपले भलेमोठाले वहान चालवत असतात ते न्याहळावे.  अधेमधे येणारे, बेदरकारपणॆ चालणारे पादचारी , न बघता रस्ता ओलांडणारे , समोर अवचीत येणारे, कट मारत  कुठुनही कुठे घुसु पहाणारे मोटारसायकल, सायकल वाले , टॅक्सीवाले, कार चालवणारे, हाथगाडीवाले.

हर एक पावलावर आपला तोल न जावु देणारे हे चालक, त्यांना मनोमनी सलाम करावा.

हे खरे अष्टावधानी.

प्रत्येक क्षण सावधतेने दुसऱ्याला सांभाळुन घेणारे. 

पुढे काय ?

अहवाल शेवटी सर्वांसमोर १७ वर्षानी की होईना पण आला.

गरीबबापुडॆ बिचारे या खेळात मरणारे मेले. सत्ता भोगणारे सत्ता भोगत राहीले.

काय हो राजाभाऊ , या लोकांना कधी सदविवेकबुद्धीची  टोचणी लागत असेल काय ?

कधी कधी

कधी कधी एखादे कपडॆ, शर्ट आपल्याला खुप आवडत असते, ते घातल्यानंतर फार चांगला फिल येत असतो, कालांतराने ते जुने होत जाते, रंग उभ्रंगतो, विटत जातो, ते जुनाट वाटायला लागते तरी देखिल आपल्याच्याने ते काही टाकवत नाही, आपण तसेच ते वापरत रहातो.

तर कधी कधी नवे शर्ट , बस मधला एखादा प्रवासी  पानाची पिचकारी बरोबर तुमच्याच अंगावर टाकुन ते खराब करतो, आणि भरीसभर रात्री उंदीरमामाला कुरतडायला नेमके तेच सापडते. त्याचे आयुष्य क्षणभंगुर ठरते.

कधी कधी

कधी कधी एखादे शर्ट आपल्याला एवढे आवडते, हे शर्ट घाताल्यानांतर  जे मस्त फिलिंग येत असते . मग रे शर्ट जून होते, r

Tuesday, November 24, 2009

काय हो राजभाऊ


काय हो राजाभाऊ,
हे राजकारणी लोक कधी " मला हेच करायचे होते, मी जे केले ते योग्यच केले, मला हेच म्हणायचे होते, माझ्या विधानांचा हाच अर्थ मला अभिप्रेत आहे " अश्या प्रकारची कबुली शब्दांचे खेळ खेळण्याऐवजी केव्हाच का बरे देत नाहीत ?

Monday, November 23, 2009

राजाभाऊ म्हणतात

राजाभाऊ म्हणतात ज्यांना प्रवासाची, पर्यटनाची, फिरण्याची आवड नाही, बाहेरगावी ते फक्‍त विश्रांती घेण्यासाठी जातात, स्थळ दर्शन हे त्यांच्यासाठी तापदायक असते, अश्यांबरोबर प्रवासास निघु नये.

त्याने तुमच्या जीवाला त्रास होतो.

राजाभाऊ म्हणतात,

ज्यांना खाण्यामधे फारसी रुची नसते, गती नसते, अश्यांबरोबर बाहेर उपहारगृहात जेवायला जावु नये.

त्याने तुमची आस्वाद घेण्यातली मजा साफ किरकीरी होत जाते. तुमचा विरस होतो.

राजाभाऊ म्हणतात

राजाभाऊ म्हणतात , ज्यांना तुमच्या ब्लॉग बद्दल , तुम्ही त्यावर काय लिहित आहात  याच्यात काडीमात्रही स्वारस्थ नसेल अश्यांकडॆ ब्लॉगविषयी काहीही बोलु नये, त्यांना काहीही यावर सांगु नये.

त्यांनी दुर्लक्ष केल्यावर आपल्याच जीवाला त्रास होतो.

Saturday, November 21, 2009

"दांडगाईचा निषेध " संपादकीय .

काही "हम करे सो कायदा’ नामक प्रवृत्तींनी माध्यमांवर केलेल्या हल्लानंतर वर्तमानपत्रात जेव्हा यांचा निषेध करणारे लेख छापुन येतात , तेव्हा राजकारणी माणसे मनातुन हसत असतील कि संतापत असतील ?

म्हणत असतील , यांच्यातर मदतीने आम्ही निवडुन आलो आहोत, आम्ही दिलेल्या देणग्यांमुळे (?) यांनी आमच्यावर भरभरुन आमचे गुणगाण करणारे लेख लिहिले, आमच्याबद्द्ल चांगल्या बातम्या छापुन आणल्या. आम्ही सांगु त्या विरोधकांबद्द्लचा रिपोर्ट खराब केला ( वाचा, पी. साईनाथांचा लेख व श्री. गोविंद तळवळकरांची प्रतिक्रिया), आणि तिच्या मारी , आता आम्हालाच शिकवतात काय ? कोणत्या तोंडाने सांगतात  ?  ते करतात ते चांगले आणि आम्ही करतो ते ?


जय देवा म्हाराजा

आयुष्यात बऱ्याच गोष्टी करायच्या उगीचच राहुन जातात. मच्छिंद्र काबंळींचे वस्त्रहरण पहायचे राहुनच गेले.

५००० व्या प्रयोगाला शुभेच्छा.

"कठोर कारवाई केली जाईल. "

जेव्हा माध्यंमावर मुठभर लोक हल्ला करुन माराहाण, तोडफोड करतात तेव्हा राज्यकर्ते नेहमीच " हा हल्ला निंदनीय असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल " असा सज्जाड दम भरत असतात.

एकदा तरी राज्यकर्त्यांनी एक गोष्ट स्पष्ट करावी.  आतापर्यंत माध्यंमावर एकुण किती हल्ले झाले व आतापर्यंत किती जणांवर कारवाई  केली गेली, त्यातल्या किती जणांना शिक्षा झाली, किती जणांची पुरव्या अभावी निर्दोष सुटका (?) झाली.


होर्डींग्स केव्हा उतरवणार ?

आमच्या रमेश भाऊंनी अंगावरचे किलो किलोनी घातलेले सोने उतरवले.

आता पुणॆ शहराच्या अंगावर चढवलेले त्यांचे छायाचित्र असलेलेले असंख्य होर्डींग्स ते केव्हा बरे उतरायला लावणार आहेत ?

आकाशवाणी की ब्रॉडकास्टींग हाऊस ?

मुंबई आकाशवाणी चे नामकरण "ब्रॉडकास्टींग हाऊस ’ मधे केव्हा झाले कळालेच नाही. 

आपले आमदार काय करत आहेत ? त्यांच्या डोळ्यासमोरच ही इमारत आहे.

Monday, November 16, 2009

प्लॅस्टीकच्या कॅरी बॅगचा मोह टाळा. कापडाची थैली घेतल्याशिवाय खरेदीला निघु नका.

जमावाला, झुंडीला संमोहीत करुन त्यांना आपल्याला जे हवे ते त्याना करायला लावण्याची कला फार मोजक्या लोकांना अवगत असते. हा भारलेला जमाव काय करत असतो याची अनेक उदाहरणे आपण डोळ्यासमोर बघत असतो , या घटनांचे आपण साक्षीदार असतो.

पण हे असे जादुगार त्या समाजातील घटकांना एक व्यक्‍त्ती म्हणुन त्यांचे अस्तित्व कायम ठेवुन जेव्हाका  भुरळ पाडत असतात तेव्हा त्यांच्या हाती काहीतरी विधायक कार्य होत असते , काही तरी  असे नवनिर्माण होत असते, जे अनेक कायदे करुन ही किंवा असलेल्या कायद्यांची अगदी काटॆकोरपणे अंमलबजावणी करुन देखील होण्यासारखे नसते.

बहुतेक सर्वच वेळा काय केले जावु नये हेच सांगितले जाते. पण जेव्हा त्याच बरोबर तुम्ही या प्लास्टीकच्या कॅरी बॅग वापरु नकात , त्या ऐवजी  आम्ही तुम्हाला सहज माफक किमतीत उपलब्ध करुन दिलेल्या या कापडाच्या पिशव्या वापरा असे समजवुन सांगितले जाते , तेव्हा माणसे ते आनंदाने ऐकतात.  मतपरिवर्तन होवुन  भाजी विक्रेते, दुकानदार   प्लास्टीकच्या कॅरी बॅग ठेवणॆ बंद करतात, आणि त्यामागे वर्षाकाठी खर्च होणारा पैसा बचत करतात.

विलेपार्ल्यात जर का तुम्हाला भाजीवाल्यांनी, उपहारगृहवाल्यांनी प्लॅस्टीकच्या कॅरी बॅग दिल्या नाहीत तर त्यांच्याशी भांडु नकात, उलट ते व आपण पर्यावरण रक्षणासाठी कुठेतरी हातभार लावत आहोत या जाणीवेने खुश व्हा.  तसेच आपल्यामुळे अनेकांना या कापडी पिशव्या तयार करण्याचा रोजगार मिळाला आहे या भावनेने फिल गुड करा .

वापरल्यानंतर जेव्हा या कॅरी बॅग्स रस्तात, गटारात, घरगल्यांमधे बेदरकारपणे फेकल्या जातात तेव्हा काय होते याचा अनुभव मुंबईनी एकदा चांगलाच घेतला आहे.  त्याच बरोबर यांचा वापर मनात आणले तर बंद होवु शकतो अश्या प्रकारची  अनेक उदाहरणे आहेत.

हि सारी किमया आहे , श्री. सुभाष दळवी नामक अवलियाची. मुंबई शहर हे स्वच्छ, सुंदर करण्याचा ध्यास  घेतलेल्या एका महानगरपालिकेत काम करत असुन आपल्या चाकोरी बाहेर जावुन   हे असे अनेक प्रकल्प राबवणाऱ्याची.  काही वर्षापुर्वी ग्रॅंटारोड ला भाजीगल्लीत सुरु झालेली हि मोहिम आता  विलेपार्ल्यात पोचली आहे. हा प्रकल्प येथे गेले सहा महिने राबवला जात आहे.

आता ते मुंबईत अनेक विभागात या प्रकल्प घेवुन जाणार आहेत.

अपुर्ण.

सहप्रवासी

प्रवासामधे काही सहप्रवाश्यांना सवय असते. ते तुमचे नाव , गाव, तुम्ही काय कसता , कुठे नोकरी करता, या सारख्या चौकश्या करत रहातात. 

एक किस्सा वाचल्याचे आठवले.

एका तरुणाने ट्रेन मधे एका म्हाताऱ्या माणसाला किती वाजले हे विचारले.

त्य म्हाताऱ्या माणसाने काहीही जबाब दिला नाही. परत त्या तरुणाने हाच प्रश्न विचारला.

"सांगणार नाही "

" पण का ? "

मग त्या म्हाताऱ्या माणसाने कारण सांगितले.

" आत्ता तु मला वेळ विचारलीस व माझ्याशी बोलण्याचे  सुरु केलेस. मग हळुहळु प्रवासात आपले संभाषण वाढायला लागेल. मग विचारशील, तुम्ही कुठे निघालात ?  कुठुन आलात ? काय करतात ?

मग मधेच माझ्या घरापर्यंत पोचशील. कुठे रहाता ? घरी कोण कोण आहे ? मग माझी मुलगी तरुण आहे हे कळल्यावर मग मला आपल्या बद्द्ल सांगायला लागशील, हळुच तिला लग्नाची मागणी घालशील.

पण ज्याची एक साधे घड्याळ घेण्याची ऐपत नाही त्याला मी कद्यापी माझी मुलगी देणार नाही "

अन्नाला तुमची वाट बघायला लावु नका


आज राजाभाऊंची पुतणी तणतणत घरी आली. खेळण्याच्या नादात तिची पाणीपुरी खाण्याची राहुन गेली होती. योगायोगाने अगदी जरासेच आधी त्यांना एक प्रसंग आठवत होता.

रात्रीचे अकरा वाजले असावेत. थकलेल्या भागलेल्या, भुकेल्या अवस्थेत ते मुंबईला पोचले. उपहारगृहात जेवण येण्यास खुप वेळ लागत होता. कळ काही काढवत नव्हती. भुक सहन होत नव्हती.

आणि याच वेळी बाजुच्या टॆबलावर बसलेला माणुस समोर आलेल्या जेवणाच्या ताटाकडॆ दुर्लक्ष करत मोबाईल वर बोलण्यात मशगुल होता. १० -मिनीटॆ , १५ मिनीटे.

राजाभाऊंच्या  बाजुला एक वृद्ध मुस्लीम गृहस्थ बसले होते. न राहवुन राजाभाऊ त्यांना म्हणाले.

"क्या आदमी है.  सामने खाना है ये इनकी मोबाईल पर बात खतमही नही हो रही है"

त्यांनी एक फार मोलाचे वाक्य सांगितले.

"नेहमी माणसाने अन्नाचा इंतजार करायला पाहिजे. कधीही अन्नाला तुमची वाट बघायला लावु नये. "


Sunday, November 15, 2009

श्रीकॄष्णा , आता तुझाच सहारा भुकेले जीवास

हे राजाभाऊ फार बदमाश आहेत. बायकोला दिले मंडईत खरेदीला पाठवुन आणि स्व:त जोश्यांकडॆ मिसळ हाणली.


ही बायको म्हणजे ना ..

ही राजाभाऊंची बायको आपल्या नवऱ्याचा किती छळ करत असते, किती त्रास देत असते !

एक दिवस थकल्याभागल्या जीवाला विश्रांती ती नाही.  काल एक चांगलाच लांब "लवासा " ला फेरा झाला , आणि आजची मागणी काय तर मंडईत खरेदी.


हे गॄहस्थ भाजी विकतात की ससे पाळतात ?


आप आ न सके आप का पैग़ाम तो आया

ख़ुश हूँ कि मेरा हुस्ने तलब काम तो आया
ख़ाली हे सही मेरी तऱफ जाम तो आया

काफ़ी है मेरे दिल के तसल्लीको येही बात
आप आ न सके आप का पैग़ाम तो आया

अपनोने नज़र फेर ली दिल ने दिया साथ
दुनिया मे कोई दोस्त मेरे काम तो आया

वो बात हो एहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ ख़ुर्शीद सरे शाम तो आया

लोग उनसे ये कहते हैं कि कैसे है "शकिल" आज
इस हुस्न के सदक़े मे मेरा नाम तो आया  

गांधीजी, टिळक व आत्ताचे नेते

माननीय सरसंघचालकांनी गाधींजीचे व टिळकांचे काही निर्णय चुकल्याचे प्रतिपादन केल्याचे आजच्या दै. सकाळ मधे वाचनात आले.

गांधीजी, टिळक हे झाले इतिहासातले नेते. इतिहास आता मागे पडला.  


यांच्या चुकां ऐवजी आत्ताच्या नेत्याचे किती आणि काय कसे चुकले किंवा ते कसे चुकत आहेत याबद्दल ऐकायला आवडेल.  

राममंदिरासाठी देशभर निर्माण केले गेलेले वातावरण, गुजरात मधले दंगेफसाद , अनेक होत असलेले आर्थिक 
घोटाळे अश्या अनेक बाबी.

हसणाऱ्याचे दात दिसतात


फिर तेरा रेह गुज़र याद आया

वल्लाह तुझ से तर्के तअल्लुक़ के बाद भी अक्सर गुज़्रर गए है तेरे रेह गुज़र से हम । उक़्बा मे भी मिलेगी येही ज़िन्दगी "शकील" मरकर भी छुट न पाएंगे इस दर्देसर से हम ॥

Saturday, November 14, 2009

कॅफे मोमो , कोर्टयार्ड मेरीयेट, हिंजवडी, पुणे




आधीच मर्कट त्यात मद्य प्याला.

राजाभाऊंची काहीशी अशी विचित्र अवस्था या कॅफे मोमो बाबत झाली आहे. पुण्यामधल्या एका अतिशय उत्तम , दर्जेदार, आणि चविष्ट बुफे मिळणाऱ्या या ठिकाणाबद्द्ल  श्री. शंतनु घोषच्या ब्लॉगवर दोन महिन्यापुर्वी त्यांनी वाचले व जेवायला गेले. हे ठिकाण एवढे आवडले की तेव्हा पासुन ते जवळजवळ दर शनिवारी येथे बफे जेवायला जात आहेत.  त्यात परत कधी नाहे ते त्यांची बायको येथल्या बफे जेवणाच्या कधी नाही ती प्रेमात पडली.


मधेच केव्हातरी त्यांना " एकावर एक जेवण फुकट" ची कुपने हॉटॆल तर्फे भेट देण्यात आली.  मग काय , त्या कुपनांचा लाभ उठवायला नको ? खर तर त्यांना "सयाजी" मधे बुफे जेवायला जाण्याची तिव्र इच्छा होती पण या कॅफे मोमोने सध्यातरी त्यांचे पोट बांधुन ठेवले आहे (आणि वाढवुनही. )

छानसे ऍंबियन्स, हसतमुख सदैव तत्पर कर्मचारीवर्ग. जेवणात सॅलेडसचे अनेकविध प्रकार, चार पाच स्टाटर्स , पाच सहा भाज्या, पुलाव किंवा बिर्याणी , दोन प्रकारची डाळ आणि भरपुर डेजट्स . किती हाणु नी किती नाही असे होते. चांगले दिड दोन तास लागतात चवीचवीने , एकेक पदार्थाचा आस्वाद घेत जेवायला.

आज त्यांना सब्जी बिर्यानी व डाल माखनी खुप आवडली, अगदी डेलीकसीच. खास त्याच्या साथी त्यांनी पोटाचा एक कोपरा रिकामा ठेवला होता. एक बरेहोते की दर वेळी त्यांना येथे नवे नवे पदार्थ खायला मिळतात.
मेनु नेहमी बदलता असतो.

आता पुढच्या शनिवारी मात्र येथे नको , जरा बदल हवा के नको ?

डूबा हुआ खुर्शीद सरे शाम तो आया


बाबा, कधी सत्तेच्या मॅरेथॉनसाठी आणि कधी मॅरेथॉर्न मधे


Thursday, November 12, 2009

रॅपसो, चटणी, सोका संगीत , लिंबो, जाझ आणि स्टील पॅन

संगीताच्या तालावर मन थिरकत असतांना एका व्याकुळ क्षणी राजाभाऊंनी आपल्या दुरावलेल्या (शिक्षणासाठीच की त्यांच्या चमत्कारीक स्वभावामुळे ?) मुलाला मोबाईल वरुन कॉल करुन दोन क्षण Steel Pan चे मंत्रमुग्ध करणारे ताल ऐकवले व लागलीच SMS केला.


Miss U ( तु येथे या क्षणी माझ्या बरोबर हवा होतास रे,  हे enjoy करायला )


उत्तर आले.


"Me Too."


आता चटणी ही तर खायची गोष्ट झाली. आज नविन धडा मिळाला. हा एक गाणॆबजावणॆ , नाचाचा प्रकार.


आता पर्यंत बायकोने रागाने आदळ आदळ आपटलेल्या भांड्याचा ठण, ठण्ण, ठण्ण्ण, ठणठणाना आवाज माहित होता पण हेच स्टीलचे भांडे एवढा सुमधुर नाद निनाद कसा काय उमटवु शकते ?


आपण मुंबईमधे आहोत का बिहारमधे की वेस्ट इंडिज मधे ? ही भोजपुरी गाणी यांना कशी काय येतात ?  मुंबईमधे येवढे बिहारी भरलेले आहेत तरी आपण मराठी लोकाना ही भाषा बोललेली धडपणॆ समजत देखील नाही.


काय या माणसाचे अंग लवचीक आहे. या जमिनीलगत आडव्या ठेवलेल्या काठी खालुन हा नाचता नाचता कसा काय वाकुन दुसरी कडुन बाहेर येवु शकतो ? (राजाभाऊंनी हा नृत्य प्रकार करण्याचा प्रयत्न कधीकाळी केलाच तर त्यांचे भले मोठाले पोट आड येवुन ही काठी पडायची.   )


आज Indian Council for Cultural Relations नी आयोजीलेला Trinidad & Tobago मधुन आलेल्या कलाकारांनी त्यांच्या देशातील संगीत व नृत्य सादर केलेला बहारदार कार्यक्रम बघायला मिळाला.

Wednesday, November 11, 2009

अबु आझमीचे उदात्तीकरण करण्याची ठेका महाराष्ट्र टाईम्स ने घेतला आहे काय ?

अबु आझमीचे उदात्तीकरण करण्याची ठेका महाराष्ट्र टाईम्स ने घेतला आहे काय ?

हे सदगृहस्थ मराठी भाषा शिकणार ही काय मुखपृष्टावरील ठळक , मुख्य बातमी झाली ?  कशापायी त्याचे एवढे कौतुक ?

हे कोणतीही भाषा शिको , न शिको आम्हाला त्याचे काय सोयरसुतक ? त्यांचे हे लाड व चोचले कशासाठी ?


महाराष्ट्र टाईम्स -

" मराठी भाषेतील शपथेवरून विधानसभेत झालेल्या रणकंदनाच्या पार्श्वभूमीवर, समाजवादी पाटीर्चे महाराष्ट्राचे नेते अबू आझमी अखेर आज, बुधवारपासून मराठीची शिकवणी पुन्हा सुरू करणार आहेत. पक्षातील अनेक सहकाऱ्यांनी अबूभाईंच्या मुखातून अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी मायबोली बाहेर पडावी, याकरिता प्रयत्न केले होते; परंतु त्यांनी हात टेकले. मात्र आता मनसेच्या दणक्यानंतर आझमींनी पुन्हा एकदा पुस्तकांवरील धूळ झटकण्याचे ठरवले आहे.

तुम्ही मराठी का शिकत नाही? अशी विचारणा केली असता 'बुधवारपासून मी मराठी शिकणार आहे' असे आझमींनी सांगितले. कुर्ला येथील शाळेतील शिक्षक शेख युसुफ यांनी माझ्या मुलांना मराठी शिकवले होते. आता त्यांच्याचकडे मीही अभ्यास सुरू करणार आहे. यापूवीर्ही मराठी शिकण्याचा प्रयत्न केला; परंतु जमले नाही. एखादी भाषा नीट न बोलणे हा त्या भाषेचा मी अवमान समजतो, अशी पुस्ती त्यांनी जोडली."

The Times of India की The Times of Volkswagen


एखाद्या वर्तमानपत्रात एका दिवशी एकच कंपनीच्या किती जाहिरात असाव्या ? काय त्याला मर्यादा ? मुख्यपॄष्टाची जागा ठळक , महत्वाच्या बातम्यांऐवजी संपुर्ण पान भरुन असलेल्या जाहिरातीनी केव्हा घेतली कळालेच नाही.

आज तर "Times of India " ने जाहिरातीत नवा विक्रम केला आहे.

बातम्या कमी व पानेच्या पाने भरुन Volkswagen च्या जाहीराती.

Monday, November 09, 2009

तवांग- अरुणाचल प्रदेश आणि काझीरंगा



जहांगीर बहुतेक या प्रदेशात गेला नसता. गेला असता तर है अगर जन्नत तो यहीं है ! हे उद्गार येथे पण काढ्ले असते

माझे एक स्नेही तवांग- अरुणाचल प्रदेश आणि काझीरंगा च्या सफरीस गेले होते. त्यांनी आपल्या कॅमेरात बंदिस्त केलेली ही निसर्गाची रुप.

Sunday, November 08, 2009

मासुम


याद राखा अरुणाचल प्रदेशाकडॆ वाकड्या नजरेने पहाल तर.




काश्मिर बद्द्ल कोणीही काहीही वेडेवाकडे बोलले की त्याचा आपण भारतीयांना भयंकर संताप येतो. काश्मिर हा भारताचा एक अविभाज्य भाग आहे हे आपण बाह्या सरसावुन ठणकावुन सांगतो, या प्रदेशाकडॆ वाकड्या नजरेने पहाल तर याद राखा, दम भरतो.

पण हाच आवेश, ही तिव्र भावना, अरुणाचल प्रदेशाबद्द्ल तेवढ्या प्रमाणात तर जाऊंद्या पण अजिबातच सर्वसामान्य भारतीयांच्या मनात दिसुन येत नाही.

चीन या प्रदेशावर दावा करत राहतो, मधेमधे कुरापत काढत रहातो, कधीतरी मधेच हा प्रदेश कोणत्यातरी , कोणाच्यातरी नकाशातुन भारतातुन गायब झाल्याचे दाखवेले जाते, वाचनात येते, आणि एक साधा ओरखडा पण आपल्या मनावर उमटु नये ?

आज पुज्य दलाई लामा या विभागाला भेट देत आहेत.

जगाला आम्ही सारे भारतीय बजावत आहोत, याद राखा येथे वाईट भावनेने
पाय ठेवाल तर, तंगडी मोडुन ठेवु.

(राजाभाऊंचे एक स्नेही या प्रदेशाला भेट देवुन आले. हे फोटो त्यांच्या सौजन्याने )

कविता महाजनांचं "ब्र

एखादे पुस्तक परत वाचायले घेतले की त्यातली सौदर्यस्थळॆ नव्याने जाणवु लागतात. त्याचे एक वेगळॆच रुप ध्यानी येवु लागते.

पहिल्यांदा कविता महाजनांचं "ब्र ’ वाचले तेव्हा मनात स्वयंसेवी संस्था, त्यांची कार्ये, सामाजीक प्रश्न , समाजसेवा या विचारांचा पगडा जास्त असल्यामुळे त्या अनुषंघाने "ब्र" वाचले गेले होते.
तेवढेच डोक्यात शिरले होते.


पण आता या वेळी या कादंबरीतील आलंकारीक भाषा नव्याने उलगडुन राहिली आहे.


"संध्याकाळ थोडी निवांत मिळाली.
गेस्टहाऊसमागच्या  मोकळ्या डोंगरावर गेले चढून.
अनेक चढ उतार. मधूनमधुन सपाट पातळी .. . वेगळ्या रंगछटा घेऊन येणारी.
मी एकटीच.
कुणीही नाही आसपास.
नुसता वारा. अंगातून आरपार जाणारा.
सगळीकडॆ दरवळणारा गारवा.
वाऱ्याचे गार तळवे इतक्या विलक्षण स्पर्शाची अनूभूती देणाअरे होते की, अंगावरच्या कपड्यांचंही ओझं वाटायला लागलं
आणि आकस्मिकच सकाळी खाली दिसलेल्या ग्लेरीशिडीच्या गुलछड्यांचं रानच एका सपाटीवर दिसलं समोर उभं.
पाझरणारा कोवळा प्रकाश आणि पाखरांचा किलबिलाट. फुलांच्या गळून पडलेल्या सुकलेल्या पाकळ्यांचा खच पायतळी दिसला. लालस जांभळ्या रंगातला निळा अंश तेवढा त्यांवर राहिलेला आणि पांढरी छटा पिवळेपणाकडे झुकलेली.
वाटळ, एक मूळ रंग असा शेवटी कधीतरी उघडा पडतोच.
एक काळा पक्षी घायाळ करणारी शीळ घालत राईतून सण्णकन उडला आकाशात.
मातकट रंगामधून मधेच डोकवणारा एखादा ठाम विचारासारखा कातळ.
मी स्तब्ध उभी पाचोळ्यावर. "  

किंवा

"मग अलगद एकेक झुडूप, एकेक झाड पोपटीकोवळ्या हिरवेपणानं डोकावु लागेल आपल अस्तिव दाखवत. पाखरांचे आवाज ओघाळत येतील फांद्यांफाद्यांवरून. पंखांवरचे थेंब झटकन उडत जाईल एखादं पाखरू अंगावरून. झडझडून भिजवून जाईल एखादी सर. तिच्या नादात पुन्हा सारं हरवल्यागत वाटेल धुक्यातल्यासारखंच. तो मोकळा पाऊस झेलत , अलगद पुन्हा उतरून परतू घरी. " 


अरे. हे सर्व आले कुठुन. हे तर तेथेच होते की , पण आपल्याला आधी जाणवलेच कसे नाही ?
भराभर वाचत पुस्तक हाताबाहेर करण्याची राजाभाऊंची सवय मोडीत काढुन त्यांची नजर " ब्र " ही अशी रेंगाळत का बरं ठेवत आहे ?



Saturday, November 07, 2009

नुसता जीवाला त्रास होतो

मन नुसत जळतय. या राजाभाऊंनी आयुष्य कधी गंभीरपणॆ घेतलेच नाही.

 पुण्यात एकेका विभागात पायी हिंडत असता एकेकांची घरे, बंगले किंवा तो एरीया बघुन  जीवाला त्रास होतो, आपण कधीच पुढचा विचार काय किंबहुना विचारच कधी केला नाही याचा.  आणि विचार केलच तर तो अंमलात आणॆपर्यंत जग फार पुढे निघुन गेलेले असते याचा.

राजाभाऊंची एक सवय आहे , बायकोला घेवुन शहरात मग ते कोणतेही असो,  पायी हिंडुन फिरत पहाण्याची.  त्या शिवाय ते शहर कळत नाही असा त्यांचा सिद्धांत..  एखादा विभाग घ्यायचा मग पाय नेतील तेथे कुचे , गलीयां मधुन स्वत:ला वाहवत न्यायचे.

आज संध्याकाळी घरकुल लॉन मधुन ते मग चालता चालता पटवर्धन बागेत शिरले आणि मग पुढे जात नवसह्याद्रीतुन बाहेर पडले.  काय मस्त परिसर आहे.

काश .....

किस गहरी सोच मे डुबे हुवे हो भाई


ज्याचे पाय एवढाले त्याला पादत्राणॆ कैसी ?


लागी रे ये कैसी अनबुझ आग , मितवा, मितवा , मितवा नही आये


राजाभाऊ आणि वहातुक पोलीस हवालदार

राजाभाऊंनी काल वाशी येथे पुलाखाली एका वहातुक पोलीसाला एक साधा, सोपा, सरळ प्रश्न विचारला, ज्याचे उत्तर त्या दोघांनाही ठावुक होते.

"काय हो तुम्ही बाहेरुन येणारी गाडी, प्रवासी घ्यायला थांबली की लगेच त्यांना पकडता , पण या येथे समोर कोपऱ्यावर राजरोसपणे ह्या खाजगी गाड्या प्रवासी भरण्याचा  बेकायदेशीर धंदा करतत, अगदी तुमच्या समोर हे एजंट लोक ’पुणॆ, पुणॆ " करत ओरडत असतात , त्यांना तुम्ही काहीच करत का नाहीत ? "

राजाभाऊंच्या तोंडाकडॆ ते हवालदार बघत राहिले व  काहीही न बोलता पुढे निघुन गेले.


वाशी ते पुणॆ , एशियाड , वोल्वो सेवा,  महामंडळाने उपलब्ध करुन दिली तर (चांगल्या न खडखडणाऱ्या गाड्या)  ! , दादर - पुणे च्या धर्तीवर वाशी-पुणे योग्य दरात टॅक्सी सेवा सुरु झाली तर !

कशाला प्रवासी या धोकादायक आणि अव्याच्यासवा दर सांगणाऱ्या, मेंढरे भरल्यागत गाडीत माणसे कोंबणाऱ्या खतरनाक माणसांच्या नादी लागतील ?    

आज गोंधळ कोण घालणार ?

आज शपथविधी समारंभात  गोंधळ कोण घालणार ? 

जांबुवंतराव घोटॆंची जागा आमचे आमदार पैलवान श्री. रमेश वांजळॆ घेणार काय ? 

राज साहेबांनी सर्व आमदारांना दम भरला आहे, मराठीतुन शपथ घ्या नाहीतर !!

पुणे आणि " पुन्हा बहरली डौलदार बाग "

विद्युल्लेखा अकलूजकर यांचा " पुन्हा बहरली डौलदार बाग " हा साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकातला लेख वाचल्यानंतर राजाभाऊंनी एक नवेच वेड लागले आहे, पुण्यात फिरतांना दुरावस्थेतल्या बागा, उद्याने , मैदाने न्याहाळायची व पुण्यातील बागकामाची आवड असणाऱ्या असंख्य प्रेमींनी जर मनावर घेतले तर यांचा देखणा कायापालट होवु शकतो या विचाराचे.

सध्या दोन जागा पहाण्यात आल्या आहेत. औंध मधे सानेवाडीतले मैदान व अलका कडुन दांडेकर पुलाकडॆ जातांना असलेल्या काका हलवाईंच्या दुकाना मागील एक उद्यान.


कॅनडातील एका स्थानीक प्रशासनाला पुरेश्या निधी अभावी "पॉलीक पार्क " या भव्य बागेची देखभाल करणॆ कठीण जात असते, बागेची वाईट अवस्था बागकाम प्रेमींनी बघवत नाही. अश्या वेळी लेखिका व "रिचमंड गार्डन कल्ब " चे सदस्य पुढाकार घेवुन "पॉलीक पार्क " ला दत्तक घेतात व प्रशासनाच्या मदतीनी पार्कचा कायापालट करता, नवसंजीवनी मिळवुन देतात. या अनोख्या प्रयोगाची माहिती देणारा का लेख.

जेव्हा प्रशासन व नागरीक एकत्र ऐवुन एखादा प्रकल्प राबवतात तेव्हा त्यातुन एक नव निर्माण होत असते.
  
असे प्रयोग आपल्याला पुण्यातही कैक ठिकाणी करता येतील.

Thursday, November 05, 2009

सरकारची गरजच काय ?


अलीकडॆ कुठेतरी एक लेख वाचनात आला होता.

नाहीतरी राज्यकारभार प्रत्यक्षात प्रशासकीय अधिकारीच करतात, या अश्या नेत्यांऐवजी त्यांच्याच ताब्यात राज्य देवुन त्यांना राज्यशकट चालवायला द्या, ते अधिक चांगल्या रितीने राज्य चालवु शकतील असा काहीसा त्याचा मतितार्थ होता.

लेखकाचे मत पटले.

राजाभाऊ आणि उकडीचे मोदक


राजाभाऊंच्या  उत्तराने त्या बाईंनी एकदम चमकुन त्यांच्याकडॆ पाहिले  व काहीही न म्हणता त्यांनी पुढे केलेल्या ताटलीत त्यांनी सातवा मोदक वाढला.

"अजुन किती देवु ?  " हा त्यांचा प्रश्न.

स्थळ कोकण महोत्सव, मागोठणॆ आगार.  त्या स्टॉलवर उकडीच्या मोदकाचा खासा बेत.

" जो पर्यंत तुम्ही वाढुन वाढुन दमत नाहीत तो पर्यंत "  राजाभाऊंनीं त्यांना सांगितले.

आणि राजाभाऊंनी त्या दिवशी आपला शब्द खरा केला आणि मग ओशाळलेल्या राजाभाऊंनी मी नुकताच तापातुन उठलोय, गेले दोन दिवस उपाशी आहे , हा खुलासा केला.

 ( तरी पण काय झाले ? हा बकासुरी बाणा ? )

आज सकाळ पासुन त्यांच्या बायकोचे चार फोन , तु येथे असायला हवा होतास, आज संकष्टी. मी उकडीचे मोदक केले आहेत.

मग ते वाट वाकडी करुन ठाकुरद्वारी तांबेंकडॆ गेले, " मोदक संपले"  हे ऐकुन घ्यायला.

नशिबाने "कोल्हापुरी चिवडा " मधे त्यांना ते मिळाले.

दोन मोदक खाल्यानंतर त्यांना मालकांनी विचारले , "कसे झाले आहेत ?"

"आणखीन एखादा खावासा वाटतो " - इती राजाभाऊ.

एक मागितला तर वेटरनी प्रेमाचा आग्रह करत दोन मोदक आणुन दिले.

कठीण आहे.

बाप्पा तुची भक्‍तांना बिघडवीसी !   

टाळ्या - येवु घातलेल्या सरकारसाठी


एखादा कार्यक्रम सुरु व्हायला उशीर झाला की ताटकळत बसलेलेले, कंटाळलेले प्रेक्षक उपहासाने टाळ्या वाजवुन कार्यक्रम लवकर सुरु करण्याचे आव्हान करु लागतात.

आत या By Default  आलेल्या सरकारसाठी काय वाजवायचे ?

Wednesday, November 04, 2009

ही वाट वेगळी तुझी नसे रे त्यांची.

कवितेच्या फारश्या वाटेला न जाणाऱ्या राजाभाऊंनी काल रहावेना, काय करणार ज्या कवींवर तो कार्यक्रम होता ते पहाता न चुकवुन चालण्यासारखे नव्हते.

सृजन निर्मीत "एक दिव्य काव्यानुभव कवी रॉय किणीकर "

वैशाली उपाध्ये, शैलेश दाणी आणि श्याम माधव धोंड यांनी एक अप्रतिम काव्यानुभव सादर केला.

मजा आली.

ती आणि त्रिपुरी पोर्णिमा


१९७८-७९ चा काळ, श्री.सोमनाथ समेळांनी रायगड प्रदक्षिणा आयोजीत केली होती. राजाभाऊंची ही पहिली सह्यमोहीम.  नेमकी त्याच रात्री त्रिपुरी पोर्णिमा होती.

प्रदक्षिणा घालतांना त्या अरुंद वाटॆवर ती पुढे चालली होती, चालता चालता तिला त्यांचा पाय लागला, ते सॉरी  म्हणाले. 

"ट्रेकवर या असल्या फॉर्मलिटीज पाळायच्या नाहीत "

तिने बजावले. ती ग्रुप  लिडर होती.  त्या गर्दीत परत, परत तीन चार वेळा याचे पुनरावृती झाली.

तिला वाटॆल हा मुद्दाम पाय मारतो की काय , म्हणुन ते पुढे निघुन गेले. आता लाथा खाण्याची व हा डायलॉग मारण्याची त्यांची पाळी होती.  सवयीने ती पण नकळत सॉरी म्हणुन गेली.

" का हो आता का ?  "  अणि  मग दोघे खळखळुन हसले. त्यांना एक चांगली मैत्रीण मिळाली, 

छानपैकी त्यांच्या चार पाच जणांच ग्रुप जमला,  मग त्या चांदण्यारात्री त्यांनी रायगड चढायचे ठरवले, टपोरे लख्ख चांदणे ,  संपुर्ण किल्ला त्या चंद्रपकाशात पाहुन झाला, रात्र, पहाट मोहमयी होती.

तिच्यामुळे या गिर्यारोहणाच्या दुनियेची त्यांना माहिती मिळाली, ते भटकंतीस जावु लागले.

दरम्यान ती लग्न होवुन परदेशी गेली, त्यांचा संपर्क टुटला.

मग अचानक कधीतरी त्यांना कळाले , बाळंतपणात मुलाला जन्म देवुन ती हे जग सोडुन गेली.

दर वर्षी त्रिपुरी पोर्णिमेला हे दिवस आठवतातच.

Tuesday, November 03, 2009

माननीय राजसाहेब

आई एकवीरा आपली कुलदेवता. निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर प्रथम आईच्या दर्शनाला , तिचा आशिर्वाद घ्यायला आपण आपल्या तेरा आमदारांना घेवुन गेलात.


त्या कार्लागडाचे माझ्या लहान पुतणीने काढलेले हे फोटो,

या आईच्या निवासस्थानाची तिच्या भक्तगणांनी वाट लावली आहे. साऱ्या डोंगरावर प्लास्ट्किच्या पिशव्यांच्या, कापलेल्या कोंबड्यांच्या पिसांचा, नारळाच्या शेंब्यांचा, कचराचा विळखा बसला आहे.

आपल्या कुलदेवतेच्या गडाचे रुप आपल्या आदेशाने पालटो ही आईच्या चरणी प्रार्थना. ह्या देवळाचे स्वरुप, रुप, रंग देखील बदलण्याची गरज आहे. काय त्या देवळाभोवती कोणताही विचार न करता विद्रुप लोखंडी जाळ्यांचे पिंजरे उभारले आहेत, काय तो देवळाला रंग फासुन ठेवला आहे.

या कार्लापरिसराचे , तिथल्या अद्वितीय, प्राचीन, साऱ्या जगात या प्रकारची एकमेव असलेल्या बौध्द लेण्याचे भान ठेवुन नुतनीकरण करणे फार आवश्यक आहे.

आपण मनावर घेतले तर हे होण्यासारखे आहे.

डोंगर उतारावरील नवी शेती - प्लॅस्टीक, कागदे, नारळ्याच्या शेंब्या, आणि कोबड्यांची पिसे यांची




 (खास एका मातबगार घराण्यासाठी, ज्यांचे कुलदैवत आई एकवीरा देवी आहे, त्यांना आवाहन. )

आपल्या कुलदेवतेच्या स्थानाचे नवनिर्माण के्व्हा व्हायचे ? किंवा या डोंगराचे सुंदर , रमणीय फोटॊ केव्हा काढले जातील?

पायथ्यापासुन वरती देवळापर्यंत , सन्माननीय भक्‍त, समस्त हार, ओटीचे सामान विकणाऱ्यांनी हा आईचा गड अश्या रितीने मोठ्या हौसेने सजवलाय, नटवलाय.

कार्लागडाचा आतातरी कायापालट व्हावा.

(हे पुर्वी लिहीलेले )